Skip to main content

चक्र

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 27/05/2020 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
झुंजूमुंजू आभाळात किती सांडले केशर सोनसळत्या सकाळी निळे झळाळे अंबर तळपत्या माध्यान्हीची वितळती काचधार धूसरशा संध्याकाळी अदृष्टाची हुरहूर नि:शब्दाच्या चाहुलीने जागे रात्र काळीशार प्रहरांच्या रंगी रंगे बिलोरी हे कालचक्र चक्रनेमिक्रम त्याचा अनादि नी निरंतर
काव्यरस

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) ०१.११.२०१९ बंगलोर ते सेलम

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी मंगळवार, 26/05/2020 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) ०१.११.२०१९ बंगलोर ते सेलम बंगलोरच्या सिंदूरी हॉटेल मधून सकाळी सहा वाजता सेलमसाठी सायकल राईड सुरू झाली. कनकपुरा विभागातून मधून बाहेर पडून नाईस हायवे जवळ यायला अर्धा तास लागला. आज सुद्धा नाईस टोल नाक्यावर आम्हाला अडवले. कालचा सीन पुन्हा रिपीट झाला. दिपकने फोनाफोनी सुरू केली आणि दहा मिनिटात रवी साहेबांनी पाठविलेली पोलीस व्हॅन आमच्या मदतीला हजर झाली. या पोलीस व्हॅनचे एस्कॉर्ट घेऊन आम्ही सर्वजण हायवे वरून रुबाबात निघालो. बंगलोरमध्ये असलेल्या दिपकच्या ओळखीमुळेच बंगलोर शहरातून आम्ही सर्व सहजपणे बाहेर पडलो.

तिचा काहीच दोष नसतो..

लेखक चिनार यांनी मंगळवार, 26/05/2020 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेचे दिवस. आठवी-नववीत असेल. "ती तुझ्याकडेच बघते रे" असे शपथेवर सांगणारे मित्र भरपूर होते. नालायकांनी अश्या शपथा घेऊन कितीवेळा स्वतःच्याच म्हातारीचा जीव धोक्यात घातलाय त्याला गणतीच नाही. एक मित्र तर काहीही झालं की गजानन महाराजांची शपथ घ्यायचा. पण ती माझ्याकडे बघायची हे खरं होतं.कारण मी खिडकीजवळ बसायचो. मग खिडकीबाहेर बघण्यासाठी तिला माझ्या दिशेने बघण्याशिवाय पर्याय नव्हता! आता मित्रांनी त्याचे भलते अर्थ काढले ह्यात तिचा आणि गजानन महाराजांचा काहीच दोष नव्हता. आणि ऍक्च्युअली, तिचा कधीच दोष नसतो! तिचा शाळेला,ट्युशनला वगैरे येण्याजाण्याचा रस्ता ठरलेला होता.

आणि अश्या वेळी

लेखक कौस्तुभ भोसले यांनी मंगळवार, 26/05/2020 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अश्या वेळी, चंद्राने लपायला हवं ढगांआड... अन लपेटून घ्यायला हवं आपण, भोवतालचं गुलाबी धुकं... एकमेकांच्या श्वासांमधून उधळायला हवीत, प्रितीची गंधफुले... घट्ट मिटायला हवीत, डोळ्यांची नक्षत्रं... टेकवायला हवेत गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे, ओठ एकमेकांवर... आणि मग पहावं, श्वास रोखले जातात की; हृदय धडधडायचं थांबतं..? -कौस्तुभ

लाल पिवळी ब्रेकिंग न्यूज..

लेखक आजी यांनी मंगळवार, 26/05/2020 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या टीव्हीवर नव्या मालिका प्रक्षेपित होत नाहीत, त्यामुळे सगळेच जण बातम्याच बघतात. बातम्या सगळ्या कोरोनाच्याच असतात. "एक मोठी बातमी येतेय" किंवा लालभडक पार्श्वभूमीवर "ब्रेकिंग न्यूज" असं म्हणत प्रत्येक गावात, जिल्ह्यात,मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात, जगात (कंटाळा आला ना लिस्ट वाचून) रोज किती रुग्ण वाढताहेत, बळी पडताहेत, किती बरे होताहेत, याची आकडेवारी सांगितली जाते. ते महत्वाचं असेल, पण रिपीट रिपीट तेच बघायचा खरंच कंटाळा येतोय हेही खरं. या माध्यमांनीच आपल्याला सतत कुठल्या कुठल्या ब्रेकिंग न्यूज देऊन शेफारून ठेवलंय. आपल्याला आता बातम्यांतही नावीन्य पाहिजे.

आत्तापर्यंत काय केलं?

लेखक मनिष यांनी सोमवार, 25/05/2020 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ मिळालाच आहे अनायसे, तर संपवूया कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं, अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख. असंच खूप काही, मनापासून ठरवलं. धावपळीत रोजच्या, बरंच राहून गेलं. डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं, आत्तापर्यंत काय केलं? अपूरी स्वप्नं दूरुनच खुणावत राहिली दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला, आत्तापर्यंत काय केलं? ज्यांच्या अंगा-खांद्यांवर खेळलो, त्यांनाच खांदा देऊन आलो. सरणावर थोडा, मीही जळून गेलो. पोरकेपण नि पोक्तपण सोबत राहिले. नकळत अशीच कित्येक वर्
Taxonomy upgrade extras

यंत्र

लेखक निखिल आनंद चिकाटे यांनी सोमवार, 25/05/2020 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात माणूस हा कसा या यंत्रणे मध्ये कसा गुरफटला गेला आहे या बादल मला कविता द्वारे सांगायचे होते. माझा या आधुनिकते बद्दल विरोध नाही पण आज काल माणूस माणसात राहिलेला नाही म्हणून मी आपले मनोगत व्यक्त करत आहे. क्षणासाठी वाटतय गोड, मित्रांची संगत. इथे दर दिसते मला , फक्त यंत्रांची पंगत. इथे आहे माणूस, फक्त यंत्रासाठी घडलेला . दिस रात फक्त, या यंत्रांच्या वजा. बाकीत गुंतलेला , घडीचा काट्या सोबत , धावतोय त्पाचा जीव रे . विचारलं तर म्हणतो , हे जिंदगानीची निव रे.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ३ - त्रिकुट , त्रिशंकू

लेखक श्रीकांतहरणे यांनी सोमवार, 25/05/2020 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
अकोल्याले जायची तयारी झपाट्यानं चालू झाली होती. बाबांचा राग अजून उतरला नोता. त्याच्या, पोट्याले डॉक्टर बनवण्याच्या स्वप्नाच म्या आधीच वाटोळं करून टाकलं होत. कमीतकमी घरच्या भाकरीवर तरी इंजिनेरींग झाली असती, त त्याची पण म्या वाट लावून टाकली होती. त्या टायमाले नाय काय त, महिना दोन ते तीन हजारांचा लोड, म्या बाबांवर टाकला होता. पण आपल्या स्वप्नाचा जरी बट्याबोळ झाला, तरी पोट्ट्या ले कमी पडू देईन काय? चेहऱ्यावर, जरी राग दिसत असला, तरी जाऊ दे, कमीतकमी मधल्या बहिणी सारखा इंजिनीअर त होईन. अन पोट्यासाठी, हाल सोसणार नाई, त मग तो बाप कसला?

कोंकणची वेदना..

लेखक अभिबाबा यांनी सोमवार, 25/05/2020 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
करोनाचा हा रोग, त्यावर अनेक प्रयोग! काय भोग आहेत भाळी, याच काळी, काही कळेना ! हरेक समजतो इथं मीच अ‍ाहे बरोबर! सैनिक तरी कोविडचे आहेत का सुरक्षित खरोखर ? रेड आणि कंटेनमेंट झोनमधून बाहेर जायलाही नाही परवानगी.. पण सरकारच्या चातुर्यामुळे कोंकणात मात्र होऊ शकते रवानगी.. बाटलीतील राक्षसाला प्लीज सोडू नका बेलगाम.. कोविड बियाणं नाही संपवलं तर होतील गंभीर परिणाम.. राजधानीत नाही झेपलं, मग ही असुरक्षित घिसाडघाई इथे कशाला? कोरोनाचा भस्मासूर कोकणच्या का उशाला?

खासियत खेळियाची - मार्क वॉ

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 25/05/2020 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
Crush - हो हो ! तुम्हाला अभिप्रेत आहे तोच crush. ह्याला का कोणास ठाऊक मराठीत प्रतिशब्द सापडतच नाही. आणि नाही सापडत तेच बरंय. Crush मधला भाबडेपणा, त्यातली निरागसता आणि निर्भेळ असं प्रेम हे तसंही इतर कुठल्या शब्दात व्यक्त होणं अवघडंच. क्रिकेट आपलं पहिलं प्रेम असेल तर क्रिकेटमधला आपला पहिला क्रश म्हणजे मार्क वॉ. "कितने भी तू करले सितम, हस हसके सहेंगे हम" हे गाणं मार्क वॉ इतकं कोणाला चपखल बसत नसेल. ह्या माणसात मुळातच एक आपलेपणा वाटायला लावणारं काहीतरी होतं. ठाव न लागणारं काहीतरी. "ना समझे वो अनाडी है" म्हणणारी नूतन जशी कुठल्याही मेकअप, कॉस्चूम शिवाय देखील कमालीची सुंदर दिसायची तसंच काहीसं.