Skip to main content

जन्मभर

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 23/10/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
नेसत्या वस्त्रानिशी मी हा असा आता निघालो ना कळे जन्मामध्ये या काय मी कमवुन गेलो? झाकण्या लाखो उणिवा केवढी केली शिकस्त दाटले आभाळ होते मी दिखाव्यात व्यस्त ल्यायलो रेशीम वस्त्रे घ्यावया सन्मान खोटा भाळलो का मी कळेणा पाहता त्या चोरवाटा जे मुळी नव्हतेच माझे वाहिले आयुष्य त्यांना वंदिले समजुन सूर्य त्या भ्रमाच्या काजव्यांना जाहला सूर्यास्त जेव्हा पांगले सारे घरोघर मग जणू मिटताच डोळे जाणिला गुंता खरोखर जन्मभर केला दिखावा मानुनी आयुष्य त्याला खेळ सारा जीवनाचा तो चितेवर ज्ञात झाला - शार्दुल हातोळकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1980
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

फार सुंदर... वृत्तबद्ध रचनांची गेयता मला फार आवडते.. तश्या रचना बाधंण आम्हाला जमत नाही याच वाईट वाटत...

तुमचा मनमोकळा आणि दिलखुलास प्रतिसाद आवडला ! प्रत्येक कवी हा आपापल्या पद्धतीने कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या आठवणीप्रमाणे बहुतेक प्रा. राम शेवाळकरांनी म्हटले होते "प्रत्येक कवी हा बोलका रसिक असतो आणि प्रत्येक रसिक हा मुका कवीच असतो !"

आवडली! तुमची कविता वाचून हिन्दीतले सुप्रसिद्ध कवि हरिशंकर परसाई यांची एक कविता मला आठवली. क्या किया आज तक क्या पाया? मैं सोच रहा, सिर पर अपार दिन, मास, वर्ष का धरे भार पल, प्रतिपल का अंबार लगा आखिर पाया तो क्या पाया? जब तान छिड़ी, मैं बोल उठा जब थाप पड़ी, पग डोल उठा औरों के स्वर में स्वर भर कर अब तक गाया तो क्या गाया? सब लुटा विश्व को रंक हुआ रीता तब मेरा अंक हुआ दाता से फिर याचक बनकर कण-कण पाया तो क्या पाया? जिस ओर उठी अंगुली जग की उस ओर मुड़ी गति भी पग की जग के अंचल से बंधा हुआ खिंचता आया तो क्या आया? जो वर्तमान ने उगल दिया उसको भविष्य ने निगल लिया है ज्ञान, सत्य ही श्रेष्ठ किंतु जूठन खाया तो क्या खाया? - हरिशंकर परसाई Sandy

@जे मुळी नव्हतेच माझे वाहिले आयुष्य त्यांना वंदिले समजुन सूर्य त्या भ्रमाच्या काजव्यांना››› सुंदर.! @जाहला सूर्यास्त जेव्हा पांगले सारे घरोघर मग जणू मिटताच डोळे जाणिला गुंता खरोखर››› लाजव्वाब! @जन्मभर केला दिखावा मानुनी आयुष्य त्याला खेळ सारा जीवनाचा तो चितेवर ज्ञात झाला››› कळस! __/\__

खुप सुंदर काव्य ! कवी तूम्ही इथे ह्रदय स्पर्शून बोलून जाता अन् आम्ही निःशब्द होतो...स्तब्ध होतो !!

संदीपजी, आत्मबंध, गौरीजी मनापासुन धन्यवाद. @संदीपजी - खुपच छान हिंदी कविता.... @आत्मबंध - अतोनात उर्जा देणारा प्रतिसाद.... @गौरीजी - कवितेचा सच्चा गौरव....

खुप छन!

खुप छान!