Skip to main content

ईईईई कॉमर्स - एक अवेअरनेस प्रोग्राम -भाग २

लेखक अक्षरमित्र यांनी शनिवार, 08/10/2016 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग येथे वाचता येईल : --------------------------- सिनिअरचा सिनिअर : बरं तुम्ही सुट्टीत मुलांना बायकोला घेऊन फिरायला जाता काय ? मी : नाही, आम्ही सुट्टीत गावी जातो. सिनिअरचा सिनिअर : बरोबर. काही वर्षांपुर्वी मी देखील हेच करायचो. कारण सुट्टीमधे कुठे फिरायला जायचे म्हणजे कमीत कमी ४०-५० हजार तर पाहिजेतच. ते आपल्याकडे नसतात म्हणून बेसीकली आपण गावी जातो. तुमच्या बायकोला विचारा बर की आपण दुबईला, मलेशियाला फिरायला जायचं का ? पाहिजे तर पुढल्या सुट्टीत गावी जाऊ. आय बेट, ती एका पायावर तयार होईल.

मी स्त्रीशक्ती

लेखक माहीराज यांनी शुक्रवार, 07/10/2016 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबरीने तुझीया आले, तुझ्याहून ही नाव जाहले, काय कमी रे माझ्या ठायी जे मी लढण्या आधीच हरले ... नऊ मास मी त्रास सोसुनी जन्म जरी हा तुजला देते, तरी पुन्हा हे भ्रुणहत्येचे पाप माझ्याच माथी येते. ... तुच अपुरा माझ्यावाचुन साथ तुला शतजन्मी देते, मान्य तुला ना सत्य हे सारे म्हणून भोग हे निमित्त ठरते ...   जाणुन घे रे किंमत माझी तुला न ठावे हिम्मत माझी  शांत ज्योतीसम ही जळणारी आग अंतरी शतजन्माची ...
काव्यरस

ती माझी होती

लेखक दिनु गवळी यांनी शुक्रवार, 07/10/2016 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
ती मला खुप आवडायची कधी कधी खुप रडवायची तिचा हसरा चेहरा आणि डोळ्यातील काजळ मला नेहमी वेड करायचे ती खरचं एक परी होती, की आकाशातील पहाटेची शुक्राची चांदणी, काय होती ती , की अस म्हणु काय नव्हती ती शब्दच नाहीत...!! पण कधीकधी आपोआप या मनातुन शब्द ओठांवर येतात... ती माझी होती... माझी आहे... माझीच राहिल... स्वप्नांच्या ही पलिकडे तिच्यासाठी एक जादुचा बगीचा मी बनविला होता.... ती खुश रहावी म्हणुन त्या बगीच्यात पारिजातक वृक्ष लावला होता.... ती दिसायची जणु मत्स्यकन्याच.. म्हणुन बगीच्यात होता सोनेरी चंदेरी तलाव ... सोनेरी राजहंस तर होतेच तिथे.. सुंदर जलपऱ्या पण रहायच्या.. स्वर्गात पण नसेल अस अमृतकमळ

नो...आय डोंट..!! -२

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 07/10/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास संध्याकाळचे पाच वाजत आले होते. नेहा लगबगीनं तिचं घर असलेल्या बिल्डिंगचे जिने चढत होती. फार काही मजल्यांची बिल्डिंग नव्हती ती पण ऐसपैस होती हे नक्की. मुळात ते सरकारी क्वार्टर्स होतं. नेहाचे बाबा सरकारी नोकरीत असल्याने त्यानां तिथे राहायला खोली मिळाली होती. इनमीन चार मजल्यांची इमारत होती ती पण जुन्या वळणाची. त्यामुळे लिफ्ट असण्याचा प्रश्नच नव्हता. जि काय ये-जा करायची आहे ती याच जिन्यावरणं करायची. नेहाचं घर सगळ्यात वर, चौथ्या मजल्यावर होतं. त्या मजल्यावर नेहाची फॅमिली एकटीच राहत असे. नेहा भराभर पावलं टाकत होती, जिने चढत होती. अखेर पोचली एकदाची.....दम लागला होता खर तरं.

कोल्हापूरला काय पाहावे

लेखक स्नेह_म यांनी शुक्रवार, 07/10/2016 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
4 दिवसांकरिता फॅमिली बरोबर कोल्हापूरला जायचे आहे. या विषयावर आधीच धागा असल्यास सांगा किंवा कोल्हापुरात राहण्याची / जेवण्याची / पहाण्याची / खरेदीची ठिकाणे सांगा प्लीज

संकट आपल्यामागे की आपण संकटाच्या पुढे...

लेखक महेश_कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/10/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी- सकाळी मोर्निंग वॉकला गेलो होतो गाडीवरून. अहो म्हणजे, गाडीवरून बागेत गेलो आणि तिथे मोर्निंग वॉक/योग केले. तिथून घरी परत येत असताना एका गल्लीमध्ये गाडी नेली. तेव्हा तेथील एक कुत्रे जे खरे तर माझ्या वाटेवर नव्हते ते उगाच पळायला लागले. त्याची एवढी घाबरगुंडी उडाली की पळता-पळता ते बरोबर गाडीच्या समोर आले आणि आणखीन घाबरून जोरात पळू लागले. वास्तविक पाहता मुळात कुत्र्याने माझी गाडी आली म्हणून पळण्याची गरज नव्हती कारण ते तसेही वाटेत येत नव्हते.

बासरी....

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 07/10/2016 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
बासरी.... मनमंदिरी वाजू लागली बासरी मनमोहना लागली तुझीच आस रत्नजडितं मुगुट त्यावर खोचलेले मोरपिसं घननीळा लागला तुझाच ध्यास कुंजवनी घुमू लागला पावा कृष्णा करिते तुझाच रे धावा हंबरती धेनू ऐकून तुझी वेणू वेड लावलेस या राधेला जणू शामल मूर्ती कमरेस खोचली मुरली पाहून आता ना जीवनाची आस उरली राजेंद्र देवी

छोटीशी गोष्ट

लेखक परिधी यांनी शुक्रवार, 07/10/2016 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस पहिला: "आज वेळ आहे थोडा?