विडंबन नीट होण्यासाठी काय करावे ?
हल्ली काय झालंय कळत नाही. विडंबनाची कळ येते पण एकदा विडंबनाला बसलं की होत मात्र काहीच नाही. कधी होतंय होतंय म्हणता काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं.
कविसंम्मेलन वटी घ्या असं एका हितचिंतकाने सुचवलं पण काहीच फरक पडला नाही. एकाने घाबरगुटीका घ्यायचं सुचवलं, म्हणाला भयरसातली विडंबनं नीट होतील. पण जैसे थे.
विडंबन नीट व्हावं म्हणून आपण काय करता ? मला दिवसाला नाही तरी किमान आठवड्यास एक विडंबन होणं गरजेचं आहे. त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही. कृपया काही उपाय सुचवा.
वाचन
9147
प्रतिक्रिया
0