Skip to main content

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 25/09/2019 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला तो झाला सोहळा तिहारात जाहली दोघांची तुरुंगात भेट मनातले थेट मना मध्ये मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर अवघाची inx खाऊन टाकला चिदू म्हणे, एक ते राहिले तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले प्रामाणिकतेला मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी माझी पाटी कोरी राज्य करोनिया चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट प्रत्येकाची कोठडी वेगळाली वेगळीच ताटे वेगळीच वाटी जेवायला भेटे पुन्हा डाळ भात ऐक ऐक वाजे घंटा हि तुरुंगी जेलर बाहेर वाट पाहे दोघे निघोनिया गेले दोन दिशा कौतुक माध्यमा आवरेना #सॉरीविंदा

वाचने 9590
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

=))

lol

आवडल्या गेली आहे पैजारबुवा,

=)) =)) =)) मनमोहन सायेब एकटे गेले नव्हते, सोबतीला कोणीतरी होते. :)

:);)

भारी......