परीकथा - भाग पंधरा >> २.१० - ३ वर्षे
४ फेब्रुवारी २०१७
आमच्यावेळी पालकसभा व्हायच्या. पालकांना वर्गात बसवून आम्हा वर्गातल्या "निवडक" आठ-दहा मुलांना सर्व पालकांसमोर उभे केले जायचे. अश्या निवडक मुलांमध्ये नसल्यास तो आपला अपमान समजून मी नेहमीच त्यात असेन ही काळजी घ्यायचो. आणि मग आमची खर्या अर्थाने ‘शाळा’ घेतली जायची. त्यानंतर एक राऊंड घरीही व्हायचा तो वेगळा.
पण आज परीच्या शाळेत पॅरेंट टीचर मिटींगला गेलेलो. फेस टू फेस. टीचर दोन आणि पॅरेंट मी एकच. आणि सुरु झाला नुसता कौतुक एके कौतुकाचा पाढा. शी इज वेरी वेरी रेज टू वेरी वेरी ब्राईट स्टुडंट. ती हे करते आणि ती ते करते, तिला हे ही जमते आणि तिला ते ही जमते.
मिसळपाव
