Skip to main content

साम्य

लेखक चित्रा यांनी सोमवार, 28/02/2011 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
नॅशनल जिऑग्राफिकमधील (फेब्रुवारी २०११) 'अंडर पॅरिस' या लेखामुळे आणि त्यातील काही छायाचित्रांमुळे सुचलेले हे मुक्तक.
काव्यरस

लेमन ड्रिझल केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 27/02/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १७५ ग्राम साखर २ अंडी फ्रिजमधुन बाहेर काढुन ठेवणे १५० ग्राम मारगरीन किंवा तूप एका लिंबाचे किसलेले साल १७५ ग्राम मैदा १२५ मिलि दूध लेमन सिरप चे साहित्यः १४० ग्राम पिठीसाखर ५० मिली लिंबाचा रस पाकृ: १८० डिग्री वर ओव्हन गरम करायला ठेवणे.

माझी गाव भेट

लेखक निनाव यांनी रविवार, 27/02/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आहे परवाचीच गोष्ट जाऊन आलो गावा यावे चार दिवस राहून विचार असा झाला बायको पोर होते सोबत आणि घेतली होती तिकीट.अ पिशव्या होत्या हातात तिच्या माझ्या, आठवणींची होती ब्याग.अ पोहोचताच, गावाची मारून फेरी निजलो औदुंबर खाली येताच झुळूक वार्याची विलक्षण अनुभूती झाली मग, ज्यांचे होते पत्ते भेटलो त्यांना जाऊन जे होते हारवले त्यांना डोळे लावून बदलही जाणविले थोडे... झाले होते मातीचे डांबर झाले होते शेणाचे सिमेंट वाढले होते वय झाडांचे , मात्र पोर-खेळ होते तसेच आलो भेटून सर्वांना पोरांना गोधडया मिळाल्या पिशव्या झाल्या होत्या रिकाम्या मात्र ब्यागा तश्याच परतल्या..

सदसद्विवेक बुद्धी

लेखक यनावाला यांनी रविवार, 27/02/2011 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
पं.महादेवशास्त्री जोशी यांचे आत्मपुराण हे चरित्रात्मक पुस्तक आहे. त्यांनी सुरू केलेल्या ज्योतिष कार्यालयासंबंधीची हकीगत त्या पुस्तकात आहे.

आणखी काही महत्वाचे

लेखक अनिल आपटे यांनी रविवार, 27/02/2011 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी काही महत्वाचे अभ्यासातील एकाग्रता महत्वाची. माणसातील माणुसकी महत्वाची. मुंग्या मधली शिस्त महत्वाची मधमाशांची चिकाटी महत्वाची मंदिरातील पावित्र्य महत्वाचे स्र्त्रीचे चारित्र्य महत्वाचे घराच घरपण महत्वाचे मायबापाचे आशीर्वाद महत्वाचे नारायणाचे रोजचे उगवणे महत्वाचे चंद्राची शीतलता महत्वाची भजन रंगणे महत्वाचे साखरेची गोडी महत्वाची फलातली रसाळता महत्वाची ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी महत्वाची. तुकारामाची गाथा महत्वाची

जागतिक मराठी दिन की अगतिक मराठी दिन?

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 27/02/2011 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज जागतिक मराठी दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्या शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यातच कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीस या वर्षीपासून सुरूवात होत असल्याने या वर्षीचा जागतिक मराठी दिन विशेष महत्वाचा आहे. पण जागतिक मराठी दिन साजरा होत असताना आज मराठीची नेमकी स्थिती कशी दिसते? सोनेरी मुकुट परिधान केलेली मराठी अंगावर लक्तरे घालून मंत्रालयाच्या दारात उभी आहे असे वक्तव्य कुसुमाग्रजांनी एकेकाळी केले होते, पण त्यांचे ते म्हणणे शासनाला उद्देशून होते. त्यावेळी मराठीला लोकाश्रय तरी होता; आज मात्र दुर्दैवाने तसे म्हणता येणार नाही.

माझिया मराठीचिया कवतिके

लेखक प्रदीप यांनी रविवार, 27/02/2011 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. माधव भावे गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ भारताबाहेर रहात आहेत. त्यांची पत्नी सिंगापूरी चिनी आहे, आणि अनेक वर्षे आन्तरराष्ट्रीय बँकांत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत राहिल्यावर आता श्री. भावे त्यांच्या क्षेत्रात सल्लागाराचे काम करतात. ह्या सगळ्या जंजाळांत त्यांचे मराठी संस्कृतीचे, मराठी भाषेचे भान सुटलेले तर नाहीच, उलट ते उत्तरोत्तर अधिकाधिक दॄढ होत गेले आहे. सुमारे दीड दशकांपूर्वी ते माझ्या गावात असतांना येथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी त्यांच्या ह्या मराठी प्रेमाची चुणुक मला दिसली होती.
विशेष

जागतिक मराठी दिन -- उभ्या उभ्या विनोद

लेखक संदीप चित्रे यांनी रविवार, 27/02/2011 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्र-मैत्रिणींनो, 'जागतिक मराठी दिन' ह्या निमित्ताने आमच्या 'उभ्या उभ्या विनोद' अर्थात मराठी स्टँड अप कॉमेडी कार्यक्रमाची ही एक झलक! दोन वर्षांपूर्वीच्या आमच्या एका कार्यक्रमाची झलक दाखवणारी ध्वनि-चित्रफीत मिपावर इथे बघता येईलच. कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती हवी असेल किंवा चौकशी करायची असेल तर मला जरूर व्यनि पाठवावा. 'जागतिक मराठी दिन' जोरदार साजरा होवो ह्या शुभेच्छा!
विशेष

आयज जागतिक मराठी दिन .. त्यानिमतान कांय कोकणी कवितांचो अणकार

लेखक प्रीत-मोहर यांनी रविवार, 27/02/2011 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा ताई च्या लेखात लिहिल्याप्रमाणे कोकणी- मराठी ह्या बहिणी आहेत हे तर कळलेच असेल . तर आता आपण काही कोकणी रचना पाहुया कोकणी कविता- विश्वात , मराठी वाचकांच श्रद्धास्थान , अभिजात लेखक व कवी श्री. बा भ. बोरकर उर्फ आमचे बाकीबाब ह्यांना एक आदरणीय स्थान आहे .
Taxonomy upgrade extras