Skip to main content

जोरात उठते कळ....

लेखक अधिराज यांनी बुधवार, 13/02/2013 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आतल्या आत ढवळतं आणि ज्जोरात उठते कळ पण तिच्या मते आजकाल मला लागलाय कवी चळ.. मग, ती समोर असली की करतो थोडी वळवळ आतली वेदना लपविण्यासाठी आणतो उसनं बळ.. पण, ती ही अशी चलाख गाठतेच माझ्या मनाचा तळ म्हणते, बस्स झालं तुझं नाटक नाहीतर मी काढीन इथून पळ.. माझे उर्मी दाबून ठेवण्याचे प्रयत्न होतात निष्फळ तिच्या ओरडण्याने भानावर येतो पण जखम वाहत राहते भळभळ.. अरे, कविता म्हणजे नसते प्रत्येकाच्या हातचा मळ उगाच लिहावसं वाटलं म्हणून सोडायचे शब्दांचे नळ.. काही कामधंदा करू नको नुसत्याच भावना दळ हा रोग जडलाय तुला पण होतोय माझा छळ.. पण मी आता कोडगा होतोय ऐकून सोडून देतो सरळ पुन्हा आतमध्ये ढवळलं की शब्दांचीच

कर्करोग स्तनांचा

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 13/02/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ------------------------ हा एक महत्त्वाचा वाटणारा विषय मी मांडीत आहे.एक डॉक्टर म्हणून मला जे जे सांगायचे आहे ते.खालील लेख हा harrison's text book of medicine याचा संदर्भ घेऊन लिहिला आहे.हा लेख केवळ स्त्रियांसाठी नसून पुरुषांना सुद्धा आपल्या आई, बहिण बायको व मुलगी यांच्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्याने लिहित आहे.

अर्थ कोणी सांगेल का ? -अणुरेणिया थोकडा

लेखक प्रसाद१९७१ यांनी बुधवार, 13/02/2013 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
हा अभंग तर सर्वांनाच माहिती आहे. पण दुसर्‍या आणि तिसर्‍या कडव्याचा अर्थ कोणी सांगेल का? अणुरेणिया थोकडा अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥ गिळुन सांडिलें कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥३॥ तुका म्हणे आतां । उरलो उपकारापुरता ॥४॥

चुकवू नयेत असे चित्रपट - पॅटन ( १९७० )

लेखक प्रसाद१९७१ यांनी बुधवार, 13/02/2013 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
Internet वर सगळी माहिति उपलब्ध असल्यामुळे मी फक्त तोन्डओळख करुन द्यायच्या विचारात आहे. Patton ( 1970 ) हा चित्रपट Patton ह्या अमेरिकन General वर आहे. हा चित्रपट काही Patton ची Biography नाही. हे पण एक विषेश आहे. ह्याच्यात Melodrama नाही, युद्धावर असुन सुद्धा उगाचच शीरा ताणुन ओरडा आरडी नाही. महत्वाचे म्हणजे, वस्तुस्थितीची तोडफोड नाही. चित्रपटात १९४३ ते १९४५ एव्हडा कालखंड दाखवला आहे. George C Scott ह्या अभिनेत्यानी Patton ची भुमिका केली आहे. अभिनय म्हणजे काय त्याचा हा वस्तुपाठ आहे. ह्या भुमिके साठी त्याला ऑस्कर मिळाले. Karl Malden नी General Omar Bradley ची भुमिका केली आहे.

गहाणात ७/१२.....

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/02/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

मला अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

चोरावर मोर!!

लेखक किसन शिंदे यांनी बुधवार, 13/02/2013 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
1 २६ जानेवारी १९८७! दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाची परेड जोरात सुरू असते आणि त्याचवेळी दिल्लीतल्या तुघलक रोड पोलीस स्टेशनचा फोन खणखणतो. तो फोन सीबीआयच्या ऑफिसातून आलेला असतो. एका मंत्र्याच्या घरावर सीबीआयचा छापा टाकायचा आहे त्यासाठी पोलीसांची काही कुमक आपल्याला हवी असल्याचं सीबीआय अधिकारी पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरला सांगतो.

डाल रस्सम

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 13/02/2013 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः तुर डाळ - १/२ वाटी मुग डाळ - १/२ वाटी टोमॅटो - १ कडिपत्ता - ४-५ पाने धणे - १/२ चमचा जिरे - १/२ चमचा काळी मिरी - १/२ चमचा मोहरी - १ चमचा हिंग - १/२ चमचा चिंचेचा कोळ - १ चमचा हळद - १/४ चमचा लाल तिखट - १ चमचा तेल / तुप - १ चमचा कोथिंबीर सजावटीसाठी मिठ चवीनुसार पाकॄ: १. तुर डाळ व मुग डाळ धुवुन, १/२ तास भिजवुन ठेवावी. २. कुकर मधे भिजवलेली डाळ व चिरलेला टोमॅटो लावुन, ४-५ शिट्ट्या होऊ द्याव्या. ३. कुकर झाल्यावर, डाळ व टोमॅटो mash करावे. त्यात २ कप पाणी टाकुन mix करुन १/२ तास बाजुला ठेवावे. त्यामुळे डाळ खाली बसुन, रस्सम साठी डाळीचे पाणी मिळेल. ४.

किनारे

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 12/02/2013 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
[कविवर्य सुरेश भट यांच्या 'मज दोन आसवांना हुलकावता न आले' या ओळीवरची तरही गझल] मज दोन आसवांना हुलकावता न आले हसण्यात हुंदक्यांचे कढ दाबता न आले कितिदा मनात आले, सुखपेरणी करावी उपटून यातनांचे तण काढता न आले निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती परक्याच आपल्यांना समजावता न आले मरणासवे कितीदा फसवे करार झाले जगणे नकोच होते, पण टाळता न आले अनुकूल सूचनांना वगळून चूक केली प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते उपभोगता न आले अन् वाटता न आले अभिजात वेदनेचे जडशीळ जून ओझे कवटाळले उराशी, भिरकावता न आले जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही, गझले, तुझे किनारे पण गाठता

दहा बोटं आणि आपले आशीर्वाद - उस्ताद झाकिर हुसेन (१/२)

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 12/02/2013 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर तबलावादनाच्या क्षेत्रात एकमेवाद्वितीय स्थान मिळवूनही अत्यंत शालीन, विनम्र असणार्‍या उस्ताद झाकिर हुसेन यांचा हा एक किस्सा. कलाक्षेत्रावरच्या (चेन्नई) त्यांच्या अप्रतिम तबलावादनने भारावून गेलेल्या रूक्मिणीदेवींनी त्यांना विचारलं, "झाकिर, बेटा तुला दहाच बोटं आहेत की शंभर?" उस्तादजींनी हात जोडत एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, "माझ्याजवळ दहा बोटं आणि आपले आशिर्वाद आहेत". उस्तादजी पत्नी आणि दोन मुलींसमवेत कॅलिफोर्नियामधे राहतात.

नवा भगवा दहशतवाद??

लेखक नानबा यांनी मंगळवार, 12/02/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच ही घटना वाचनात आली आणि मनाला अस्वस्थ करून गेली. म.प्र.मधील धार येथील भोजशाळा येथे सरस्वतीचे(वाग्देवी) प्राचीन मंदिर आहे. तेथील मूर्ती नेहमीप्रमाणे(?) लंडनमध्ये आहे. मंदिर म्हणे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, तरीही १९९३ मध्ये दिग्विजयने तेथे नमाज अदा करायची परवानगी दिली... तेव्हापासून किमान वसंतपंचमीच्या दिवशी हिंदुना तेथे पूजा करायला मिळावी यासाठी शांततामय आंदोलन चालु होते. येत्या शुक्रवारीच वसंतपंचमी येत असल्याने भा.ज.पा.सरकारने नमाजात व्यत्यय नको या उदात्त हेतूने हिंदुना परिसरबंदी केली.