Skip to main content

पेन्सिल शेडींग : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 21/08/2015 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
संपादक मंडळास नम्र विनंती, मिपावर कलादालन हा टॅब ब-याच दिवसांपासून दिसत नाही. कृपया कलादालन विभाग परत सुरू करावा. pula

बाबासाहेब पुरंदरे "महाराष्ट्र भूषण" यांचे अभिनंदन

लेखक शीतल जोशी यांनी शुक्रवार, 21/08/2015 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
काही व्यक्ती या आयुष्यभर एक वेड घेऊन जगतात. त्यांचे सारे आयुष्याच जणू भारलेले असते. तसाच एक अवलिया महाराष्ट्रात जन्माला आला यांचा आम्हाला अभिमान वाटतो . तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा योग दोन वेळा आला आणि ऐकतानाचा योग प्रत्यक्ष एकदा आणि दूरचित्रवाणी आणि अन्य मार्गांनी अनेकदा आला. तुमच्या वाणी तून केवळ आणि केवळ राजे आमच्या समोर उभेच राहतात असे नाही पण त्या महान योद्ध्याचा आणि राजाचा, उभा जीवन पटच डोळ्या समोरून सरकत जातो. पंढरीचे भक्त ज्या भक्तिभावाने दर वर्षी वारी चालत जातात, त्याच भक्तिभावाने आपण शिवाजी महाराजांना गड किल्ल्यांवर भेटण्यासाठी जाता.

लिनक्स

लेखक स्वप्क००७ यांनी शुक्रवार, 21/08/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मन्दली, येथे असनारयान पैकी कोनी लिनक्स वापरत का? जर कोनी लिनक्स मास्तर असेल तर त्याचे मार्गदर्शन करु शकेल काय? स्तेप बाय स्तेप तुतोरियल अथवा लिन्क्स अवेलेबल असतील तर येथे पोस्त कराव्या.

बेफाम बोलण्यात पह्यला माझा नंबर

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 21/08/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला ! नकोत संदर्भ, नको पुरावे, तर्कविवेक नकोच नको, माझा नंबर पह्यला ! बेछूट लिहिण्यात, माझा नंबर पह्यला ! शंका काढलीस तर आरोप करेन जखमी असशील तर दोष तुझाच धरेन माझा नंबर पह्यला ! बे रोकटोक बोलण्यात माझा नंबर पह्यला माझा विरोध म्हणजे तुझेच चूक, वादविवाद हवा कशाला एक माझे अन शांती मिळव माझा नंबर पह्यला ! सेंसॉर करण्यात गचांडी धरण्यात माझा नंबर पह्यला बातमीत येईन, सत्ता घेईन सगळे म्हणतात बघ मलाच बरोबर माझा नंबर पह्यला ! बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला !

मन

लेखक शीतल जोशी यांनी शुक्रवार, 21/08/2015 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
मन मन सागरापरी खोल, त्याचा कोणा लागे थांग मन भिरभिरे वाऱ्यावरी, त्याला धरू कसे सांग मन मोकाट सुटता, त्याचा माग न लागता त्याचे संगे धावू किती, न पाऊल थकता मन सुटे सुटे झाले, अन डोहात दडले किती शोधले तरी, न एक डोळा दिसले मन हळुवार किती, थोडे शब्द तीर हे लागता डोळ्यामध्ये मन उतरते, अश्रू हे दाटता मन कणखर किती , सावटाची दाटे भीती सावरे स्वतःला लगेच, अन सावरे प्रीतीची हि नाती मन कधी किती गूढ , जणू कृष्ण माई संथ मन सहिष्णू धर्माचे , त्याला कोण पुसे त्याचा पंथ मन एकाकी कधी अन कधी सामावे सर्वांसी रात्र काळोख दाटता, उजळे प्रकाश चंद्रासी मन अवखळ कधी, अन कधी क्रोधात कोपता मन प

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ५- तवाघाट जवळील तांडव आणि आरोग्य शिबिर...

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 21/08/2015 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

अनाहत

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 21/08/2015 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
साकळली पावसाळी रात्र गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ ऐकूनी तो अनाहत नाद गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़ पाचोळा नीजलेला शांत येई दचकून त्याला जाग शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस मंत्रोच्चारात लावी आग घुबडांचे थांबले घुत्कार छपराला टांगले वाघूळ माळावरच्या कुबट कोषात निर्वाताची व्यथा गाभूळ घाबरला वळचणीचा जीव सैरावैरा पळे फडताळ केविलवाणे दडे ते बीळ काळोखाला चरे विक्राळ पागोळ्यांच्या भिडे हृदयास भिजलेला आर्त अंतर्नाद कातर सूरात देती हाक देणारा ना कुणी प्रतिसाद गहिवरलेल्या घराची भिंत घेते पिऊन ते नि:श्वास डोळे थिजले कुणाची आस पावा वाजेल हा विश्वास

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती...

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 20/08/2015 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

फस्ट बाइट लव्ह

लेखक कोमल यांनी बुधवार, 19/08/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले. बाकीच्या हाटेलान्प्रमने त्यालापण काचेचे दरवाजे लावले होते. त्याच्या आजूबाजूची गर्दी बर्यापेकी कमि होती. थोड्याच वेळात एक माणूस येउन ती काच पुसून गेला. अतिशय टणक आणि चकचकीत काच होती ती. मला त्या काचेमधुन आत एक सिम्बोल दिसला. का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं. क्षणभरातच मला ते हॉटेल हवहव्स वाटू लागलं. मी काचेच्या दारातून आत गेले आणि वाशरूम चा बोर्ड असलेल्या दारातून आत घुसले. ५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.

मटण

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 19/08/2015 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य मावळतीकडं आला होता . ओढ्याच्या बाजूने पलीकडच्या पा॑दीत शिरलो . पाण्याशेजारी बसून घटकाभर डोळे मिटले . तेवढ्यात मागून पक्या आला. पाटलाच्या घरातून मटणाचा वास येतोय म्हणाला . रात्री चांदीच. निघालो दोघे . खमंग वासान डोकं चवताळतय. पाटलाघरचं जेवण संपायची वाट बघतोय. दम निघना. देशमुखांच्या घरी जायची पक्यानं शिफारस केली . मी नाही म्हणालो. परवा शिळ्या भाकरीचा तुकडा नरड्यात अडकला होता .