॥ माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही ॥
माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही
मस्त आलिशान घर होतं
दिमतीला गाडी न नोकर होते
अन मी सारखी तुझ्यामागं पळत होते ॥
लग्नही असंच पळून केलं
पण तुझं घर बघताच, मन पार गळून गेलं
जणू सुरु झालं नाही तोवरच संपलं
एवढयाश्या घरातच सारं सुरु झालं
जिथे चूल होती तिथेच मोरी होती
आपल्याच घरात मुतायची चोरी होती
चहा झाला कि हात लांब करून दिला
जमीन जशी पावला पावलांसाठी भिकारी होती ॥
जोरात बोललं तर शेजारून यायचं उत्तर
भांडं पडलं तरी शेजारी जमायचे सत्तर
घर पार भरून जायचं
प्रश्न सदैव पडला , आता पुढचं आयुष्य कसं उडायचं ?
काव्यरस
मिसळपाव