लव्ह मॅरेज की ऍरेंज ? तुम्ही नाव द्या.
आठवतो तुला तो दिवस?
ज्या दिवशी आपण गुंतलो एकमेकांत!
आधिच निरोप आला होता
फक्त पाहायला येणार आहात
आधीही पाहील होतस लांबुन
मी तुला आणि तु मला
आवडले म्हणूनच आलास परत
तुझ्या परीवाराला घेऊन
मला दाखवायला अन निरखायला.
आतच बसले होते मी
धडधडणारे ठोक्यांवर मात करत.
एकीकडे तुला पाहण्याची ओढही होती
तुही आवडला होतास मला
म्हणूनच तर हुरहुर चालू होती
मला बोलावल तुझ्या आत्पेष्टांनी
मी आले तुमच्या समोर
थरथरणार्या कप बशांना सावरत !
सगळ्यांची नजर एकदाच
माझ्यावर शांत झाली,
कपबशांची किणकिण मात्र
जास्तच जाणवू लागली.
मला बसवले तुमच्या सोबत
तुझ्याच माणसांनी आणि विचारले ,
"आमचे घर सांभाळशील का ?
Taxonomy upgrade extras
मिसळपाव