सदसद्विवेक बुद्धी
पं.महादेवशास्त्री जोशी यांचे आत्मपुराण हे चरित्रात्मक पुस्तक आहे.
त्यांनी सुरू केलेल्या ज्योतिष कार्यालयासंबंधीची हकीगत त्या पुस्तकात आहे. त्यांतील
काही भाग त्यांच्याच शब्दांत असा:---
"पणजीत मध्यवस्तीत जागा मिळवली आणि पाटी झळकवली :-
’ज्योतिष कार्यालय: इथे ज्योतिषविषयक सर्व कामे केली जातील.’
पाटी पाहून लोक यायला लागले.पत्रिका करू लागलो.त्यांतील ग्रहांचे लाभयोय, त्रिकोणयोग,नवपंचमयोग,युती ,प्रतियुती तसेच गोचरीतल्या ग्रहांचे जन्मपत्रिकेतील
ग्रहांशी योग हे सगळे लक्षात घेऊन जातकशास्त्रानुसार भविष्य सांगू लागलो.
थोड्याच दिवसांत लक्षात आले की माझी भविष्यवाणी खरी उतरत नाही.जेमतेम
पंचवीस टक्के जमायचे.तसेच शास्त्राच्या नियमांविषयीं सुद्धा शंका निर्माण झाली.लग्नी
रवि असेल तर माणूस उंच हे शास्त्र.पण लग्नी रवि असलेला एखादा उंच, एखादा मध्यम
तर काही बुटके आढळू लागले.
माझा आत्मविश्वास ढळला.
गोव्यात एक ख्यातनाम ज्योतिषी होते.त्यांच्याकडे माणसांची रीघ लागलेली असायची.
त्यांना भेटून शिष्यस्तेSहम् म्हटले.ते पृच्छकाशी कसे बोलतात ते लक्षपूर्वक ऐकू लागलो.
ते नेमके उत्तर कधीच देत नसत.पृच्छ्काला बोलके करीत. प्रश्न विचारून त्याच्याकडूनच
सगळी माहिती घेत. मग तेच सगळे मोठ्या चतुराईने सांगून आपण अचूक भविष्य वर्तविले
असे भासवीत.वायदे देत ते षण्मासीचे:-तुझे काम नक्की होणार .पण तीन महिने लागतील.
ग्रहदशा बदलली की अडचणी संपतील.सध्या वक्री असलेला मंगळ तेवढा सरळ होऊं दे.
मग सगळे सुरळीत होईल.
हे ऐकून आशा पल्लवित झालेला पृच्छक मान डोलवायचा.
त्या भास्कराचार्याला एक भाबडी शंका विचारली,"...पण यांत जातकशास्त्र येतेच कुठे?"
"जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात.इथे शब्दजंजाळच
कामी येते.समोरच्या माणसाचे बारीक निरीक्षण करायचे.भविष्य सांगायचे ते चांगलेच सांगायचे.त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचे.अहो,हा धंदा आहे. यांत तुमचे वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके भविष्यकथन अचूक.शास्त्राला धरून भविष्य वर्तविणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे."
मी हिरमुसला होऊन परतलो.छे:, हे असले भविष्यकथन आपल्याला बापजन्मी जमायचे नाही.किती दिवस मी लोकांना आणि स्वत:लाही फसवीत राहू?.मला जाणवले की ज्योतिष हा माझा जीवन व्यवसाय होऊ शकणार नाही.मग एके दिवशी निर्धार करून ज्योतिषकार्यालयाची पाटी स्वहस्ते खाली काढली.
त्या दिवसापासून आजपावेतो कोणताही ज्योतिषग्रंथ उघडला नाही.फलज्योतिष या
विषयावर मी कायमचा पडदा टाकला."
....
फलज्योतिषशास्त्रावर पूर्ण विश्वास ठेवून,त्याचा सांगोपांग अभ्यास करून मोठ्या उमेदीने ज्योतिष व्यवसाय सुरू करणार्या शास्त्रीबुवांचा हा सत्य अनुभव आहे."किती दिवस मी लोकांना आणि स्वत:लाही फसवीत राहू?" अशी अंत:प्रेरणा झाली ती सदसद्विवेकबुद्धी जागृत असल्यामुळे.
ती नसती आणि जीवनव्यवसाय म्हणून सोडा पण जोडधंदा म्हणून ज्योतिष कार्यालय सुरू ठेवले असते तरी पं.महादेवशास्त्री जोशी हे गोव्यातील जनमान्यताप्राप्त विख्यात ज्योतिषी होऊ शकले असते.आर्थिक प्राप्ती ही चांगली झाली असती.मात्र सदसद्विवेक दडपून टाकल्याची टोचणी सतत राहिली असती. ते चांगल्या चित्रपटकथा लिहू शकले नसते.भारतीय संस्कृतिकोशाची रचना झाली नसती.
................................................................................................................................
कृपया कोणताही पूर्वग्रह न ठेवता या सत्य अनुभवावर विचार करावा.मग जे काही बुद्धीला पटेल ते मानावे.
**********************************************************************************
वाचने
35370
वाचनखूण
प्रतिक्रिया
79
ज्योतिषी लोकांकडून भविष्य
सही!
डेव्हिल्स अॅडव्होकेट
धन्यवाद
In reply to धन्यवाद by चित्रा
सहमत आणि सहमत
धन्यवाद
ऊत्तम
अरे वा! यनावालांचे मिपावर
In reply to अरे वा! यनावालांचे मिपावर by Nile
+१
स्वागत
In reply to स्वागत by विकास
उत्तम लेख.
In reply to उत्तम लेख. by ३_१४ विक्षिप्त अदिती
फक्त भविष्य आणि कम्युनिझमच
श्री यनावालासेठ यांचे मिपावर
लेख आवडला, माझा भविष्यावर
नाडीग्रंथांवर मत मांडावे...
उत्तम लेख
आजवर कुतुहलापोटि अनेकांकडे
असले भविष्य
व्यक्ती चुकीची असली म्हणून शास्त्र चुकिचे ठरत नाही
या इथे कोणी काहीही म्हंटलेले
In reply to या इथे कोणी काहीही म्हंटलेले by विजुभाऊ
विजुभाऊंचे "णाडीप्रेम "
व्यक्ती चुकीची असली म्हणून शास्त्र चुकिचे ठरत नाही
In reply to व्यक्ती चुकीची असली म्हणून शास्त्र चुकिचे ठरत नाही by आत्मशून्य
+१
मस्त लेख
In reply to मस्त लेख by टारझन
जोरदार
मला अनुभव नही म्हणून एखादी चीज अस्तित्वात नही,
भ्रुगु संहिता बरोबर असते असा
"मला अनुभव नाही म्हणून एखादी
In reply to "मला अनुभव नाही म्हणून एखादी by गवि
ज्योतिष, भविष्य, तारे ग्रह,
In reply to ज्योतिष, भविष्य, तारे ग्रह, by Nile
शास्त्र म्हणून बघायचे नाही
In reply to शास्त्र म्हणून बघायचे नाही by गवि
फरक
In reply to "मला अनुभव नाही म्हणून एखादी by गवि
अश्या विचारपद्धतीने जगात
In reply to अश्या विचारपद्धतीने जगात by आत्मशून्य
तुमचे उदाहरण निरुत्तर करणारे बिनतोड वाटते आहे..
In reply to तुमचे उदाहरण निरुत्तर करणारे बिनतोड वाटते आहे.. by गवि
खी खी खी. =)) =)) हे म्हणजे
In reply to खी खी खी. =)) =)) हे म्हणजे by Nile
हे म्हणजे एड्स रोग बरा करायला
In reply to हे म्हणजे एड्स रोग बरा करायला by आत्मशून्य
स्वतः अनुभवणे हा अर्थ
In reply to स्वतः अनुभवणे हा अर्थ by Nile
स्वतः अनुभवणे हा अर्थ
In reply to स्वतः अनुभवणे हा अर्थ by आत्मशून्य
हास्यास्पद
In reply to हास्यास्पद by Nile
किंचीत दुरुस्ती
In reply to हास्यास्पद by Nile
भलतेच वीनोदी लेखन ह.ह.पू.वा.
In reply to भलतेच वीनोदी लेखन ह.ह.पू.वा. by आत्मशून्य
>>पुलेशू. गरज नाही,
In reply to >>पुलेशू. गरज नाही, by Nile
माझ्याकडेच ठीऊ ? र्हायलं
In reply to तुमचे उदाहरण निरुत्तर करणारे बिनतोड वाटते आहे.. by गवि
साहेब थोडे लवकर बूच मारलेत
In reply to "मला अनुभव नाही म्हणून एखादी by गवि
@गगनविहरी
In reply to @गगनविहरी by सामान्य वाचक
तेच..
बर्याच वेळेला माणासाची
In reply to बर्याच वेळेला माणासाची by अभिज्ञ
सहमत आहे
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
खि खि खि
In reply to खि खि खि by टारझन
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
तेच तेच लिवुन आमचच
In reply to तेच तेच लिवुन आमचच by टारझन
टनाटन तारझणराव
In reply to बर्याच वेळेला माणासाची by अभिज्ञ
बर्याच वेळेला माणासाची
कुठलीही गोष्ट 'नाही' म्हणायला जास्त कष्ट लागतात
In reply to कुठलीही गोष्ट 'नाही' म्हणायला जास्त कष्ट लागतात by सामान्य वाचक
बरोबर आहे. पण मी समजा पुण्यात
In reply to बरोबर आहे. पण मी समजा पुण्यात by नगरीनिरंजन
ही कूपमन्डूक व्रुत्ति झाली
In reply to ही कूपमन्डूक व्रुत्ति झाली by सामान्य वाचक
जे समुद्र आहेत असे म्हणतात
In reply to जे समुद्र आहेत असे म्हणतात by नगरीनिरंजन
या
In reply to या by गवि
आहे म्हणणार्यांना विरोध
In reply to या by गवि
>>या वादाला अंत नाही. कोणीच
In reply to >>या वादाला अंत नाही. कोणीच by Nile
१. माझ्या काही मित्रांनी
In reply to १. माझ्या काही मित्रांनी by आत्मशून्य
>>जाहीरात पोस्टर काय भाँदू
In reply to >>जाहीरात पोस्टर काय भाँदू by Nile
मेंदुची कवाडं बंद
धंदा आहे खरा!
In reply to धंदा आहे खरा! by पंगा
हुच्च
श्रेय
आत्मवंचना
In reply to आत्मवंचना by यनावाला
साहेब भवीष्य वर्तवता येते की नाही इतपतच वीशय मर्यादीत ठेवूया
In reply to साहेब भवीष्य वर्तवता येते की नाही इतपतच वीशय मर्यादीत ठेवूया by आत्मशून्य
+१
In reply to +१ by मूकवाचक
जगन्नाथ कुंट्यांच्या नर्मदा
In reply to जगन्नाथ कुंट्यांच्या नर्मदा by नगरीनिरंजन
असो ...
In reply to असो ... by मूकवाचक
स्थळ, काळ आणि परिस्थितीचे
In reply to साहेब भवीष्य वर्तवता येते की नाही इतपतच वीशय मर्यादीत ठेवूया by आत्मशून्य
सहमत
In reply to आत्मवंचना by यनावाला
चिकीत्सा वगैरे
अर्रर.. एका चांगल्या
आत्ताच वाचलं ट्विटरवर शेन वॉर्नने २४ तास आधीच भारत-विंग्रज
In reply to आत्ताच वाचलं ट्विटरवर शेन वॉर्नने २४ तास आधीच भारत-विंग्रज by आत्मशून्य
"Can't believe my prediction
In reply to "Can't believe my prediction by Nile
बरं मग ?
In reply to बरं मग ? by आत्मशून्य
इंग्रजी कळत नाही? अरे रे.
In reply to इंग्रजी कळत नाही? अरे रे. by Nile
ह.ह.पू.वा.