Skip to main content

चुकवू नयेत असे चित्रपट - पॅटन ( १९७० )

बुधवार, 13/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
Internet वर सगळी माहिति उपलब्ध असल्यामुळे मी फक्त तोन्डओळख करुन द्यायच्या विचारात आहे. Patton ( 1970 ) हा चित्रपट Patton ह्या अमेरिकन General वर आहे. हा चित्रपट काही Patton ची Biography नाही. हे पण एक विषेश आहे. ह्याच्यात Melodrama नाही, युद्धावर असुन सुद्धा उगाचच शीरा ताणुन ओरडा आरडी नाही. महत्वाचे म्हणजे, वस्तुस्थितीची तोडफोड नाही. चित्रपटात १९४३ ते १९४५ एव्हडा कालखंड दाखवला आहे. George C Scott ह्या अभिनेत्यानी Patton ची भुमिका केली आहे. अभिनय म्हणजे काय त्याचा हा वस्तुपाठ आहे. ह्या भुमिके साठी त्याला ऑस्कर मिळाले. Karl Malden नी General Omar Bradley ची भुमिका केली आहे. आठवत असेल तर हा अभिनेता A Street Car named Desire मधे होता. त्या चित्रपटा विषयी नंतर केंव्हातरी. Patton ला ७ ऑस्कर मिळाली. George Scott नी ऑस्कर नाकरले. ह्या चित्रपटा चे खासियत. . अप्रतिम अभिनय. . चांगली पटकथा. Francis Ford Coppola ची आहे. हा GodFather मुळे सर्वांना माहिती असलेला. . सत्याच्या बराच जवळ, पण तरीही अजिबात कंटाळवाणा होत नाही. . चांगले संगीत. . Hollywood Movies मधे नेहमी च असतात ती Production Value. हा चित्रपट Patton हा माणुस कसा होता ते उत्तम रित्या दाखवतो. चित्रपटा ची सुरुवात सुद्धा बघण्या सारखी आहे. पॅटन नी त्याच्या Brigade ला उद्देशुन केलेले भाषण आहे. हे भाषण आपल्याला जरी खुप आक्रमक वाटले तरी पॅटन नी केलेले खरे भाषण जास्त आक्रमक होते म्हणे. ------ आधीचे लिखाण GoodFellas - चुकवू नये असे चित्रपट http://www.misalpav.com/node/23899 चुकवु नये असे चित्रपट - कॅसिनो http://www.misalpav.com/node/23875 चुकवू नयेत असे चित्रपट - डॉ. झिवागो http://www.misalpav.com/node/23894
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3930
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

एका सुंदर चित्रपटाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद

जनरल पॅटन हा प्रकारच कमाल होता. पराकोटीचं शौर्य आणि पराकोटीचा हेकेखोरपणा त्याच्याकडे एकत्र आले होते. त्याच्या समकालीन सेनानींची (माँटगोमेरी आणि रोमेल)आणि त्याची तुलना करणारं एक फार सुंदर पुस्तक ब्रिटिश काऊन्सिल लायब्ररीतून वाचलं होतं.

"चित्रपटा ची सुरुवात सुद्धा बघण्या सारखी आहे. पॅटन नी त्याच्या Brigade ला उद्देशुन केलेले भाषण आहे. हे भाषण आपल्याला जरी खुप आक्रमक वाटले तरी पॅटन नी केलेले खरे भाषण जास्त आक्रमक होते म्हणे." ह्या भाषणापासून सिनेमा जी पकड घेतो, ती शेवट पर्यंत सुटत नाही.

चित्रपटांची तोंडओळख आवडते आहे. पण अजुनही चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. कासाब्लांकाची ओळख वाचून, त्याबद्दल अजूनही चांगलं लिहिता आलं असतं असं वाटलं. असो, लिखाण चालू ठेवा निदान त्यानिमित्ताने तोंडओळख होत राहिल.

In reply to by सुधीर

तुमचे बरोबर आहे सुधीर, पण काही केल्या लिहिता येत नाही नीट प्रकारे. मनात बरेच असते, पण उतरत नाही. मेंदूतच काहीतरी खोट असावी. कुठलातरी भाग नीट विकसीत झाला नसावा. :-(

In reply to by प्रसाद१९७१

फार विचार करत बसू नका. सुचतंय तसं लिहून काढायला लागा. हळू हळू अपेक्षेप्रमाणे जमेल. सुरुवातीला चुका जरी झाल्या तरी इथे सगळे मित्रंच आहेत, टेंशन नका घेऊ. चालायला लागायच्या आधी आपण बर्‍याचदा पडतो पण म्हणून प्रयत्न सोडून कुठे देतो. लिहित रहा.

In reply to by आदिजोशी

इथे सगळे मित्रंच आहेत, टेंशन नका घेऊ. अगदी. लिहित रहा. जोशीसाहेब हे तुम्हालापण, बर्‍याच दिवसापासून तुमच्या लेखमालेला पारखा आहे. (का ब्लॉगचा पत्ता बदला आहे?)