आरश्यातल्या आरश्यात : एक आस्वाद
- डॉ. सुधीर रा. देवरे
आरश्यातल्या आरश्यात वारले बेवारशी...
- मनोहर ओक
(‘आयत्या कविता’ मधून)
मनोहर ओक यांच्या ‘आयत्या कविता’ या कविता संग्रहातील ही पहिली कविता. एका ओळीची.
या एका ओळीच्या कवितेतील शेवटचा ‘बेवारशी’ हा शब्द ओळीत पहिला असता तर ते केवळ एक वाक्यश झाले असते:
‘बेवारशी आरश्यातल्या आरश्यात वारले!’ असे ते वाक्य झाले असते. पण ‘बेवारशी’ हा शब्द ओळीच्या शेवटी गेल्याने या वाक्याला एक लय प्राप्त झाली आहे. मात्र केवळ हा शब्द शेवटी गेल्यानेच लय निर्माण झाली असे मात्र नव्हे. तर या एवढ्याश्या ओळीतच नाद लयीचे सुंदर मिश्रण आहे. म्हणून ही एकच एक ओळ संपूर्ण कवितेची अट पूर्ण करते.
मिसळपाव