Skip to main content

माहिती सल्ला

कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 20/07/2020 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
  • शहर - हैद्राबाद
  • बजेट - पाच ते सात लाख*
  • प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
  • प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
ऑफिस घरापासून ३८ किमी दूर आहे. लॉकडाउनपूर्वी मेट्रोने जायचो. सध्या डिसेम्बरपर्यंत WFH सुरु आहे. नंतरही काही रोज कार घेऊन जाणार नाही. वर्षातील चार-सहा महिने बाहेरगावी (बेन्गालुरू, पुणे, चेन्नई, कोलकाता दिल्ली इ.) काम असतं. त्यावेळी शनिवार-रविवार घरी येतो. वर्षातून तीन-चार वेळा २८० किमी दूर गावी प्रवास होतो. सध्या रेल्वेने जातो.

भारताबाहेरील पदव्युत्तर शिक्षण : अमेरिका / जर्मनी

लेखक विटेकर यांनी सोमवार, 24/09/2018 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी , चिरंजीवांचे बी ई मेक्यानिकल चे हे शेवटचे वर्ष ! कुणीतरी म्हंट्ल्य ..... टू बी(ई) ऑर नोट टू बी(ई) इज नॉट अ क्वेश्चन बट व्हाट इज आफ्तर बीई इज द क्वेश्चन ! आता त्याने पुढे काय करावे हा प्रश्न सगळ्या घरादाराला आहे ! ( त्याला तो तितकासा नाही हा माझा एक आडिशनल छळ आहे !) तो बापाइतकाच हुषार असल्याने क्याम्पस मध्ये काही होइल्से वाटत नाही तेव्हा पुढे काहीतरी शिकणेआले. त्यातील अमेरिकेत जाऊन एम एस करणे राजमार्ग! मध्यमवर्गी सरळमार्गी बापाप्रमाणे त्याचा शिक्षणाला उपेगी पडेल म्हणून मी एक फ्लाट घेऊन बसलो आहे त्याची किमत आता इतकी घसर्ली आहे की त्या पैश्यात फक्त विमानाचे तिकिट येईल !

श्रवणयंत्राचा खरंच उपयोग होतो का? माहिती हवी अाहे

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 05/11/2015 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वडिलांना गेली काही वर्षे हळूहळू ऐकायला कमी येत अाहे. सध्या त्यांचे वय ८१ वर्षे अाहे. अांम्ही त्यांच्यासाठी श्रवणयंत्र घेण्याचा विचार करत अाहोत. अजून ते परीसरात फिरतात, माणसांना भेटतात त्यामुळे ते अावश्यक वाटते. पण इथे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे अांम्हाला अनेकांकडून कळलेली माहिती, अनुभव असा, की त्या श्रवणयंत्राचा फारसा उपयोग होत नाही. पहिले काही अाठवडे ते वापरले जाते, पण नंतर बरेच लोक ते वापरत नाहीत. त्याचा उपयोगापेक्षा त्रासच होतो. तर कृपया खालील बाबतीत अापला सल्ला, अनुभव, माहिती शेअर करावी, ही विनंती: - श्रवणयंत्राचा खरंच उपयोग होतो का?