Skip to main content

मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग २

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 25/06/2017 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग २ मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) ---- भाग १ --- http://www.misalpav.com/node/40043 पुढील दीड तास नुसतेच स्टेशनवर बसुन घालवण्यापेक्षा त्या वेळात एक नवीन ऐतीहासीक ठिकाण बघायला मिळणार या विचाराने मयुरा आणी तिच्या मैत्रीणींना खुप आनंद झाला . तिघीही उत्साहाने ऑटोमधे जाउन बसल्या . सुखीने ऑटो चालु केली . रात्रीची वेळ असल्याने फारशी वर्दळ नसल्याने रस्ता मोकळाच होता . गावाकडे जाणारा रस्ता सोडुन ऑटो एका फाट्याला वळली .

सेंचुरी राईड व पेठ किल्ला दर्शन २३/०६/१७

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी रविवार, 25/06/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सेंचुरी राईड व पेठ किल्ला दर्शन २३/०६/१७ misalpav.com वर सक्रिय असलेल्या जगभरातील सायकलिंग प्रेमी मराठी माणसांचा एक व्हॉट्स गृप *सायकल सायकल* त्यावर एक आव्हान .. जुन महीन्यात ५००किमी करा . जसे होतील तसे कळवत रहा . ज्यामुळे इतरानाही स्फूर्ती मिळेल . ३/४ जून ला अनायासें दोन सेंचुरी राईड झालेल्या . उरलेले ३००करायला हाताशी पुरेसा वेळ . म्हणून मी ही सहभागी झालो . स्पर्धा , पैज ,इर्शा या पासुन दूर रहायचं .. हा खरतर माझा पिंड .

पहिला पाऊस- एक आठवण

लेखक एक प्रेमवेडा यांनी रविवार, 25/06/2017 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
"लगी आज सावन की फिर वो झड़ी है। वही आग सीने में फिर जल पड़ी है। कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे।  चमन में नहीं फूल दिल में खिले थे। े वही तो है मौसम मगर रुत नहीं वो.. मेरे साथ बरसात भी रो पड़ी है।"          पाऊस येतो आठवणी घेऊन तिच्या सोबतीच्या. मनांत फुलवतो पुन्हा एक नाजूकसा धागा प्रितीचा..कुठं असेल बरं ती आज? तिलाही येत असेल का आठवण माझ्यासारखीच?..कदाचित..          पहिला पाऊस तिच्या सोबतीतला!.

मेरे मरदको काम पे है जाना आणि काडीचा सरडा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 25/06/2017 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
काडीचा सरडा ही कविता वाचल्यानंतर खालील दोन छायाचित्रे पाहिल्यास कवितेची परिणामकारकता वाढते. होती शुष्क एक काडी झाडावरती तुटूनी पडली खाली धरणीवरती जणू ओढावले तिचे मरणचकी वय होवोनी मातीत मिळाली वेगळी झाली मग तिचे व्हावे काय? धुळ मातीत मिळोनी कुजूनी जाय प्राण जावोनी वृक्षापासोनी झाले शरीर वेगळे पण धरेवरी पुनर्जन्म झाला मिळाले रूप निराळे डोके छोटे वरती बघे मान उंचावूनी पुढील पाय लांब केले खाली रेटूनी लांब शेपटी आदळली खाली जमिनीवरती उडीचा पवित्रा केला मागील पाय आखडूनी निसर्गाचा चमत्कार हा पहा या छायाचित्रात काडी मोडोनी वृ्क्षाची रुप बदलले सरड्यात
काव्यरस

निळा प्रवासी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 24/06/2017 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
अजाण पक्षी सुजाण वारा उन्मुक्तावर स्वच्छन्द पहारा चुकवून अव्यक्तांच्या नजरा उनाड पाऊस, अवखळ गारा काळ्या डोही कातळपाणी हिरवे असुनी रान अधाशी वेशीवरती उभा थबकुनी अवकाशीचा निळा प्रवासी गंध मातीचा, धरा बहरली पानोपानी ओजही सजले डोळ्यांत कुणाच्या नीर निळे हिरव्या तेजाने डोळे निवले ये रे, ये रे ... अनंत याचना जलदांचे अवगुंठन सरले कोसळू लागल्या रेशिमधारा धरतीचे मग मी पण सुटले ! © विशाल विजय कुलकर्णी
काव्यरस

गूढ भाग ५ (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 24/06/2017 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर मी उरलेली संपूर्ण कथा या भागात टाकते आहे. गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024 गूढ भाग २: http://www.misalpav.com/node/40034 गूढ भाग ३: http://www.misalpav.com/node/40049 गूढ भाग ४: http://www.misalpav.com/node/40056 भाग ५ चंद्रभान म्हादुच्या घराच्या दिशेने चालतच निघाला. गाडी त्याने देवळाजवळच ठेवली. गाव इतके लहान होते की तिथे रस्ते देखील नव्हते.

हिंदी सिनेमा वाल्यांचे आवडते वाद्य कोणते?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 24/06/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : १. खालील लेखातील मते ही माझ्या हिंदी सिमातील तुटपुंज्या ज्ञावर आधारीत आहेत.हा वैचारीक लेख नसल्याने (तसे आमचे कुठलेही लेख जास्त विचार करण्यासारखे नसतात, हा भाग वेगळा) खूप विचार करणार्‍या व्यक्तींनी ह्या लेखाकडे कानाडोळा केलात तरी चालेल. २. दुसरी गोष्ट म्हणजे मला वाद्यांमधले अजिबात काही समजत नाही. पिपाण्या : म्हनजे फुंकायची वाद्ये ह्यात बासरी पासून सनई पर्यंत सगळी वाद्ये. खाजवायची वाद्ये : सतार, तंबोरा. व्हायोलिन. बडवायची वाद्ये : तबला-डग्गा, ढोल, नगारा इत्यादी.

सांजाव

लेखक पिशी अबोली यांनी शनिवार, 24/06/2017 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज 'सांजाव' चा उत्सव गोव्यात साजरा होतोय. एक वेगळाच खास गोवन ख्रिस्ती उत्सव. 'सेंट जॉन' चा अपभ्रंश सांजाव. घरोघर सांजाव सांजाव ओरडत पैसे/दारू मागायची, डोक्यावर पावसाळी वनस्पतींचे मुकुट घालून माडाचे 'पिराडे' (झावळीला माडाशी जोडणारा भाग) ठोकत फिरायचं, आणि शेवटी विहिरीत, तळ्यात नाहीतर चिखलात उड्या घेऊन मनसोक्त भिजून/बरबटून. घ्यायचं. असा हा पावसाळी उत्सव. आमच्या घरी एकदाच एक माणूस सांजाव ओरडत आला होता. खास गोवन काळी तुकतुकीत त्वचा, डोक्यावर चक्क काटेरी शतावरी गुंडाळलेली, असं ते ध्यान आलं. मुळात तर्र होऊन आला होता.

कथुकल्या १३

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 24/06/2017 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
१. गोष्ट “पप्पा सांगा न लवकर गोष्ट.” “ कुठली सांगू बरं… न्यूट्रोफायटा आणि लेडी अॅस्ट्रोनटची ?” “नको ती बोअर आहे.” “मग गुरुवरच्या चेटकीणीची ?” “ती सांगितलीये तुम्ही चारपाच वेळा.” “बोलकी निळी झाडं, जादुई रोबो, टेट्रोग्लॅमसचं सोनेरी अंडं ?” “सगळ्या सांगितल्यात ओ पप्पा. एखादी नवीन सांगा न.” नेफीसने थोडावेळ डोकं खाजवलं. “ठिकेय एक नवीन गोष्ट सांगतो. पृथ्वीवरच्या माणसांची.” “चालेल.” शेनॉय गोष्ट ऐकायला सावरून बसला. “खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ðζ सूर्यमालेत पृथ्वी नावाचा एक ग्रह होता.