आहे परवाचीच गोष्ट
जाऊन आलो गावा
यावे चार दिवस राहून
विचार असा झाला
बायको पोर होते सोबत
आणि घेतली होती तिकीट.अ
पिशव्या होत्या हातात तिच्या
माझ्या, आठवणींची होती ब्याग.अ
पोहोचताच,
गावाची मारून फेरी
निजलो औदुंबर खाली
येताच झुळूक वार्याची
विलक्षण अनुभूती झाली
मग,
ज्यांचे होते पत्ते
भेटलो त्यांना जाऊन
जे होते हारवले
त्यांना डोळे लावून
बदलही जाणविले थोडे...
झाले होते मातीचे डांबर
झाले होते शेणाचे सिमेंट
वाढले होते वय झाडांचे , मात्र
पोर-खेळ होते तसेच
आलो भेटून सर्वांना
पोरांना गोधडया मिळाल्या
पिशव्या झाल्या होत्या रिकाम्या
मात्र ब्यागा तश्याच परतल्या..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1274
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान...
तरी सांगत होतो
In reply to छान... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुलासा...
निनाव -शब्द असा आहे -गोधड्या
प्रकाश दा, खरंच आभार! :)
गोधडी