तो हसत होता
मी चालत होतो. भोवताली अंधार पडायला सुरुवात झाली होती. दिव्यांची लखलख होती पण हा भाग तसा अंधाराच होत. वातावरणात चांगलाच गारवा होता. थोड्यावेळापूर्वी पडलेल्या पावसामुळे पायवाट ओली होती. अंदाजे मैलावर असलेली प्रकाशाने न्हाहून निघालेली इमारत माझी मंझील होती. तिच्याकडे पाहत कशाचीही परवा न करता मी चालत होतो.
आजूबाजूला अगदी तुरळक वावर होता. चुकूनच एखादा माझ्यासारखा वाटसरू दिसत होता. जसा जसा उशीर होत होता तसा माझ्या पावलांचा वेग वाढत होता. मोठ्या स्तंभाला मागे टाकून मी आता परावर्तीत तळ्याच्या काठावर आलो होतो. तळ्यामध्ये एका बाजूने स्तंभाचे तर दुसर्या बाजूने इमारतीचे प्रतिबिंब पडले होते.
मिसळपाव