मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक - प्रबोधनात्मक
आवडणार्या लेखकांविषयी भरभरून लिहिले जात असताना आम्हाला आमचा प्रबोधनात्मक लेख लिहिणे अगत्याचे वाटत आहे. तसे पाहता गद्य हा आमचा प्रांत नोहे. परंतु गद्य , पद्य अथवा मद्य या विषयांमुळे ( श्लेष नाही!) बर्याच लोकांचा तोंडाचा आणि पोटाचा ( दोन्ही सुटलेले) प्रश्न सुटत असल्याचे पाहून आम्हाला आमच्या मुदपाकखान्यातले डबे-बाटल्या काढून रिकामे करण्याचा ( आणि मग बडवण्याचा) मोह आवरता येत नाही. छपाई केलेल्या पुस्तकांनंतर सुटलेल्या वाचनाचा नाद लावणार्या आतंरजालावर ठायी, ठायी सापडणार्या लेखांच्या पानांच्या भेंडोळ्या पुरवणार्या या नव्या दमाच्या लेखकांची कृतज्ञता विसरून कसे बरे चालेल? या मालिकेत उल्लेखाने मारून मारून मरकुंडीला आलेल्या लेखकांना मी अनुल्लेखाने मारण्याचा प्रमाद करतो आहे. सर्व जाणकार लोकांनी ( हे कुठे बरे सापडतात?) आमुचा प्रमाद पोटात घ्यावा. ( परत पोट!)
व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, नाट्यछटा, समीक्षा, चर्चा , मुलाखत या-ना त्या प्रकारे रिकाम्या डोक्याला आणि परिणामी हातांना सतत खाद्य पुरवणार्या या लेखकांचे आणि त्यांचा साहित्याचे मोल अजून समाजाला कळलेले नाही. काळाच्या पुढे दोन (कधीकधी वेडीवाकडी) पावले चालणार्या या समस्त साहित्यिकांच्या साहित्याचे त्यामुळे अवमूल्यन होते आहे. हे साहित्य ५०-१०० लोकांनी वाचून जर आपापल्या घरी बौद्धिक घेण्यास सुरुवात केली तर समस्त मराठी बांधवांचा घरी प्रकाशकांची रीघ लागावी तो दिवस दूर नाही. परंतु आंतरजालावर वावरणार्या मराठी लोकांची अस्मिता लयास जात आहे ( अस्मिताचे सदस्य्त्व रद्द होत आहे असा अर्थ घेऊ नये) . त्यामुळे दिसामाजी काहितरी वाचावे , प्रसंगी अखंडित लिहित जावे ही अपप्रवृत्ती हल्ली बळावली आहे. सर्वच लेखक प्रबोधन करावयास लागले तर वाचणार कोण हा कळीचा प्रश्न अजून आपणांस उमगलेला नाही. तेव्हा या मालिकेत सापडणार्या लेखकांच्या साहित्याला ग्रथंनिर्मिती ( आणि परिणामी रोजगार निर्मिती) करता योग्य न्याय मिळावा याकरता मी खेडोपाडी राहणार्या ( यात यू. एस. , यू.के. ची सो कॉल्ड गावे आली) समस्त मराठी जनतेला आवाहन करतो आहे. (आव्हान लिहिणार होतो, पण कुणाच्या धोतराला असा हात घालणे बरे नव्हे).
एकूणच नवनव्या संकेतस्थळांमुळे मराठीभाषेला आलेली उर्जितावस्था पाहता ( काय म्हणालात? कसली अवस्था?) साहित्यक्षेत्रात आशेची पहाट झाली आहे. ( आठवा किंवा नका आठवू , रविकिरण मंडळ - पूर्वाश्रमीचे सन टी क्लब यांनी काव्यविश्वात पहाट आणली होती म्हणे) . इथे लिहू का तिथे लिहू, हे लिहू का ते लिहू, असं लिहू का तसं लिहू असे नानाविविध प्रश्न लेखकांना सतावत आहेत. परंतु हे सुलक्षणच म्हणायला हवे. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ते उगाच नाही. ( शालेय जीवनात थोरामोठ्यांची वाक्ये निबंधात पेरली की जास्त गुण मिळतात असे आम्हांस शिकवले होते, त्याचा परिणाम) लेखकांचे वाढते अनुभव याचे द्योतक आहे. ( वय आणि अनुभवाबरोबर कधीकधी काही गोष्टींना वाढण्यास वाव मिळतो असे संशोधनात आढळले आहे - संदर्भ - पिंपळ आणि बांडगुळ, लेखक - अस्मादिक, किंमत - १२७ रू ५० पै फक्त. भारताबाहेर १२७ डॉ., घरपोच सेवा - त्याकरता अधिभार नाही. करमुक्त!, त्वरा करा!!!) अनुभवाबरोबरच येणारी वैचारिक प्रगल्भता ( अरे वा! किती दिवसांनी हा शब्द आम्हांस आठवला!), विचारस्वातंत्र्य, प्रचारस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य ( कोण आहे रे तिकडे?) त्याचबरोबर धडाकेबाज लिखाण, उत्तम व्यवस्थापन , लेखकांची अत्याधुनिक लेखनशैली ( शैला मला माफ कर, मला माहित नाही मी काय लिहितो आहे!) या बहुगुणी आयामामुळे साहित्यक्षेत्रात यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल याबाबत मनात किंचितही किंतु बाळगू नये.
सारांश, समस्त गळेकाढू, गळेपडू, गळेकापू सदस्यांनी ( पूर्वी सदस्य हा शब्द लायब्ररीच्या संदर्भात येत असे, मग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरता , मग महाराष्ट्र मंडळांचा संदर्भात येऊ लागला. हल्ली संकेतस्थळांसंदर्भात येतो. पैसे देणार्या सदस्यास मंडळे वर्गणीदार असे म्हणतात हा औदार्याचा भाग निराळा.) ह्या लेखकांना प्रोत्साहनपर प्रतिसाद द्यावेत , तसेच त्यांचाबद्दल जगाच्या कानाकोपर्यात बातम्या द्याव्यात ( समाचार घ्यावा, चुकलो, द्यावेत) अशी आग्रहाची विनंती करतो. ह्या लेखाचा हेतु निव्वळ समाजप्रबोधन आहे. ह्या व्यासपीठामुळे प्रबोधनास वाव मिळावा याहून आमचे अहोभाग्य नाही असे आम्ही समजतो.
करील मनोरंजन ( नीट वाचा) जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी ( हे आडनाव ऐकल्यासारखे वाटत आहे)तयाचे!
( ओळखा पाहू कोणी म्हटले आहे? पहिल्या १० भाग्यवान विजेत्यांना महाराष्ट्र राज्य भव्य सोडतीची अडीच हजारांची तिकिटे [विभागून])
-मिलिंदसुत
वाचने
14848
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
काय सुदिक कल्ले नाय बा..
प्रबोधनाचे लाडू
ओंकार स्वरुपा
सन्मान!
मस्त
कसे होईल मराठी वाङ्मयाचे?
In reply to कसे होईल मराठी वाङ्मयाचे? by चित्तरंजन भट
मिस केले!
- अमेरिकेत आल्यावर भारतात काय मिस केले?
- भारतात आल्यावर अमेरिकेत काय मिस केले?
- इंग्लंडात आल्यावर अमेरिकेत काय मिस केले?
- अमेरिकेत आल्यावर इंग्लंडात काय मिस केले?
--- बाकीच्या जोड्या वाचकांनीच जुळवा!
यावर पानेच्या पाने कुरतडत असतात. दर सकाळी उठून हे मिस केले लेख वाचले नाही की काहीतरी जाम मिस होतं.In reply to मिस केले! by प्रियाली
मध्यंतरी
आ?!!
चकित
In reply to चकित by आजानुकर्ण
अक्षम्य गुन्हा
आजचा शोध - काय रावसाहेब -- आज पावडरबिवडर जास्त लावलीय
In reply to अक्षम्य गुन्हा by ॐकार
खरंच
धोतर आणि हात घालणे
In reply to धोतर आणि हात घालणे by सन्जोप राव
शिथीलक्षम संपादन
In reply to धोतर आणि हात घालणे by सन्जोप राव
धोतर आणि हात घालणे
धोतर आणि रस्सा
In reply to धोतर आणि रस्सा by प्रकाश घाटपांडे
कोडी
धोतर आणि रस्सा
In reply to धोतर आणि रस्सा by जगन्नाथ
नाही
In reply to धोतर आणि रस्सा by जगन्नाथ
तसे म्हणणारी...
ऐतिहासिक
.