Skip to main content

छोटीशी गोष्ट

लेखक परिधी यांनी शुक्रवार, 07/10/2016 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस पहिला: "आज वेळ आहे थोडा? बोलायचय" "आज खूप काम आहे, उद्या बोलूया नक्की" "ओके" दिवस दुसरा: रिंग रिंग रिंग रिंग रिंग रिंग "कुठे गायब, कधीची फोन करतीये" दिवस तिसरा: "अरे काल अचानक पार्टी ठरली ऑफिसमधे" "ओके, अजून काही?" "अजून काही नाही, चल आवरतो, खुप काम आहे" "के बाय" "बाय" दिवस चार: ...... दिवस पाच: ...... दिवस सहा: व्हाट्सएप्प फॉरवर्ड व्हाट्सएप्प स्माइली "आज माझा बड़े आहे" "मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ़ द डे, थांब फोन करतोय" "नको नको घरच्यां बरोबर बाहेर आलीये" "ओके, एन्जॉय" "थैंक्स बाय" दिवस सात: ....... दिवस आठ: ....... दिवस नऊ: "आज बोलू शकते" "मला अजून अर्धा तास आहे घरी पोचायला, तू करतेस का मी करू?" रिंग रिंग "हां बोल" "काही नाही" "बोलायच होतं ना तुला?" "तू सुरुवात कर मग मी बोलते" "काय करतीये?" "बाहेर आलीये" "ऑफिस नाही?" "तुझ्याशी बोलायच म्हणून बाहेर आलीये ऑफिसमधून" "हं काय केल मग बडेला?" "काही नाही फ्रेंड्स बरोबर पार्टी" "गुड, तू बोल ना तू काय बोलतच नाही" "आता सूचत नाहीये, नंतर करते परत फोन बाय" "बाय" दिवस दहा: "ए कसले पांचट जोक पाठवतो" "नको पाठवू?" "......." दिवस अकरा: ....... दिवस बारा: ....... दिवस तेरा: "बोलणार नाही?" "खुप काम पडली आहेत" "ओके बाय" "बाय" दिवस चौदा: ...... दिवस पंधरा: "तू कसा आहेस?" "मस्त" "तुझ काय चालु आहे?" "काही नाही कंटाळा आलाय" "चल मी निघतोय ऑफिसला" "के बाय" "बाय" व्हाट्सएप्प फॉरवर्ड व्हाट्सएप्प फॉरवर्ड दिवस सोळा: आता सुरु झाला आहे
लेखनविषय:

वाचने 3571
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

दिवस सोळा: आता सुरु झाला आहे
काय सांगता!!!!!! WHAT IS THE LATEST UPDATE....!!!!!! cc

आठवण च म्हणायचे होते बाकी ढ आणि ठ वरुन दुसरीत खाल्ले ला मारही आढ नाही आठवला

कमाल आहे!! बरोब्बर सोळाव्याला थांबलात. 'सोळावं वरिस धोक्याचं' गाणं आठवलं या निमित्ताने.

साधारण वय २५ ते २७? अजून नक्की ठरलं नाहीय वाटत... नाहीतर एव्हाना कोणा एकाने संपवलं असत. छान लिहिलं आहे.