रस्त्यांवरील अपघात आणि वाहन संस्कृती
गोपिनाथ मुंडे यांचे काल सकाळी रस्यावरील अपघातात दुख्खःद निधन झाले. भारतभरात रोज दररोज शेकडो अपघात होतात. गोपिनाथ मुंडेंसारखा जाणता नेता काळा आड होतो तेव्हा देशाची मह्त्वपूर्ण हानी होते तेव्हा आपण हळहळतो आणि आपापल्या दिनक्रमास लागतो.
गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच. पण या निमीत्ताने तरी सर्वच भारतीयांनी आपली वाहन चालवण्याची संस्कृती तपासून पहावयास हवी असे वाटते.
बर्याच जणांना स्वतःच्या भरधाव आणि बेदरकार वाहनचालवण्याचे मोठे कौतुक असते त्यांच्या लेखी सांभाळून वाहनचालवणारे वेडे असतात.
मिसळपाव
