मॉन्ट्रीयाल स्क्रू जॉब- फ्री स्टाईल रेसलिंगच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना -1
टीप- जे WWF अजिबात पाहात नाहीत त्यांना कदाचित या सर्वात रस न वाटण्याची शक्यता आहे
WWF. वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन. नव्वदच्या दशकात लहानपण-तरुणपण घालवलेल्या अनेकांना हे नाव चांगलंच परिचयाचं आहे. मुळात अमेरिकन असणाऱ्या या फ्री स्टाईल रेसलिंग कंपनीने नव्वदीत टेलिव्हिजनवर जगभरात प्रचंड धुमाकूळ घातलेला होता. भारतातही लहान मुलं आणि तरुणांच्यात हा प्रकार लोकप्रिय होता. रॉक, स्टोनकोल्ड, केन, अंडरटेकर अशी नावं सर्वांच्या तोंडावर असायची. पोरं इतकी वेडी झालेलीे की एकमेकांशीही wwf स्टाईलने कुस्तीची तालीम चालायची. तिथल्या मूव्हस मित्रांवर मारल्या जायच्या.
मिसळपाव