Skip to main content

चिंचवड गणपती दर्शन

लेखक आजानुकर्ण यांनी शुक्रवार, 21/09/2007 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
चिंचवड परिसरातील गणपतींचे आम्ही काढलेले फोटो खास हॉटेलात आलेल्या सदस्यांसाठी.
दत्तनगर
सोसायटी

ठाकुर भले बिराजे

लेखक जगन्नाथ यांनी शुक्रवार, 21/09/2007 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले. जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।। काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।। सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।। सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते. हे ऐकताना आधी साधेसुधे वाटले. नंतर रूपक लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. जुन्या काळी पोटापाण्यासाठी उत्तर भारतातून थेट कॅरिबियन प्रदेशात गेलेली ही माणसे. घरी परतणे तर खूपदा अशक्यच झाले असणार. त्यांची मनस्थिती काय असेल?

सलमानचा गणेशोत्सव

लेखक विकास यांनी शुक्रवार, 21/09/2007 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशपूजा केल्याने सलमानविरुद्ध फतवा इ-सकाळ बातमी नवी दिल्ली, ता. २० - प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने गणेशोत्सवात भाग घेतल्याने "दारूल-इफ्ता-मंजर-ए-इस्लाम' या संघटनेने त्याच्याविरुद्ध फतवा बजावला आहे. .......सलमान सर्व कलमा पुन्हा वाचत नाही, तोपर्यंत त्याला मुस्लिम मानता येणार नाही, असे या संघटनेचे म्हणणे आहे. सलमानच्या घरी दीड दिवसांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सलमानने त्याच्या विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला होता.

ह्या "मुद्रे"चा अर्थ काय?

लेखक जगन्नाथ यांनी गुरुवार, 20/09/2007 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
इथे यूट्यूब पेटेल की नाही हे माहीत नाही . . . हे सारेगमतलं गाणं बघा: हसले मनी चांदणे. अाता ह्याच्यात ०:४५ ते ०:४७ मध्ये त्याने जे "तोंड" केलं अाहे त्याला माझा जोरदार अाक्षेप अाहे! मर्दासारख्या मर्दाने असल्या "मुद्रा" करू नयेत असं मला वाटतं! अाणि त्याचा अर्थ तरी काय? गाणं अावडलंय का? ही असली ठोंब्यासारखी दाद देण्याची पद्धत कोणी सुरू केली? त्याच्याविरुद्ध मोर्चा निघाला पाहिजे. गाणं चांगलं अाहे. अाणि (वाटलं तर क्षमा वगैरे करून टाका अाधीच) देवकी पंडित इतक्या "मारू" दिसतात हे अापल्याला माहीतच नव्हतं! हाये . . . अात्मा फरार झाला . .

काचेची बरणी आणि २ कप चहा

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 20/09/2007 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा. तत्व़ज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तु बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपाँगचे बॉल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पुर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॉक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला.आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले.

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक - प्रबोधनात्मक

लेखक ॐकार यांनी गुरुवार, 20/09/2007 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
आवडणार्‍या लेखकांविषयी भरभरून लिहिले जात असताना आम्हाला आमचा प्रबोधनात्मक लेख लिहिणे अगत्याचे वाटत आहे. तसे पाहता गद्य हा आमचा प्रांत नोहे. परंतु गद्य , पद्य अथवा मद्य या विषयांमुळे ( श्लेष नाही!) बर्‍याच लोकांचा तोंडाचा आणि पोटाचा ( दोन्ही सुटलेले) प्रश्न सुटत असल्याचे पाहून आम्हाला आमच्या मुदपाकखान्यातले डबे-बाटल्या काढून रिकामे करण्याचा ( आणि मग बडवण्याचा) मोह आवरता येत नाही. छपाई केलेल्या पुस्तकांनंतर सुटलेल्या वाचनाचा नाद लावणार्‍या आतंरजालावर ठायी, ठायी सापडणार्‍या लेखांच्या पानांच्या भेंडोळ्या पुरवणार्‍या या नव्या दमाच्या लेखकांची कृतज्ञता विसरून कसे बरे चालेल?

तरच मग कविता कर...

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 20/09/2007 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
जपून वापर जरा शब्द करू नकोस उधळमाधळ उडून जातील कस्पटासमान घोंगावेल टीकेचे वादळ मनातल्या प्रतिमांना ओत साच्यात जरा जपून झिजत चाललेत कंगोरे तीच तीच कविता करून निसर्गाची हाक तशी अधूनमधून कानी येते सतत बोलावणे आले तर औषध घेणे भाग पडते तसे तुझे होऊ नये म्हणून सांगतो दम धर फारच दाटून आले असेल तरच मग कविता कर अत्त्यावश्यक सूचना - १. फारच दाटून आल्याने हे विनोदी शीघ्रकाव्य केले आहे. तेंव्हा ह.घ्या. २. कविता विनोदी आहे हे सांगितले आहेच. तेंव्हा जमेल तेवढे हसावे ही विनंती. ३. माझ्या यापुढील कवितांना याच कवितेतील ओळी फेकून मारू नयेत.:):)
Taxonomy upgrade extras

और एक

लेखक अप्पासाहेब यांनी गुरुवार, 20/09/2007 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
घाल झिम्मा , खेळ फुगडी, धु लुगडी सुंदरीची खा पिझ्झा, चाव चिज, झोक वाईन ईटलीची घाल टोपी , फेड धोतरं, सोड लाज जन्तेची काट पत्ते, हाण गुद्दे, कर बर्बादी सगळ्यांची ह्याला पोचव , त्याला नागव , धर डुक विषारी घाल खिशात, भर ब्यांकत, चेप माल सर्कारी ह्याची पेटव , त्याची खाजव, खेच टांग नानाची ह्याला दाब , त्याला चोप, कर एन्काउंटर मुड्द्यांची काप बकरं, मुर्गाळ मुंडी , लाव भांडणे जातीची आज साळा, उद्या क्वालिज , मार शिट्टी ईद्येची काल साकर , आज वाईन, येसीझेड हाये उद्याच्याला ह्याची आयात, त्याची निर्यात, किरकेट चा पैका दावणिला माप अल्याड, मोज पल्याड, कर लौबी बिल्डरची घे फावडे , हाण कुद्ळ, जिमीन आपल्