सूर्य मावळतीकडं आला होता .
ओढ्याच्या बाजूने पलीकडच्या पा॑दीत शिरलो .
पाण्याशेजारी बसून घटकाभर डोळे मिटले .
तेवढ्यात मागून पक्या आला.
पाटलाच्या घरातून मटणाचा वास येतोय म्हणाला .
रात्री चांदीच.
निघालो दोघे .
खमंग वासान डोकं चवताळतय.
पाटलाघरचं जेवण संपायची वाट बघतोय.
दम निघना.
देशमुखांच्या घरी जायची पक्यानं शिफारस केली .
मी नाही म्हणालो. परवा शिळ्या भाकरीचा तुकडा नरड्यात अडकला होता . किती खोकलो तरी निघता निघत नव्हता .
वाट बघू पण मटणचं खाऊ.
आण्या, सुरश्या, विक्या रानात सुशीच्या मागावर होती.
नाहीतर सोन्यासारख्या संधीच मातेरं झालं असतं.
जीव मुठीत धरून तसंच कितीतरी वेळ बसून राहिलो.
झोपायच्या आधी पाटलीनबाईनं ऊकिरड्यावर खरकटं फेकलं.
मग आम्हि दोघांनी शेपट्या हलवत मटणाचा यथेच्छ स्वाद चाखला.
वाचने
9681
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
श्रावणात मटण कथा?
तुम्ही तर वाटाण्याच्या
In reply to श्रावणात मटण कथा? by माम्लेदारचा पन्खा
हा हा हा, मला वाटलं किमान
उन्मत्त गजाला भात-पेंडीपेक्षा
In reply to हा हा हा, मला वाटलं किमान by बॅटमॅन
हाहाहा प्रतिसाद आणि कथा
In reply to उन्मत्त गजाला भात-पेंडीपेक्षा by जव्हेरगंज
जव्हेरगंज, जव्हेरगंज!!!!
In reply to उन्मत्त गजाला भात-पेंडीपेक्षा by जव्हेरगंज
अस्मादिक झाडावर चढले गेले
In reply to जव्हेरगंज, जव्हेरगंज!!!! by बॅटमॅन
क्या बात है!
In reply to अस्मादिक झाडावर चढले गेले by जव्हेरगंज
मला वाटल रेशिपी हाय काय की!!
हीच कथा
अंड घातल्यानंतर लिहायचं अवसान
In reply to हीच कथा by gogglya
:):)
मस्त जमली आहे कथा...
आण्या, सुरश्या, विक्या रानात सुशीच्या मागावर होती.इथे शेवटाचा अंदाज आला !आत्ताशा श्रावण सुरू झालाय ..
In reply to मस्त जमली आहे कथा... by डॉ सुहास म्हात्रे
भादवाची वाट बघू द्या
In reply to आत्ताशा श्रावण सुरू झालाय .. by बबन ताम्बे
आजकाल ते वाट बघत नाहीत. :-)
In reply to भादवाची वाट बघू द्या by तुषार काळभोर
झक्कास...
फर्स्टक्लास जमलीये
+ 1
मटण की बेसन
?????
हा प्रतिसाद सत्याचे प्रयोग
In reply to ????? by मांत्रिक
हा प्रतिसाद सत्याचे प्रयोग
In reply to ????? by मांत्रिक
मांत्रिक यांना प्रतिसाद
In reply to हा प्रतिसाद सत्याचे प्रयोग by मांत्रिक
हायल्ला!!! कथेत बेसनचा उल्लेख
In reply to मांत्रिक यांना प्रतिसाद by सत्याचे प्रयोग
अतिश्श्श्शय वेगळा कथाप्रकार
In reply to ????? by मांत्रिक
हाहाहा!
कडक कथा....+१११११११