ठाकुर भले बिराजे
लेखनप्रकार
हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले.
जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।।
काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी
झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।।
सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी
झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।।
सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते.
हे ऐकताना आधी साधेसुधे वाटले. नंतर रूपक लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. जुन्या काळी पोटापाण्यासाठी उत्तर भारतातून थेट कॅरिबियन प्रदेशात गेलेली ही माणसे. घरी परतणे तर खूपदा अशक्यच झाले असणार. त्यांची मनस्थिती काय असेल? त्या घालमेलीतून त्यांनी मार्ग कसा काढला असेल?
इतिहासाच्या अव्याहत ओघाची जाणीव आपल्यात जागृत करणे हाच तो मार्ग. "आपले घर", "आपली भूमी" ह्या गोष्टीही अनित्यच आहेत हे समजून घेतले पाहिजे, श्रीकृष्णाला देखील वेगवेगळ्या युगांत वेगवेगळ्या ठिकाणी "स्थायिक" व्हावे लागले, हे ह्या काव्यात सांगितले आहे.
आता झारखंड ह्या शब्दाचा वापर करून अर्थाला कसा पदर जोडला हे लक्षात येते. झारखंडचा मूळ अर्थ "झाडांचा प्रदेश" एवढाच. तो ऍमेझॉनच्या परिसरातल्या प्रचंड वन्य प्रदेशालाही लागू पडतो. तिथेही वृंदावनातली बासरीच वाजते आहे, हे एका ओळीत कसे सहज सांगितले आहे हे ऐकून फार कौतुक वाटते. अत्यंत साध्या घरेलू शब्दात गंभीर अर्थ बेमालूमपणे "लपवणे" ही तर खास भारतीय कला आहे. हे रचणारा कवी अथवा कवयित्री किती बुद्धिमान असेल!
अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी आहे. त्यांचे आपल्या देशावर अतिशय प्रेम आहे. पनामा हॅट घालून रम पीत बाकड्यावर बसून गप्पा हाणणा-या माणसांच्या घरी देवघरात राधेकृष्ण आहेत. हे लोक अस्सल कॅरिबियन "बेंडबाजा" वर डान्सही करतात, आणि फगवा वगैरे पारंपरिक त्यौहारही जोरात साजरे करतात.
परदेशस्थ भारतीय म्हणजे फक्त आपले उच्चशिक्षित मध्यमवर्गीय असा कधीकधी आपल्याला भ्रम होतो. ह्या लोकांना आपली संस्कृती नष्ट होते आहे असे म्हणून रडण्याची खूप सवय आहे. खरा परदेशस्थ भारतीय समाज किती अठरापगड आहे, आणि त्यांनी मुळीच आरडाओरडा न करता आपली संस्कृती कशी सहज टिकवली आहे, त्यातून आपण शिकले पाहिजे.
इथे एकदा मला एका अरब टॅक्सीवाल्याने सांगितले होते की इंडियन लोकांचे कौतुक वाटतं. कारण ते परदेशात कितीही राहिले तरी आपलं सोडत नाहीत म्हणून. तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ...
वाचने
20498
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
:-)
भाषेचा गोडवा! :)
In reply to भाषेचा गोडवा! :) by विसोबा खेचर
भाषेचा गोडवा
In reply to भाषेचा गोडवा! :) by विसोबा खेचर
हां सापडलं गाणं तात्या . . .
In reply to हां सापडलं गाणं तात्या . . . by जगन्नाथ
सध्या शेअर बाजारात बसलो आहे,
सर्टीतिकीट
अभियंते व डॉक्टरांनी काय घोडे मारले आहे?
अभियंते व डॉक्टरांनी काय घोडे मारले आहे?
In reply to अभियंते व डॉक्टरांनी काय घोडे मारले आहे? by जगन्नाथ
जगन्नाथराव,
In reply to अभियंते व डॉक्टरांनी काय घोडे मारले आहे? by जगन्नाथ
का?
In reply to का? by बेसनलाडू
का?
In reply to का? by जगन्नाथ
बापरे
In reply to का? by जगन्नाथ
करतात काय
In reply to का? by जगन्नाथ
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
aa वगैरे
सांज ये
In reply to सांज ये by प्राजु
सांज ये
स्पष्ट
धन्यवाद