Skip to main content

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी -

लेखक विदेश यांनी बुधवार, 04/03/2015 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी सोडणार ना रंगविल्याविण नटखट ग गिरीधारी .. 'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला 'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. एकटीच तू दिसता येथे, गोपिकाही जमतील मोहित करील बासरीवाला, सर्व फेर धरतील समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. .

वाडा ( भाग 1 )

लेखक जयंत माळी यांनी बुधवार, 04/03/2015 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
------ वाडा ------------- नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी जयंत माळी घेऊन आलोय एक खास भयानक कथा. ही कथा पुर्णत: काल्पनीक असून या कथेतील पात्रे , घटना , स्थळ यांचा कोणत्याही खर्या घटनेशी संबंध नाही. तसे आढळल्या तो निव्वळ योगायोग समजावा कथेचा लेखक :- जयंत माळी कथेतील पात्रे : 1} रामराव चंद्रकांत पाटील ( माजी सरपंच ) 2} विकास रामराव पाटील 3} सुखदा विकास पाटील 4} सचिन शर्मा 5} विनायक शर्मा डोंगराच्या कुशीत वसलेले आई जगदंबेची कृपा असणारे करेवाडी गाव. रामराव पाटील या गावचे माजी सरपंच. रामरावांना गावात भरपुर मान होता.

वजन कमी करणारा आहार

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 04/03/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री

गो..गो..गोवा -> मदत हवी आहे...!

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 04/03/2015 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी एअर इंडियाने ठराविक काळात आरक्षण व ठराविक काळात प्रवास ह्या दोन बाबींवर विमान भाड्यात मोठी सवलत जाहीर केली होती.त्या वेळी एप्रिल मध्ये गोव्यात जाण्यासाठी तिकिटे बुक केली. ही आमची पहिलीच गोवा ट्रीप आहे. आजपर्यंत गोवा केवळ चित्रपटात व सिरियल मध्येच पाहीला आहे. मिपाकर जर खालील गोष्टींबाबत मार्गदर्शन करु शकले तर त्याची मला खूप मदत होऊ शकेल. (दोन दिवसांसाठीच व तेही ऑफसीजनला जात असल्याने कंपनीतल्या सहकार्याचा सल्ला नॉर्थ गोव्यातच राहा हा होता.) १) गोव्यातले चांगली बजेट लॉजेस/हॉटेल्स/रिसोर्ट्स. (राहणार त्यापैकी फक्त एकातच आहे.

कच्च्या पपई चे पौष्टिक थालीपीठ

लेखक सुघोषा यांनी बुधवार, 04/03/2015 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुलांना जेवणात विविधता दिली कि ते खाण्यासाठी जे त्रास देतात तो देत नाहीत (स्वानुभव आहे) . कच्ची पपई सलाड साठी आणली होती पण काही न काही कारणाने सलाड बनवायचे राहून जात होते. मग वीकेंडला वेगळ काही तरी कराव म्हणून फ्रीज उघडला तर पपई समोर दिसली मग ठरवलं काहीतरी नवीन करून पहाव आणि मग सुचल कि थालीपीठ करून पहाव . खूप सोपी आणि पटकन होणारी पाककृती आहे आणि तितकीच खमंग व खुसखुशीत. साहित्य :
  1. कच्ची पपई लहान आकाराची १
  2. लसुन पाकळ्या २-३
  3. हळद १ चमचा
  4. हिंग १/२ चमचा
  5. ओवा १ चमचा
  6. जीरे १ चमचा
  7. हिरवी मिरची किंवा लाल तिखट ऐच्छिक आहे .

Don't lose out; Work out - पुस्तकाची ओळख

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 04/03/2015 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नुकतंच एक पुस्तक वाचनात आलं. रुजुता दिवेकर यांचं - डोन्ट लूज आउट; वर्क आउट प्रत्येक पानागणिक एखादी ऐकलेली, बोललेली, वाटलेली, गोष्ट समोर येत गेली. 'अरे हेच.... अगदी हेच वाटलेलं...' किंवा 'ऐला मीही असंच म्हणतो...' असं मनाशी वाटल्याशिवाय पुस्तकातला एकही धडा संपला नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना विशेष मजा आली. शीर्षकावरूनच पुस्तकाचा विषय कळतो. वर्काउट, किंवा व्यायामावर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. व्यायाम महत्वाचा आहे कारण असंख्य जण तो महत्वाचा समजत नाहीत. लेखिकेची या विषयावरील पकड निर्विवाद असून त्याचा प्रत्यय पुस्तकातील मांडणीतून येत रहातो.

३१ डिसेंबर-काय चुकलं

लेखक नर्मदेतला गोटा यांनी बुधवार, 04/03/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
३१ डिसेंबरची संध्याकाळ. माझ्या मित्राची मुलगी. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे वय असेल २०, २१. पार्टीला निघाली. जाताना वडिलांची परवानगी घ्यायला आली. वडिलांनी विचारले "पार्टीला बरोबर कोण कोण आहे ?" तिने सांगितले अजून २ मैत्रिणी आहेत आणि त्यांचे २ मित्र(मुलगे) आहेत. यावर वडिलांनी(आमच्या मित्राने) विचारले या सगळ्यांची वये काय आहेत. ती म्हणाली, "सगळे आमच्याच वयाचे आहेत." मित्राने विचारले, "ड्रिंक्स घेतात का ?" ती म्हणाली "कधी कधी घेतात. सोशल ड्रिंकर आहेत" यावर आमच्या मित्राने निर्णय ऐकवला, "तुमचे मित्र अजून तरुण आहेत, पुरेशी समज नाही. त्यात पुन्हा दारु पिणार असतील तर कंट्रोल राहणार नाही.

थैमान

लेखक जयंत माळी यांनी बुधवार, 04/03/2015 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाइन फ्लूने सध्या सर्वत्र थैमान घातले आहे. सध्या महाराष्ट्रात स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कसा आहे हा जीवघेणा व्हायरस. ? काय आहेत स्वाईन फ्ल्यू होण्यामागची कारणे जाणून ? घ्या लेखातून. स्वाइन फ्लू हा इन्फ्लूएन्झा रोगाचा प्रकार असून जो सर्वसाधारणपणे डुक्कर या प्राण्यात आढळणार्या विषाणूंमुळे होतो. सतत डुक्कर या प्राण्याच्या संपर्कात राहणार्या माणसांना या रोगाची लागण होऊ शकते. मात्र डुकराचे मांस खाण्याचा या आजाराशी काहीही संबंध नाही.

निर्भया डॉक्युमेंटरी वगैरे ....

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 04/03/2015 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे …… डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वग