Skip to main content

सुरज (हिंदी-उर्दू रचना आणि तिचा अनुवाद)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 28/06/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
न जाने क्या है वहाँ जो सुरज रोज सुबह उठकर बिना थके दिन के चारो पहर की सारी सीढीया चढ के ऊपर चला जाता है --- फिर कुछ देर दुनिया की जानिब घूरता रहता है मानो कोई जंग जित ली हो --- कभी कभी लगता है अपने परछाई को हराने का जूनून सवार है उसपे --- ओ सुरज, तुम बडे कब होगे? |-मिसळलेला काव्यप्रेमी-| (२७/०६/२०१६) जानिब = दिशा ---------------------------------------------------------------------- (अनुवाद) असं काय ठेवलंय त्या तिथं, की हा सूर्य रोज म्हणजे अगदी रोज सकाळीसकाळी उठून जराही न थांबता, दिवसाच्या चारी प्रहरांचे जिने चढून हा असा जाऊन बसतो वरती. --- आणि मग थोडा वेळ बघत बसतो एकटक दुनियेच्या पसार्‍या
काव्यरस

जग हे मधुशाला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 28/06/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
जग हे मधुशाला कुणी न येथे भला चांगला, जो तो पेदाड झिंगलेला ज्याची त्याला प्यारी बाटली बाटली तले सखे सौंगडी देशी असो वा विदेशी, प्रिय हो ज्याची त्याला जो तो अपुल्या जागी लुडके नजर न धावे चकण्या पलीकडे गिल्लासातले सारे बेवडे पिवुनी करिती लीला कुणा न माहीत किती ढोसले ते कोठुन आलो ते नच स्मरते उता-याला मन घाबरते, जो आला तो रमला
काव्यरस

विरह ........

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 28/06/2016 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वत्र काळोख पसरलेला होता पाऊल कुठल्या दिशेनं पडत होती याचाही संदर्भ लागत नव्हता, मी भ्रमिष्टा अवस्थेत चालत होते, मला मन आहे, विचारशक्ती आहे, याच भानंच नव्हत! गत आयुष्यातील घटनांचा आढावा घेतांना खरंच वाटत नाही आपण इतकं काही भोगलंय! पण आता त्या आठवणीसुध्दा सोबत सोडतील, मन पुन्हा त्या आठवणींना उजाळा देऊ लागले! सात वर्षापुर्वी आमची पहिली भेट!

हायकू – एक काव्य प्रकार

लेखक उल्का यांनी सोमवार, 27/06/2016 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक पावसाची सर यावी आणि चिब भिजवून जावी तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालंय. वाचनात अचानक एक हायकू आली आणि मला त्यात ओढून घेऊन गेली. हायकू पूर्वी ऐकली/वाचली तेव्हा साहित्य, काव्य ह्यात जेमतेम रस होता. त्यामुळे तेव्हा दुर्लक्षित राहिलेली हायकू आज मात्र वेड लावून गेली. तीन ओळींचे हे मुळचे जपानी काव्य निसर्गाशी जवळीक साधणारं, मनाला भिडणारं, समजायला खूप सोप्प असं आहे. ते क्लिष्ट नाहीये हाच मला आवडलेला त्याचा गुण म्हणेन मी. गुगल राजाला विविध प्रकारे आळवणी केल्यावर खूप माहिती वाचायला मिळाली. हायकूचे नियम कळले. 'हायकू' ही तीन ओळींची कविता. पूर्वार्धात एक विधान केलेले असते. उत्तरार्धात कलाटणी असते.

गझल - आणि हा खेळ झाला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 27/06/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
जरा हासलो आणि हा खेळ झाला तुझा भासलो आणि हा खेळ झाला तसा संयमी नित्य मी राहणारा जरा त्रासलो आणि हा खेळ झाला मला वाटले वेळ आलीच होती तरी वाचलो आणि हा खेळ झाला मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला जरा शेवटी हात जोडावयाला उभा ठाकलो आणि हा खेळ झाला अता थांबता येत नाही अपूर्व जरा धावलो आणि हा खेळ झाला - अपूर्व ओक
काव्यरस

मी बाई होते म्हणुनी - भाग -१०

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 27/06/2016 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964 मी बाई होते म्हणुनी ..

पाऊसगाणे...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 26/06/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अंगणात आज वाजे पावसाचा ताशा सोहळ्यात पर्जन्याच्या रुजे उद्याची रे आशा.. माझे घर झाले आज आनंदाने ओलेचिंब दिसे प्रवाही पाण्यात भविष्याचे प्रतिबिंब... माझ्या घरात नाचते पावसाचे स्वैरगाणे आणि त्याच्या तालावर मन विभोर उधाणे... माझ्या मनात गुजते जुन्या पावसाची गाज गेल्या ओल्या दिवसाची सल छळते रे आज...