Skip to main content

असे शब्द होते.. तसे शब्द होते..!

लेखक रसप यांनी गुरुवार, 29/03/2012 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
असे शब्द होते तसे शब्द होते जसा अर्थ घ्यावा तसे शब्द होते कुणा ना कळावे खरे काय होते असे मुक्त वेडे तुझे शब्द होते श्रवून जाहले ते लिहून घेतले ते जपून ठेवले ते खुळे शब्द होते जगी जाणकार कुणी ही असू दे कविता म्हणाया खुजे शब्द होते प्रतिभेस माझे साष्टांग नमन समजलेच नाही कसे शब्द होते अनुवाद व्हावा जरा इंग्रजीत मराठीत बहुदा न हे शब्द होते ऐकता वाचता जाहलो "आडवा" तरीही उरावर उभे शब्द होते..!! (एक जुनीच कविता) ....रसप.... ०३ जानेवारी २००९ http://www.ranjeetparadkar.com/2009/01/blog-post_03.html
काव्यरस

धरणी माय....

लेखक अमितसांगली यांनी गुरुवार, 29/03/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
कत्तल करुनी वृक्षांची, अनाथ केले भू-मातेला, जंगले बांधूनी सिमेंटची, वाकुल्या दाखविल्या निसर्गाला, चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? डोस पाजूनी रासायनिक खतांचे, शोषण केले मातीच्या गुणधर्मांचे हव्यास धरुनी अति -उत्पनांचे, दिवस दाखविले वान्झत्वाचे चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, सुपीकता म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? विवस्त्र करुनी निसर्गाला, हिंस्रपणे ओरबाडले वरून धूर काढला तर खालून पाणी उपसले उत्सर्जन करुनी विषारी वायूंचे , ओझोनचे काळीज फाडले चटके देऊ
काव्यरस

इडंबन की जय हो...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 29/03/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंप्रेरणा :- ज्या http://www.misalpav.com/node/21154 या धाग्या वरुन हे गीत स्फुरले, त्या धाग्याचे हे गीत म्हणजे स्वयं-उपशमनच आहे ;-) भगवंता रे भगवंता,खरच सांग.....हे काय झाले? टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?

रंग...!

लेखक वेणू यांनी गुरुवार, 29/03/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक रंग माझ्या ओंजळीत दिलेस... अगदी हळूवारपणे... हरखून गेले ते रंग पाहताना... माझ्या ओल्या डोळ्यात त्या इंद्रधनूचं प्रतिबिंब तरळलं.... नजर हलेना माझ्याच भरलेल्या ओंजळीवरून... तू : पाहतेस काय? मी : हे...... हे रंग.. कित्ती आहेत!! सुंदर एक- एक... तू : हम्म, तुझेच आहेत मी :सारे? तू : हो मी :काय म्हणू? तू : डोळ्यांनी सांगितलं सारं..

बाळाचा चाळा- कंटाळा !!!!!

लेखक बॅटमॅन यांनी गुरुवार, 29/03/2012 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
नोंदः सध्या मिपावर चालू असलेला कविता, नवकविता आणि विडंबनाच्या जिलब्यांचा पाऊस पाहून आम्ही ही बरेच दिवस आधी पाडलेली ब्लॉगवरील जिलबी सादर करीत आहोत.
काव्यरस

<उगा मारखा>

लेखक रमताराम यांनी गुरुवार, 29/03/2012 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: मित्रवर्य अन्या दातार यांची हीनि कविता नि दुसरी अतृप्त आत्मा यांचेहे विडंबन आणि अर्थातच महिला मंडळाकडून मार खाण्याचे आमचे आजचे भविष्य. मंद बायका त्या कडाडती घरी पती गर्भगळित सदोदित । जसा वनवास करे हतोत्साही तसा सहवास जीवघेणा । दुर्लंघ्य सागर जैसे तुझे मन भलतेच पैलू दावितसे । तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट निघायची वेळ आता वेणीफणी? टीपः वास्तववादी कविता लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, जमली नसल्यास आधुनिकोत्तर आहे असे समजावे.

तो

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 29/03/2012 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
तो पोखरतोय आतून............. उत्खननातून; एकेक कविता बाहेर काढतोय.............. कींमती जगणं आणि जगण्याची किंमत ह्यांची तौलनिक मिमांसा करतोय............... खर्‍या खोट्याची आपल्या परक्याची रुजवात घालून देण्यासाठी आलाय तो.................... आयुष्यभराच्या ओळखीचे; परिचय झालेत त्या निमित्ताने................. मुखवट्यापलिकडचे चेहरे दृष्टीपथात आलेत........... झटताहेत सर्वच कर्तव्यापोटी आपापली कामे सांभाळून.................... कुणी; जणीव करून देताहेत आल्याची; एक उपचार म्हणून................ खरं तर आता कार्य थांबलंय................ उपयुक्तताही संपलीय................. अस्तित्व आहे ते केवळ; कुणाच्यात
काव्यरस

विडंबन नीट होण्यासाठी काय करावे ?

लेखक सूड यांनी गुरुवार, 29/03/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली काय झालंय कळत नाही. विडंबनाची कळ येते पण एकदा विडंबनाला बसलं की होत मात्र काहीच नाही. कधी होतंय होतंय म्हणता काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. कविसंम्मेलन वटी घ्या असं एका हितचिंतकाने सुचवलं पण काहीच फरक पडला नाही. एकाने घाबरगुटीका घ्यायचं सुचवलं, म्हणाला भयरसातली विडंबनं नीट होतील. पण जैसे थे. विडंबन नीट व्हावं म्हणून आपण काय करता ? मला दिवसाला नाही तरी किमान आठवड्यास एक विडंबन होणं गरजेचं आहे. त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही. कृपया काही उपाय सुचवा.

ती

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 29/03/2012 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांचे मला माहीत नाही, पण मला ती फारच हवीहवीशी वाटते. तिच्यात काय आहे एवढे? अहो, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडली पाहिजे असे कुठे आहे? मला मात्र ती आवडते. विशिष्ट वेळ झाली, संकेत झाला की मला तिच्या येण्याचे वेध लागतात. मन अनावर होते. शरीर बंड करू लागते. अर्थात, मी काही तिला मोबाईल उचलून हाक घालत नाही. केवळ तशी प्रथा नाही म्हणून. एरव्ही तेही आवडले असते. तिचे वर्णनच करायचे झाले तर फार बहारीचे होईल. मात्र हल्ली इंग्लिशमध्ये जर वर्णन केले नाही तर त्याला फारशी 'व्हॅल्यू' नसते.

व्युत्क्रमी परिकर्म

लेखक निनाद यांनी गुरुवार, 29/03/2012 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
व्युत्क्रमी परिकर्म स्वयं-संतुलन कच्चीजप्ती शंकुचाचणी अवसीदन। मिथ्या शस्त्रक्रिया स्व-विमोची रूपद बीजगुणन॥ दुय्यम उघाड दोलनलेखी मळसूत्रउत्परिवर्तन। वालुकाश्मी भित्ति बीज चाचणी अपवाहचक्रन॥ वैतनिकपद व्युत्क्रमी परिकर्म सदापदावर्तन। स्थूनांकन दोष अपवाह गुणांक वनसंशोधन॥ प्रतिवेदक अधिकारीसंचय वायु पुनर्मूल्यन। लालसावर प्रारणप्रतिक्षेप परिपथ प्रत्यावर्तन॥