और एक
लेखनविषय:
घाल झिम्मा , खेळ फुगडी, धु लुगडी सुंदरीची
खा पिझ्झा, चाव चिज, झोक वाईन ईटलीची
घाल टोपी , फेड धोतरं, सोड लाज जन्तेची
काट पत्ते, हाण गुद्दे, कर बर्बादी सगळ्यांची
ह्याला पोचव , त्याला नागव , धर डुक विषारी
घाल खिशात, भर ब्यांकत, चेप माल सर्कारी
ह्याची पेटव , त्याची खाजव, खेच टांग नानाची
ह्याला दाब , त्याला चोप, कर एन्काउंटर मुड्द्यांची
काप बकरं, मुर्गाळ मुंडी , लाव भांडणे जातीची
आज साळा, उद्या क्वालिज , मार शिट्टी ईद्येची
काल साकर , आज वाईन, येसीझेड हाये उद्याच्याला
ह्याची आयात, त्याची निर्यात, किरकेट चा पैका दावणिला
माप अल्याड, मोज पल्याड, कर लौबी बिल्डरची
घे फावडे , हाण कुद्ळ, जिमीन आपल्या बापाची
[ गझल नव्ह ही कविता हाय, 'पाडीव - जोडीव' फरक हाय ]
वाचने
11953
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
चांगली
सुंदर..
In reply to सुंदर.. by विसोबा खेचर
असेच
अस्सल आणि
तर्री
वीररस
फालतू कविता
In reply to फालतू कविता by बाबुराव
आरारा..
In reply to आरारा.. by अप्पासाहेब
सोडाचं असतं त तव्हाच
जबरा आहे