✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कुठली कार घेऊ?

ख
खग्या यांनी
Mon, 03/20/2017 - 20:32  ·  लेख
लेख
मला माझ्या आई बाबांसाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ची कार घ्यायची आहे. बाबांचं वय ६० च्या आस पास असल्याने त्यांना मॅन्युअल गिअर बदलण्याचा त्रास नको असं वाटत. शिवाय ते अलीकडेच गाडी शिकले आहेत. त्यांना जवळपास फिरण्यासाठी कार घ्यायची आहे. शहरात किंवा फार फार तर २-३ महिन्यातून एकदा मुंबई - पुणे इतका प्रवास होईल. शिवाय जवळपास ट्रिप वगैरे साठी सुद्धा ते जातील. मुख्य कारण म्हणजे मला टू व्हीलर पेक्षा कार सुरक्षित वाटते. मी जवळ नसताना आई बाबांना जास्तीत जास्त आराम आणि सुरक्षितता पुरवण्याची इच्छा आहे. कृपया तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29085 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

बजेट किती ?

अत्रन्गि पाउस
Mon, 03/20/2017 - 20:55 नवीन
आधी बजेट ठरवा गाडीची किंमत, रनिंग कॉस्ट वगैरे चे बेसिक अल्टो ऑटोमॅटिक पासून ते सेडान पर्यंत ऑप्शन्स आहेतच पण ६०व्या वर्षी त्यांना त्रयल रन घेऊन कोणती गाडी 'आवडते' ठरवा ... कोणत्याही बजेट मध्ये त्या त्या सेगमेंटच्या गाड्या ह्या तशा १९ २० च असतात ..त्यामुळे त्यांना कोणती गाडी रुचते हेच महत्वाचे ... मारुतीच्या गाड्यांचा मेंटेनन्स अतिशय माफक असतो, सहज होतो, आणि चालवायला तशा सोप्या गाड्या हा स्वानुभव ...
  • Log in or register to post comments

मारुतीच्या गाड्यांचा

सुखी
Mon, 03/20/2017 - 21:13 नवीन
मारुतीच्या गाड्यांचा मेंटेनन्स अतिशय माफक असतो
हे आता आताशा खरं राहिला नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार

खग्या
Mon, 03/20/2017 - 21:36 नवीन
शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार घ्यायची आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

महिंद्रा इ२ओ घ्या..

पगला गजोधर
Tue, 03/21/2017 - 18:13 नवीन
Image removed. महिंद्रा इ२ओ घ्या.. फक्त लांबचा/दुर्गम घाट प्रवास नको ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खग्या

मारुतीची Ignis ऑटोमॅटिक

एस
Mon, 03/20/2017 - 20:58 नवीन
मारुतीची Ignis ऑटोमॅटिक व्हर्जन पहा. कॉम्पॅक्ट आहे आणि परफॉर्मन्स चांगला आहे.
  • Log in or register to post comments

पुणे आणि मुंबई मध्येच राहणार

सुखी
Mon, 03/20/2017 - 21:24 नवीन
पुणे आणि मुंबई मध्येच राहणार असाल तर बजेट प्रमाणे, १. टाटा टिआगो AMT (<6lacs) २. टाटा झेस्ट AMT (<8lacs) ३. पोलो TSI (<10lacs) ४. वेंटो TSI (<15lacs) ५. फोर्ड इकोस्पोर्ट (<15lacs) >15lacs बरेच ऑपशन्स आहेत, बजेट परवानगी देत असेल तर सांगा बोलू आपण..... हे सगळं सेफ्टी हा फॅक्टर मॅक्सिमम पकडून सांगत आहे..... मारुती बद्दल सेफ्टी ची शाश्वती वाटत नाही (S-Cross हा एकमेव अपवाद सोडून)
  • Log in or register to post comments

टिआगो 6lac

सुखी
Mon, 03/20/2017 - 21:30 नवीन
टिआगो 6lac झेस्ट ८ पोलो १० वेंटो १५ इकोस्पोर्ट 15
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार

खग्या
Mon, 03/20/2017 - 21:37 नवीन
शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार घ्यायची आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

टिआगो 6lac

सुखी
Mon, 03/20/2017 - 21:43 नवीन
टिआगो 6lac झेस्ट ८ या बघा मग... टाटा ना quality मध्ये खूप जास्त सुधारणा केल्या आहेत... हे सुद्धा पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खग्या

आय-टेन ऑटो घ्या

संजय क्षीरसागर
Mon, 03/20/2017 - 22:50 नवीन
सगळ्यात बेस्ट गाडी. माझा मित्र अमेरिकेला चाललायं त्याची फक्त तीन हजार किमी चाललेली गाडी त्याला घाईमुळे एजंटला ४ लाखात विकायला लागली. इट वॉज द बेस्ट बाय. तुमचं, माझं आणि त्याचं बॅड लक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खग्या

i10 बंद झाली आता

सुखी
Mon, 03/20/2017 - 22:55 नवीन
i10 बंद झाली आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आय-टेन ग्रँड

संजय क्षीरसागर
Mon, 03/20/2017 - 23:10 नवीन
Image removed. आहे ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

पोलो १०

जिन्क्स
Mon, 03/20/2017 - 23:05 नवीन
पोलो १० वेंटो १५ इकोस्पोर्ट 15 कोनसे देश मे?? पोलो : ८ लाख https://www.carwale.com/new/quotation.aspx?pqid=VgXZfxXmV/+fz9RIjNb5PvodWidYoxtp&t=VgXZfxXmV/+fz9RIjNb5PvodWidYoxtp वेंटो : १२ लाख https://www.carwale.com/new/quotation.aspx?pqid=VgXZfxXmV/+fz9RIjNb5PvodWidYoxtp,tG8vooSfuwCK4LfcWKpVhLiirEhZJGL8&t=tG8vooSfuwCK4LfcWKpVhLiirEhZJGL8 इकोस्पोर्ट : १० लाख https://www.carwale.com/new/quotation.aspx?pqid=VgXZfxXmV/+fz9RIjNb5PvodWidYoxtp,tG8vooSfuwCK4LfcWKpVhLiirEhZJGL8,9bSXlV3lTZEKx9atVfUYpj4cbb+s+Ck5&t=9bSXlV3lTZEKx9atVfUYpj4cbb+s+Ck5 ह्या किमती टॉप एंड मॉडेल (पेट्रोल) च्या आहेत
  • Log in or register to post comments

1. गरज ऑटोमॅटिक ची आहे

सुखी
Tue, 03/21/2017 - 12:33 नवीन
1. गरज ऑटोमॅटिक ची आहे त्याप्रमाणे variants चेक करा. 2. मी < च्या पेक्षा कमी असं वापरलं होते, ते गायब झाले, म्हणून रफ estimate दिलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

Safety

कपिलमुनी
Mon, 03/20/2017 - 23:27 नवीन
Please take a car variant with safety features like airbags and others.
  • Log in or register to post comments

Suzuki celerio पण चांगला

औरंगजेब
Tue, 03/21/2017 - 08:16 नवीन
Suzuki celerio पण चांगला आॕप्शन आहे.
  • Log in or register to post comments

परवाच celerio vxi AMT घेतली

नीळा
Tue, 03/21/2017 - 09:46 नवीन
परवाच celerio vxi AMT घेतली आहे. डाव्या पायाचा थोडा problem असल्याने आता मस्त वाटते आहे. Automatically gear अचुक पडतायत शीवाय क्राऊल function पण ऊत्तम आहे
  • Log in or register to post comments

काय किंमते ?

संजय क्षीरसागर
Tue, 03/21/2017 - 10:17 नवीन
आणि क्राऊल function हे काय असतं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीळा

क्राउल म्हणजे ब्रेक सोडला की

नीळा
Tue, 03/21/2017 - 13:00 नवीन
क्राउल म्हणजे ब्रेक सोडला की गाडी एक्सेलेटर न देताही हळूहळु पुढे जाते बंपर टु बंपर मध्ये एकदम आराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

छान !

संजय क्षीरसागर
Tue, 03/21/2017 - 13:10 नवीन
हे फिचर वापरुन पाहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीळा

क्राउल म्हणजे ब्रेक सोडला की गाडी एक्सेलेटर न देताही हळूहळु पुढे

ओम शतानन्द
Fri, 03/24/2017 - 10:14 नवीन
हे क्राउल फन्क्शन नवे आहे ? माझी इन्डिका डिझेल आहे , फर्स्ट गेअर टाकुन क्लच सोडला की अक्सिलेटर न दाबता गाडी हळुहळु पुढे जाते - चढ नसेल तर हे क्राउल फन्क्शन वेगळे काही आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीळा

क्राऊल

लई भारी
Fri, 03/31/2017 - 12:05 नवीन
माझ्या माहिती परिमाणे हे फिचर ऑटोमॅटिक गाडयांना जास्त लागू पडते. क्लच नसल्यामुळे आपण ब्रेक सोडून ऍक्सिलरेटर वर पाय ठेवेपर्यंतच्या क्षणभरात गाडी मागे जाऊ शकते(उतारावर असल्यावर). त्यामुळे हॅन्डब्रेक वापरण्याचा सल्ला दिला जातो. क्राउल किंवा हिल-असिस्ट मुळे ड्राइव्ह मोड मध्ये ब्रेक सोडला तरी minimum acceleration मिळते, जेणेकरून गाडी मागे जाणार नाही. AMT असलेल्या गाडयांना सुरुवातीला हे फंक्शन नव्हते(त्यामुळेच मी झेस्ट AMT घेतली नाही) नंतर नॅनोसकट सगळ्या गाड्यांमध्ये टाकलंय बहुधा. टेस्ट ड्राइव्ह घेऊन बघणे उत्तम उपाय. सुरुवातीला सेल्स च्या लोकांना पण माहीत नव्हतं नीट आणि ते सांगायचे एकाच वेळी डाव्या पायाने ब्रेक आणि उजव्या पायाने ऍक्सिलरेटर दाबा; जे माझ्या माहिती प्रमाणे अतिशय चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओम शतानन्द

मारुती celerio zxi टॉप एंड

सस्नेह
Tue, 03/21/2017 - 11:11 नवीन
मारुती celerio zxi टॉप एंड पेट्रोल, वर्ष झालं वापरते आहे. दि बेस्ट पफॉर्मन्स. गावाबाहेर २२-२४ अ‍ॅव्हरेज. स्मूथ फॉर ड्रायव्हिंग. ड्रायव्हर धरून ५ जणांसाठी पुरेशी स्पेशस. लो मेंटेनन्स. आणखी म्हणजे मारुतीची सर्व्हिस स्टेशन्स सगळीकडे आहेत आणि सर्विस क़्विक. मी विथ गिअर मॉडेल वापरते. ऑटो मॉडेल टॉप एंड साडेसहा पर्यंत येईल.
  • Log in or register to post comments

ओलाचे अ‍ॅप डाऊनलोडायला सांगा.

अभ्या..
Tue, 03/21/2017 - 13:01 नवीन
ओलाचे अ‍ॅप डाऊनलोडायला सांगा. पेमेंटला तुमचे वॅलेट अ‍ॅट्च करा. नंतर वाटल्यास एखाद्या ओळख झालेल्या ओला ड्रायव्हराला घरासमोर पॉइंट घ्यायला सांगत जा. सगळ्यात सेफ, गाडी चालवायचा त्रास नाही, दारासमोर गाडी पण उभी राहील, स्वस्त पण पडेल, मॉडेल चेंजचा ओप्शन आहेच.
  • Log in or register to post comments

अगदी हेच मी सौदामिनीला सांगत होतो !

संजय क्षीरसागर
Tue, 03/21/2017 - 13:14 नवीन
पण `आपलीच गाडी पाहिजे' या स्त्री हट्टापुढे श्रीराम नमला, तिथे आपली काय कथा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

`आपलीच गाडी पाहिजे' या स्त्री

अभ्या..
Tue, 03/21/2017 - 13:23 नवीन
`आपलीच गाडी पाहिजे' या स्त्री हट्टापुढे श्रीराम नमला,
बरोबरे, नाही म्हणले तरी पुष्पक रावणाचेच होते. उद्या बिभीषणाने परत मागितले म्हणजे.. ;) असो... मला वाटले ओला बेस्ट. हे तुम्हीपण म्हणालात म्हणजे बेस्टच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बिभीषण फार तर

संजय क्षीरसागर
Tue, 03/21/2017 - 13:42 नवीन
सीतेला ऑलरेडी विमानाची राइड मिळालीये म्हणून एखादी राइड मागेल, पण विमान रा-१चंच राहाणार ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ओला/ उबर -- मुंबई पुण्यात

सुबोध खरे
Tue, 03/21/2017 - 13:18 नवीन
ओला/ उबर -- मुंबई पुण्यात राहत असला तर हा सर्वात चांगला पर्याय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मायलेज कमी चालणार असेल तर i10

मराठी कथालेखक
Tue, 03/21/2017 - 13:14 नवीन
मायलेज कमी चालणार असेल तर i10 Grand ची Automatic बघा मला सेलेरिओच काय , बलेनो पेक्षाही उजवी वाटली, गिअर शिफ्टिंग खूप स्मूद आहे. अलिकडेच मी सहज म्हणून काही Automatic गाड्यांची टेस्ट ड्राईव घेतली. त्याबद्दल थोडक्यात १) पोलो - महाग (दहा की अकरा लाख आहे), अत्यंत स्मूद गिअर शिफ्ट, पण गाडीत स्पेस कमी , बूट स्पेससुद्धा कमी २) i10 Grand - स्मूद गिअर (पोलो पेक्षा डावे, मारुतीच्या दोन्ही गाड्यांपेक्षा उजवे) , पोलोपेक्षा स्पेस चांगला, किंमत मध्यम (आठ लाख) ३) Baleno - गिअर शिफ्ट फारसा चांगला नाही, स्पेस सर्वात चांगला , किंमत मध्यम (आठ-नऊ लाख) ४) सेलेरिओ - गिअर शिफ्ट फारसा चांगला नाही, स्पेस सर्वात कमी , किंमत कमी (पाच-सहा लाख) , फीचर्सचे कॉम्बिनेशन फारसे आवडले नाही. Tiago Automatic ची test अजून घेतली नाही. (ही कधी लाँच झाली तेच माहित नाही), पुर्वी मॅन्युअलची घेतली होती. स्पेस थोडा कमी आहे पण गाडी स्मूद वाटली. पण इंजिनिअरिंगच्या बाबतीत टाटा मारुतीपेक्षा नक्कीच उजवी आहे आणि मारुतीपेक्षा कमी किमतीत मारुतीपेक्षा चांगली गाडी देतात, पण टाटाच्या गाडीची रिसेल किंमत कमी असते. बाकी रीसेल, इंजिनिअरिंग आणि किंमत ई सगळा विचार करता ह्युंदाईचा पर्याय सध्यातरी जास्त आकर्षक ठरतो.
  • Log in or register to post comments

आजमितीला स्वतःची गाडी घेऊन

सुबोध खरे
Tue, 03/21/2017 - 13:31 नवीन
आजमितीला स्वतःची गाडी घेऊन फिरणे हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. वर म्हटल्याप्रमाणे पोलोचे उदाहरण घेऊ ८ लाख रुपये किंमत त्यात २८००० विम्याचे असे पाच पैकी चार वर्षे म्हणजे ११२,००० म्हणजे ९.१२ लाख झाले. पाच वर्षात सरासरी पाचशे किमी महिन्याला प्रमाणे ३०,००० किमी गाडी चालवली आणि फुकून टाकली तर त्याचे ३ लाख रुपये मिळतील. उरले ६.१२ लाख ३०००० किमी ला साडेतीन रुपये किमी ( २१ किमी ऍव्हरेज धरून) प्रमाणे एक लाख रुपयाचे पेट्रोल लागेल. म्हणजे एका किमी ला २४ रुपये पडतील. यात गाडीच्या मेंटेनन्स चे पैसे धरलेलेच नाहीत. या ऐवजी ओला उबर म्हणाल तेथे आणि म्हणाल तशी घेऊन गेला तरी स्वस्त पडते. शिवाय मागच्या सीट वर हात डोक्यामागे ठेवून शांत बसता येते. पंक्चर झाली बंद पडली कुणाला ठोकली तर घेणे नाही आणि देणं नाही. ड्रायव्हर चा पगार १५,०००/- महिना प्रमाणे धरला तर ९ लाख रुपये अजून होतील या पैशात आयुष्यभर वातानुकूलित गाडीने फिरता येईल. पण त्यांना हौस म्हणून गाडी घ्यायची असेल तर गोष्ट वेगळी कारण हौसेला मोल नाही
  • Log in or register to post comments

:))

खेडूत
Tue, 03/21/2017 - 13:58 नवीन
:)) सहमत! घराचं पण तसंच आहे. पण इथे अवांतर नको म्हणून खाली बसतो... ' ' ' ' बाकी आनंदाचं झाड लावायचंय घरी, सध्या बिया शोधतोय कुठे मिळतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आनंदाच्या झाडाचंही तसेच आहे,

अभ्या..
Tue, 03/21/2017 - 14:02 नवीन
आनंदाच्या झाडाचंही तसेच आहे, दुसर्‍याच्या आनंदात सावली शोधायला शिका, बिया आपोआप टकुर्‍यावर पडतील. . . . खेडूतकाका, हल्के हल्के बरका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

हे हे.. सोप्पय की राव!

खेडूत
Tue, 03/21/2017 - 14:07 नवीन
हे हे.. सोप्पय की राव! आपलं टक्कुरं न बगताच चाल्लो की फुडं वर तोंड करून! :((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

काय बोल्लास अभ्या. एकदम

राजाभाउ
Tue, 03/21/2017 - 18:51 नवीन
काय बोल्लास अभ्या. एकदम षटकारच मस्त आवाडेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

घराचं पण तसंच आहे. ??

कपिलमुनी
Tue, 03/21/2017 - 17:27 नवीन
घराचं तसं नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

खेडूत साहेब

सुबोध खरे
Tue, 03/21/2017 - 19:04 नवीन
खेडूत साहेब कार आणि घर यांची अजिबात तुलना होणार नाही.कारण घर हे अत्यावश्यक गोष्ट आहे. एक महिना कार दुरुस्तीला गेली तर आपल्या आयुष्यात फार फरक पडणार नाही. पण एक महिना सोडाच एक आठवडा सुद्धा घराशिवाय राहणे शक्य नाही. तीन वर्षांनी कारची किंमत ५० % हुन कमी झालेली असेल याउलट तीन वर्षांनी घराची किंमत अगदी काही नाही तरी १५-२० % वाढलेलीच असेल.( मग ते अगदी दुसरे घर असेल तरीही. आमचे एक मेंदूविकार तज्ञ सर म्हणत सर्वात स्वस्त कार विकत घ्या आणि परवडेल असे सर्वात महाग घर घ्या कारण कारची किंमत कधीच वाढणार नाही. आणि (भारतात तरी) घराची किंमत कधीच कमी होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

साहेब नका म्हणू हो क्रुपया..

खेडूत
Tue, 03/21/2017 - 20:29 नवीन
साहेब नका म्हणू हो क्रुपया.. मला दुसर्‍या घराबद्दल म्हणायचं होतं. येणारे भाडे आणि ईएमाय वगैरे...पण त्यावर भरपूरच काथ्या कुटला गेलाय आधीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉक्टर , एकदम परफेक्ट

प्रसाद गोडबोले
Wed, 03/22/2017 - 10:42 नवीन
डॉक्टर , एकदम परफेक्ट कॅलक्युलेशन आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरे साहेबांशी सहमत,

संदीप डांगे
Tue, 03/21/2017 - 16:56 नवीन
खरे साहेबांशी सहमत, मी नाशिकमध्ये आता ओला रिक्षा/कॅब वापरतो आहे, स्वस्त आणि मस्त. थोडा त्रास आहे पण स्वतःची कार मेंटेन करण्यापेक्षा कैक पट चांगले... अभ्याच्या सजेशन ला अनुमोदन!
  • Log in or register to post comments

आभार

खग्या
Tue, 03/21/2017 - 18:07 नवीन
सुन्दर मार्गदर्शना बद्दल सर्वान्चे मनापासुन आभार!
  • Log in or register to post comments

मग गाडी घ्यायचा

धर्मराजमुटके
Tue, 03/21/2017 - 18:23 नवीन
मग गाडी घ्यायचा बेत कॅन्सल करणार ना ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खग्या

नाही

खग्या
Tue, 03/21/2017 - 19:00 नवीन
ती तर घेनारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

ओला/उबेर हे दूसर्‍या कारला पर्याय

मराठी कथालेखक
Tue, 03/21/2017 - 18:31 नवीन
माझ्या मते ओला उबेर घरातल्या दूसर्‍या कारला पर्याय असावेत मात्र कुटूंबाकडे एक कार असणं गरजेचं आहे. वेळी अवेळी, अडीअडचणीला स्वतःची कार असलेली जास्त चांगलं. प्रश्न खर्चाचा असेल तर स्वस्तातली (नॅनो, अल्टो ई) किंवा चांगल्यपैकी जुनी कार (वर खरे साहेब म्हणतात तशी तीस हजार किमी चाललेली पोलो तीन लाखाला मिळाली तर :) असावी. ओला /उबेर नेहमीच उपलब्ध होतात असं नाही. माझी पत्नी नागपूरहून विमानाने रात्री येते (वेळ : दहा-साडेदहा , बहूधा रविवार) तेव्हा तिला अनेकदा कॅब मिळत नाही असा अनुभव आहे , किंवा बरीच वाट पाहून मिळते. एकदा बराच वेळ वाट बघून, अ‍ॅपवर सातत्याने प्रयत्न करुनही तिला कॅब मिळाली नाही शेवटी मी चिंचवडहून माझ्या कारने तिला आणायला गेलो. सणाच्या दिवशी (खासकरुन दसरा /दिवाळी) कॅब लवकर मिळत नाहीत. याखेरीज peak hour charges मुळे कधी कधी कॅब अतिशय महाग पडते ते वेगळं. शिवाय घरी एकच कार असेल तर सुमारे १००० किमी प्रति महिना म्हणजे १०-१२ हजार किमी प्रतिवर्ष चालवली जाते. खरे साहेब म्हणतात तसं हौसेला मोल नाही हे खरचं आहे पण आठ लाखांची कार पाच वर्षात ते ही फक्त तीस हजार किमी चालवून फुंकून टाकणं हे साधारणपणे हौशी मनुष्यच करतो, बाकी खर्चाचा विचार करणारे , पैसा जपून वापरणारे लोक नवीन कार लाखभर किमी तरी चालवतात. ज्यांचा प्रवास अगदीच कमी असणार आहे (महिन्याला पाचशे किमी पेक्षाही कमी), किंवा स्वतःला चालवायची नाही त्यांनी मात्र कार घेणं पुर्ण टाळून ओला, उबेर, ओळखीतले ड्रायव्हर यांचा पर्याय अवलंबणं ठीक राहू शकेल,
  • Log in or register to post comments

मात्र कुटूंबाकडे एक कार असणं

स्वामी संकेतानंद
Tue, 03/21/2017 - 19:33 नवीन
मात्र कुटूंबाकडे एक कार असणं गरजेचं आहे. वेळी अवेळी, अडीअडचणीला स्वतःची कार असलेली जास्त चांगलं.
सहमत! ग्रामीण/निमशहरी भागात राहत असाल तर खरंच गरजेचं आहे. आमच्या गावी ओला/उबर्/कुठलीही टॅक्सी नाही. घरी स्वस्तशी अल्टो घेतली आहे. ती फार चालत नाही, पण तिने केलेली सोय पैशात मोजता येत नाही. बाबांनी कार घेतलीही नसती, इतकी वर्षे काम चालत होतेच. पण एका वैद्यकीय आणीबाणीनंतर चटकन बाबांनी कार बुक केली. त्या दिवशी निव्वळ योगायोगाने एक नातेवाईक कार घेऊन घरी आले होते, त्यामुळे पेशन्टला लगेच हॉस्पीटलात हलवणे शक्य झाले होते. याखेरीज इतर फायदे म्हणजे आमचे बव्हंशी नातेवाईक आडवळणाच्या खेड्यापाड्यांमध्ये राहत असल्याने त्यांच्याकडे जायला कुणावर विसंबून राहायची गरज नाही. दिवसातून एकदाच जाणारी यस्टी सुटली म्हणून प्लान रद्द करायची गरज नाही आणि कित्येक गावांत तर यस्टी पण जात नाही. माझ्या दोन मावशांच्या गावी मी आयुष्यात पहिल्यांदा कार आल्यावर गेलो. आता एका दिवसात चार गावी भेटीगाठी घेऊन रात्री परत आपल्या गावी येणे शक्य होते. सिझनमध्ये भाड्याने कार मिळेल याचीही शाश्वती नसते. सोयीच्या दृष्टीने तरी कार असणे परवडत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

तुमच्याशी सहमत आहे, मी वर जो

संदीप डांगे
Tue, 03/21/2017 - 19:41 नवीन
तुमच्याशी सहमत आहे, मी वर जो थोडा त्रास बोललो तो हाच! घरी एक चारचाकी असावीच. ती ओला उबेर च्या सथीने वापरल्यास मेन्टेनन्स बोकांडी बसत नाही व अडीअडचणीला हाताशी असते. बाकीचे फायदे तर मिलतात. घरात गाडीच नको हे भारतात (मेट्रोजमध्ये) अजून पाचेक वर्षे जरा कठिण आहे. माझे कारबाबत नेहमी हेच मत आहे की तीनेक वर्षाच्या आतली, चांगली, वरच्या सेगमेंटची पण सेकंड हॅन्ड कार घ्यावी. सुरुवातीचा बम्प पहिल्या ओनरने घेतलेला असतो. किमान ५०% कमी किंमतीत मिळते. माझे सुचवणे असे आहे की आपली ऐपत १ कोटीची कार घ्यायची असेल तर ज्या गाडीची ऑनरोड किंमत ५० लाख आहे अशी गाडी २५ लाखापर्यंत मिळत असेल तर घ्यावी. दहा लाखाची ऐपत असेल तर ८ लाख वाली गाडी सेकंड मध्ये ३ लाखात मिळेल अशी बघावी. उरलेले पैसे फिक्स मध्ये टाकावे व्याजातून तिचे मस्त ओरिजनल स्पेअरपार्ट आणि उच्च दर्जाचे सर्विसिंग, मेन्टेनन्स होऊ शकते. ह्यात जीवनशैलीचा दर्जा कायम राहतो, तुम्ही एक कोटीची ऐपत वाले आहात हे पन्नास लाखाच्या (दर्शनी) गाडीवरुन दिसुन येते, पन्नास लाखाच्या गाडीचा आरामही मिळतो, आणि पैसेही वाचतात. पांचो उंगलिया घीमें और सर कढाईमें.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

एक कोटीची ऐपत वाले आहात हे पन्नास लाखाच्या (दर्शनी) गाडीवरुन दिस

ओम शतानन्द
Fri, 03/24/2017 - 10:22 नवीन
मानले क्या दिमाग है यार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लाखभर किमी चालवायचे तर

सुबोध खरे
Tue, 03/21/2017 - 18:59 नवीन
लाखभर किमी चालवायचे तर त्याच्या देखभालीचा खर्च पकडून कमीत कमी ५ रुपये किमी पडते. म्हणजेच पाच लाख रुपये अतिरिक्त खर्च आहे. अगदी आपण दहा वर्षात जरी एक लाख किमी चालवली तरी पाच लाख रुपये वरील खर्च. आठ लाख रुपये कारचा खर्च अधिक पुढच्या नऊ वर्षाचा विमा अडीच लाख मिळून साडे पंधरा लाख रुपये होतात म्हणजेच दर वर्षी दीड लाख किंवा महिना साडे बारा हजार. किंवा रोजचा ३०० रुपये. म्हणजे तुम्ही रोज ओला/ उबर ची एक ट्रिप केली तरीही पैसे वसूल होतात. राहिली गोष्ट विमानतळावर टॅक्सी न मिळण्याची. त्यासाठी तुम्ही स्वतःची कर घेऊन चक्कर मारण्यापेक्षा घरूनच एखादी टॅक्सी परत येण्याच्या बोलीवर( दुप्पट भाडे देऊन) आणलीत तर उत्तम. दोघांना छान मागच्यां सीट वर बसून गप्पा हि मारता येतील. लक्षात घ्या या दहा वर्षात ड्रॉयव्हरचा खर्च पकडलेला नाहीच. १५,०००/- रुपये महिना प्रमाणे १८ लाख रुपये होतील दहा वर्षांचे. कसाही हिशेब केला तरी कर हि ओला/उबर किंवा टॅक्सी शी तुलना करूच शकत नाही. परत सांगतो हौस म्हणून घ्यायची असेल तर त्याची किंमत करता येत नाहीच. साठ वर्षे वयाचे वडील हौस म्हणून किती कार चालवतील ? हा एक वेगळा प्रश्न आहे. जर ती कार अजून कोणी तरुण वापरणार असेल तर गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments

तुम्ही फक्त आठ लाखाच्या कारचा

मराठी कथालेखक
Tue, 03/21/2017 - 19:11 नवीन
तुम्ही फक्त आठ लाखाच्या कारचा विचार करत आहात. ज्याला पैशांचा हिशेब जास्त महत्वाचा आहे तो आठ लाखाची कार घेईल असं नाही ना. तीन लाखाची नॅनो घेईल वा चार-साडेचार लाखांची वॅगन आर घेईल, तिचा इन्शुरन्सपण स्वस्त असेल , चाके लहान असल्याने ती पण स्वस्त , देखभालीचा खर्च कमी , रिसेलमध्ये होणारा तोटाही कमी. तसेच इन्शुरन्सचा खर्च दरवर्षी सारखा नसतो, नवीन गाडीचा जास्त असतो तो हळूहळू कमी होतो. जसे २०१२ साली सहा लाखाला घेतलेल्या इंडिका विस्टाचा इन्शुरन्स पहिल्या वर्षी वीस हजार तर चौथ्या वर्षी बारा हजारांचा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वॅगन आर स्वयंचलित ची किंमत ५

सुबोध खरे
Tue, 03/21/2017 - 19:27 नवीन
वॅगन आर स्वयंचलित ची किंमत ५,७३,५११/- आहे यात विमा २२४०० आहे. https://www.carwale.com/new/quotation.aspx?pqid=WYYXd+fWmV/d8Aa8GjAPyQOdDrSigYbB&t=WYYXd+fWmV/d8Aa8GjAPyQOdDrSigYbB या प्रमाणे हिशेब कमी होईल वर केलेल्या हिशेबाच्या ७०% गृहीत धरा हाकानाका बाकी पाच वर्षे जुन्या वॅगन आरची रिसेल किंमत पण कमी येईल हेही गृहीत धरायला लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

इथे मी लेखकाच्या वैयक्तिक

मराठी कथालेखक
Tue, 03/21/2017 - 19:57 नवीन
इथे मी लेखकाच्या वैयक्तिक बाबीबद्दल बोलत नव्हतो. कारपेक्षा कॅब परवडते हे जे तुम्ही सर्वसाधारण मत मांडले त्याबद्दल म्हणालो. बाकी 'time is money' या उक्तिप्रमाणे काम करणार्‍या (म्हणजे कमावत्या) व्यक्तीला जर बराच प्रवास करायचा असेल, कंपनीकडून प्रवासाची योग्य सोय नसेल तर वेळ , सुरक्षितता आणि सोय यांचा एकत्रित विचार करता कॅबपेक्षा कार खूप योग्य ठरते. कॅब बुक करणे, ती येईपर्यंत वाट बघणे, चालक नेहमीच GPS नीट वापरतात असे नाही, त्यामुळे कधी ते फोन करुन पुन्हा पुन्हा कुठे यायचे ते विचारतात, कधी काही चालक येतच नाहीत ई ई अनेक गोष्टी घडत असतात. मी मध्यंतरी सुमारे चार महिने रोज ऑफिसला ओला-उबेरने ये जा केलीय. माझी कार माझी पत्नी वापरते (तिचा प्रवास माझ्यापेक्षा खूप जास्त असतो आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मी तिला दुचाकी चालवू देत नाही ) , दूसरी कार घेणे परवडणार नाही, पार्किंग नाही वगैरे कारणामुळे मी कॅबने ये जा करत होतो. त्यामुळे माझा ओला-उबेरचा खूप अनुभव घेवून झालाय. आता पुन्हा दुचाकी वापरतोय. पावसाळ्यात पुन्हा ओला-उबेर वापरेन. तुमच्या वरच्या हिशेबात तुम्ही देखभाल खर्च पाच रुपये प्रति किमी गृहीत धरलाय, तो खूप जास्त आहे. इतका खर्च खरच आला तर ओला-उबेरच्या कॅबमालकालाही ते परवडणार नाही. बाकी प्रस्तुत लेखकाच्या वैयक्तीक बाबीत बोलायचं तर त्यांच्या वडीलांना कारचा नेमका काय उपयोग करायचा आहे , त्यांची अर्थिक क्षमता ई मुद्दे मी विचारात घेतले नाहीत कारण लेखकाने फक्त कार घेण्याचे बजेट आणि ऑटोमॅटिक कार हवी इतकं सांगितलंय त्याप्रमाणे त्यांना मी चार कारबद्दलची माहिती दिली... 'कार घ्यावी की नाही' असा प्रश्न नव्हताच. झालंच तर नॅनोची पण ऑटोमॅटिक वर्जन आहेच,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा