मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उभ्या उभ्या विनोद (अर्थात स्टँड अप कॉमेडी)

संदीप चित्रे · · जनातलं, मनातलं
मिपाकर मित्र/मैत्रिणींनो.... न्यू जर्सीतील आम्हा काही जणांचा एक उभ्या उभ्या विनोद करणारा संघ आहे :) मध्यंतरी आम्ही महाराष्ट्र फाऊंडेशनच्या निधी उभारणी साठी साधारण सव्वा तासाचा एक कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे 'तू नळी'वर उपलब्ध आहेत. ह्या ध्वनि-चित्रफितीमधे चुकून माझे नाव 'सुरेश' असे दिसते पण नवीन चित्रफीत मिळाली की हा दुवा बदलीन. सादरकर्ते -- अनुक्रमे --
  • शुभदा कामेरकर
  • प्रशांत गिजरे
  • सुरेश जोशी
  • वैशाली फणसे
  • विनय देसाई
  • अस्मादिक !!!
तर ही ध्वनि-चित्रफीत जरूर पहा आणि अभिप्राय कळवा :)

वाचने 7903 वाचनखूण प्रतिक्रिया 23

समिधा 20/01/2009 - 06:37
खुप छान आहे, ह्या कार्यक्रमाचे अजुन काही भाग कुठे बघता येतील?

ऋषिकेश 20/01/2009 - 07:23
लै भन्नाट.. मजा आली.. त्यातहि ऐकु येणारा सिग्नल आण स्पीडोमीटर तर ह. ह्. पु.वा. मजा आली.. तुमच्या "कटपीस" कोपरखळ्याहि आवडल्या

रेवती 20/01/2009 - 07:29
मस्त रे संदीप! पुन्हा एकदा प्राजुच्या घरी केलेला कार्यक्रम आठवला. तुमचा सगळा गृपच चांगला आहे. शुभेच्छा! रेवती

अनिल हटेला 20/01/2009 - 07:31
ताग्या सोबत कटपीस !!! :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मीनल 20/01/2009 - 07:54
मला ही चिपोट्ले आणि स्टॉप साईन सर्वात आवडले. बाकीचेही संपूर्ण पहायला /ऐकायला आवडेल. मीनल.

In reply to by मीनल

कोलबेर 20/01/2009 - 09:04
चिपोटले?? अहो ते खाण्याचे (फास्ट फूड) दुकान आहे. ते तुम्हाला कुठल्या विनोदात आढळले? :O तुम्हाला चिपन्डेल म्हणायचे आहे का??जरा नीट बघा ते वेगळेच आहे. विनोदातल्या १, १ डॉलरच्या नोटा काय बरीटो खायला वापरल्या असे वाटले का काय तुम्हाला? =))

सहज 20/01/2009 - 08:07
तुमचा ग्रुप चांगला आहे. अजुन चित्रफिती चढवल्यात की नक्की दुवे द्या. शुभेच्छा!

शितल 20/01/2009 - 08:12
संदीप, माझ्याकडे तुझ्या स्टँड अप कॉमेडीचा व्हिडीओ आहे. देऊ का लिंक येथे.

रामदास 20/01/2009 - 08:30
हसण्यासाठी विनोदाचा ताजा स्टॉक हाताशी आला.अर्थात कमीच पडला.आणखी असेल तर पाठवा. सगळे कलाकार प्रोफेशनल वाटतात.शिरीष कणेकरांच्या प्रयोगाची आठवण झाली. अभिनंदन. प्राजूताईंकडे जो कट्टा झाला त्यात याच कार्यक्रमाचा उल्लेख होता असे वाटते.

मिपाकर मित्र/मैत्रिणींनो... क्लिप लगेच पाहून... तितक्याच उत्साहाने लगेच अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद :)

प्राजु 20/01/2009 - 09:24
मस्त आहे ही क्लिप. इथे कट्ट्याच्या वेळी तू सादर केलेला तुझा कार्यक्रम आठवला. आणि तेव्हा उडालेले हास्याचे फवारे आठवले. मस्त. तुमच्या या ग्रुप ला माझ्या शुभेच्छा! (ते ईप्रसारणचे तेवढे मनावर घे आता) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वृषाली 20/01/2009 - 11:45
चित्रफित मस्त आहे.ग्रुपही चांगला आहे. अजुनही कार्यक्रम पहायला आवडतील.

चित्रे मास्तर, मस्तच आहे टीम आणि प्रोग्राम पण मस्तच रे. जरा पूर्ण फीत दे की रे. :) दुबईचे कार्यक्रम घेता का? ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 22/01/2009 - 08:31
चित्रे मास्तर, मस्तच आहे टीम आणि प्रोग्राम पण मस्तच रे. जरा पूर्ण फीत दे की रे. हेच बोल्तो! :)

In reply to by विसोबा खेचर

द्यायची इच्छा आहे पण अजून काही कार्यक्रम झाले की मग देऊ असे ठरले. प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी सर्व मिपाकरांचे आभार.