Skip to main content

जन्मभर

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 23/10/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
नेसत्या वस्त्रानिशी मी हा असा आता निघालो ना कळे जन्मामध्ये या काय मी कमवुन गेलो? झाकण्या लाखो उणिवा केवढी केली शिकस्त दाटले आभाळ होते मी दिखाव्यात व्यस्त ल्यायलो रेशीम वस्त्रे घ्यावया सन्मान खोटा भाळलो का मी कळेणा पाहता त्या चोरवाटा जे मुळी नव्हतेच माझे वाहिले आयुष्य त्यांना वंदिले समजुन सूर्य त्या भ्रमाच्या काजव्यांना जाहला सूर्यास्त जेव्हा पांगले सारे घरोघर मग जणू मिटताच डोळे जाणिला गुंता खरोखर जन्मभर केला दिखावा मानुनी आयुष्य त्याला खेळ सारा जीवनाचा तो चितेवर ज्ञात झाला - शार्दुल हातोळकर
काव्यरस

कातर वेळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी रविवार, 23/10/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- संध्याकाळची ती वेळ एकटाच खिडकीत उभा राहून नुकत्याच अवतरलेल्या चंद्राकडे पहात उभा होतो कशी कोण जाणे पण तुझी आठवण त्या भरून आलेल्या ढगांबरोबर वाहत आली --- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- आभाळ इतकं भरलं ढगांनी इतकी दाटीवाटी केली की त्यांना आभाळ पुरेना कोणता ढग कोणत्या ढगात विलीन होतोय तेच कळेनास झालं आणि मग गडगडाटाने सारा आसमंत भरुन गेला या सगळ्या गोंधळात तो चंद्र दिसेनासा झाला अन् उगाच जीव कासाविस झाला ---- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- पाहता पाहता त्या ढगांना ओझं असह्य होऊन त्यांनी शरणागती पत्करली जश्या समुद्राच्या लाटां वर ल

सल...

लेखक राजेंद्र देवी यांनी रविवार, 23/10/2016 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
सल लाव धार माझ्या खंजिरी घेईन म्हणतो जरा ऊरी नाही सहन होत आता तुझ्या आठवणीची मुजोरी तुझी आठवण आहे काचरी दिवस रात्र मला जाचरी नको आता आयुष्याची शंभरी नको तुझ्या आठवणींची शिदोरी सांग तुला पण हेच का वाटते माझी आठवण डोळा दाटते बुडवून टाक अश्रूच्या सागरी आयुष्यातील एक सल बोचरी राजेंद्र देवी

प्रेम म्हणजे काय

लेखक सोहम कामत यांनी रविवार, 23/10/2016 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम प्रेम म्हणता तुम्ही प्रेम म्हणजे काय?? साखरेचा गोडवा की दुधावरली साय?? प्रेमाला ना कसले बंधन म्हणता तुम्ही कसे.. जाती गोती विणूनी माणूस कुंडलीच अभ्यासे.. कुंडलीतले शनी नि मंगळ पैदा करती दोष.. ३६ गुण जुळता तुम्हा मिळतो तो संतोष.. गोंधळात या विसरून जाता मुलांचा तो अभिप्राय.. प्रेम प्रेम करता तुम्ही अहो प्रेम म्हणजे काय?? साखरेचा गोडवा की दुधावरली साय?? प्रेम असते सुंदर निर्मळ म्हणता तुम्ही कसे.. आकर्षणाच्या व्यसनामध्ये शिक्षण मुलांचे फसे.. घरातली ती लक्ष्मी फक्त सांभाळे चुल नि मुल.. नवरा घरचा कर्ता धर्ता बनवी विचित्र रुल.. संसारात प्रेमाची त्या बनते गरीब गाय.. प्रेम प्रेम म्हणता तुम्ही प

"स्व"....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 22/10/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....प

वेग...

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 22/10/2016 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
वेग मरण एवढे सोपे झाले जगणे अवघड झाले आहे आता यम एकटा नाही जागोजागी त्याचे चेले आहे म्हातारे कोतारे मरती तरुण मरती रस्त्यावरती मृत्यू म्हणजे काय ज्यांना न कळते लहानपणीच आयुष्य संपले आहे सारे ओढवून धेतलेस तू मानवा वेगाने तुला भारले आहे आपल्याच भाऊबंदास तू स्वतः मारले आहे राजेंद्र देवी

तीन्ही डिबेटमधे जिंकून, अमेरिकन दुर्गेची- हिलरीची, ८ नव्हेंबरकडे आगेकूच

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 22/10/2016 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
"हिलरीने ट्रम्पला तिसर्‍या डिबेटमधे सफशेल पाडलं हे खरं आहे का रे भाऊ?" "नक्कीच.

जो अभ्यास करेल तो पास होईल

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 21/10/2016 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
विजय कोणाचा आमच्या देशावर अनेक परकीय आक्रमकांनी आक्रमण केले. त्यामधे बाबर होता, अहमदशहा अब्दाली होता. हे सगळे आक्रमक मुस्लिम होते म्हणून आम्ही याचे वर्णन ईस्लामिक आक्रमण असे करतो. आता प्रश्न असा आहे की या आक्रमणांमागे ईस्लामची प्रेरणा होती का आणि विजय मिळाला असेल तर तो ईस्लामच्या तत्त्वज्ञानाचा विजय मानायचा का म्हणजे मग ईस्लाम विरुद्ध हिंदू तत्त्वज्ञान असा सामना झाला का . . ईस्लामला मानणारे जे देश आहेत उदा बांगलादेश, पाकिस्तान.

भारतीय सैनिक

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय सैनिक राष्ट्र रक्षितो वीर होवूनी बलाढ्य खमका परवत.. नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत... शूरवीर तो धर्मवीर तो कर्तव्यदक्ष पुत्र.. भूमीरक्ष तो शत्रूभक्ष तो हिंदूस्वराज्य मित्र.. स्वाभिमानी तो प्राणदानी तो देशप्रेमी तो राणा.. तप्तसूर्य तो प्रांतधैर्य तो हिंदोस्तानी बाणा.. युद्ध खेळतो श्वास वेचूनी मनी स्थापितो भारत.. नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत... जीव हरवतो गर्व मिरवतो देशभक्त तो हिंदू.. नभी गरजतो फक्त समजतो शिवस्वराज्य शिवसिंधू.. विश्व विसरतो जगी पसरतो स्वतंत्र हिंदवी जीत.. रयत सुखवितो भाग्य पिकवितो स्मरितो राष्ट्रगीत.. ग्रिष्म शिशिर वर्षा तो भोगतो भगवे रक्त सांडत.. नयन द