नोंदः सध्या मिपावर चालू असलेला कविता, नवकविता आणि विडंबनाच्या जिलब्यांचा पाऊस पाहून आम्ही ही बरेच दिवस आधी पाडलेली ब्लॉगवरील जिलबी सादर करीत आहोत.
वृत्त- स्रग्धरा.
कंटाळा पूर्ण पाळा, वळवळवळिता , रोडका होशि बाळा |
देहाचा सान गाळा, शिणवुनि विरळा, का करावा कृपाळा?
लागावा छान चाळा, बघत बस नळा, तोय वाहे खळाळा |
किंवा येंगोनि माळा, सकलहि झुरळां, मारि रे चंडकाळा ||१||
वृत्त- शार्दूलविक्रीडित.
चित्ती नाद उठे मनी पुटपुटे, आलस्य हे गोमटे |
कैसा दीस उठे व रातहि कटे, दोघे जसे भामटे |
तोंडीची जरि मक्षिका नच फुटे , तादात्म्य वाटे, पटे |
जे कोणी दिवटे जगात फुकटे, हे त्यांपरी ओखटे ||२||
वृत्त- उपजाति.
आलस्य आहे जगतात थोर |
तयाविना विश्व पुरे असार |
तयाविना कार्य महत्वहीन |
तेणेगुणे शीण नसे “रुटीन”||३||
वृत्त- उपजाति.
म्हणाल का लावियले पुराण?
उपाय जो ह्यावरि रामबाण |
तो ऐकता सोडुनिया उसासे |
आलस्यभृत्यांत जावे अपैसे ||४||
- कंटाळा ब्लॉग चे प्रेरणे बद्दल आभार.
http://kantala.blogspot.in/
आणि सरतेशेवटी -
वृत्त- द्रुतविलंबित.
न कळता पद अग्निवरी पडे| न करि दाह असे न कधी घडे |
अलस नाम वदों भलत्या मिसें| सकल कार्यचि भस्म करीतसे||५||
– श्री .वामन नरहर शेषे, राहणार कोरेगाव कुमठे (सातारा) , यांची क्षमा मागून (!)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3793
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
बॅटमॅन साहेब , मस्त मस्त मस्त कविता
आवडली!
लै भारी.
तुम्ही हल्ली एकालाही सोडु
In reply to लै भारी. by प्रचेतस
अहो प्रतिसादच टाकतोय, विडंबन
In reply to तुम्ही हल्ली एकालाही सोडु by शैलेन्द्र
___/\___
छान!
बाळाचा चाळा -
वृत्तबद्ध जिलब्या छान
चवदार जिलबि...
तेथे मी खुशाल करतो त्यांची इथे संस्तुती
कंटाळा डीटेलवारी व्यक्त
In reply to तेथे मी खुशाल करतो त्यांची इथे संस्तुती by नरेंद्र गोळे
उरी कळवळा वाहे खळखळा देखोनी
कंटाळ्याचा चाळा हा पाळा तीच
In reply to उरी कळवळा वाहे खळखळा देखोनी by यकु
कंटाळा तो खुळा करीतसे वळवळा
In reply to कंटाळ्याचा चाळा हा पाळा तीच by बॅटमॅन
अरे देवा....मिपाला झालंय काय?
कंटाळ्याचा पुरस्कार न
या काव्यरसाने ओथंबलेल्या
In reply to कंटाळ्याचा पुरस्कार न by बॅटमॅन
चोरोपंत!!! वा वा वा थ्यांकु
"यमक हराम" ___/\___ !!!!
In reply to चोरोपंत!!! वा वा वा थ्यांकु by बॅटमॅन
तेच तर, अस्मादिकांची
In reply to "यमक हराम" ___/\___ !!!! by यकु
@ती पदवी होती "यमक हराम" >>>
In reply to चोरोपंत!!! वा वा वा थ्यांकु by बॅटमॅन
लय म्हंजे लय भारी राव
मस्त मस्त...मजा आली वाचताना