✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

ब
बोका-ए-आझम यांनी
Sun, 07/03/2016 - 23:42  ·  लेख
लेख
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो. NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला. Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली. मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला. मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला. फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती! शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो - जे कट्ट्याला आले त्यांना सलाम! जे नाही आले त्यांनाही सलाम! जे वेळ काढून आले त्यांना सलाम! जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम! लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम! या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम! आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
वावर
समाज
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
बातमी
अनुभव

प्रतिक्रिया द्या
69054 वाचन

💬 प्रतिसाद (220)

प्रतिक्रिया

फोटो पाहिले होतेच!वृत्तांत

इशा१२३
Mon, 07/04/2016 - 10:16 नवीन
फोटो पाहिले होतेच!वृत्तांत वाचून मजा आली.अनाहिता आणि टकाभाउ फोटो.वा! वा! सगळेच फोटो छान.
  • Log in or register to post comments

ओ...मला भैणी बर्याच हैत..

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 10:36 नवीन
ओ...मला भैणी बर्याच हैत...आणखी नको
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

बर राहिल !टवाळ भाउ नकोच !

इशा१२३
Mon, 07/04/2016 - 11:20 नवीन
बर राहिल !टवाळ भाउ नकोच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 11:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

लै भारी फोटू!

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/04/2016 - 10:34 नवीन
लै भारी फोटू! आगोबानी टि शर्ट बदललेला पाहूण आणंद जाहला! ;) टक्कूमक्कूशोनू चा अनाहितां समवेत फोटू पण भारी!
  • Log in or register to post comments

कंचा टिशर्ट

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 10:37 नवीन
कंचा टिशर्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मस्त कट्टा

गॅरी ट्रुमन
Mon, 07/04/2016 - 10:38 नवीन
जंगी मिपा कट्ट्याबद्दल सर्वांचेच आभार.फोटू आवडले. थोडा वेळ का होईना सर्वांना भेटता आले याचा आनंद आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त मिपा महाकट्टा!

मार्मिक गोडसे
Mon, 07/04/2016 - 10:40 नवीन
जबरदस्त मिपा महाकट्टा! 'अनाहिता आणि लाडोबा' छान फोटो. डांगेसरांनी कट्टावृत्तांत लिहिल्यास वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

झक्कास एक्दम!!!!

प्रीत-मोहर
Mon, 07/04/2016 - 10:41 नवीन
झक्कास एक्दम!!!!
  • Log in or register to post comments

आयोजकांना सलाम!

उल्का
Mon, 07/04/2016 - 10:55 नवीन
आयोजकांना सलाम! असे अनेक महाकट्टे करायची सुबुद्धी त्यांना वरचेवर होवो. :) सर्व फोटो भारी आले आहेत. कट्टा दणक्यात झाला. सर्वांचे आभार! रच्याकने मी ह्या कट्ट्याला गेले होते का? असा प्रश्न माझा मलाच पडला आहे. त्याचे उत्तर म्हणून इथेच एक खुसखुशीत अतिरंजित धमाल मिनिवृत्तांत लिहायचा मानस आहे. आयोजकांची हरकत नाही ना?
  • Log in or register to post comments

खि खि खि...ल्हिआ तुम्ही..

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 11:07 नवीन
खि खि खि...ल्हिआ तुम्ही...नंतरचे नंतर बघू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का

कार्टा, आपली काल भेट होऊनही

उल्का
Mon, 07/04/2016 - 11:14 नवीन
कार्टा, आपली काल भेट होऊनही 'नंतरचे नंतर बघू' अशी धमकी? (आश्चर्यकारक घाबरल्याची स्मायली) आता मी कसे लिहू? :प :द
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आर्र...असा कसा उल्टा अर्थ

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 11:19 नवीन
आर्र...असा कसा उल्टा अर्थ घेता...नंतरचे नंतर म्हन्जे....आधी लिहा...कोणी आक्षेप घेतलाच तर त्याला फाट्यावर मारायचे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का

हाहाहा!

उल्का
Mon, 07/04/2016 - 11:26 नवीन
मग ठीक आहे. टका यांनी जाहीर पाठींबा दिल्यामुळे आता हिम्मत होईल असं वाटतंय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

यांनी वगैरे नको...मला अरे

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 11:27 नवीन
यांनी वगैरे नको...मला अरे/तुरे जास्त बरे पडेल...मी बराच लहान आहे तुम्च्यापेक्षा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का

अर्रर्र

उल्का
Mon, 07/04/2016 - 11:31 नवीन
उगीच गेले कट्ट्याला. आत्ता माझे वय आभासी लपवता पण नाही येणार. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 11:32 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का

हे हे हे. लोक आधीच फाटयावर

त्रिवेणी
Mon, 07/04/2016 - 14:49 नवीन
हे हे हे. लोक आधीच फाटयावर मारतात काही जणाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

Zakkas .....photo pan mast

Maharani
Mon, 07/04/2016 - 10:56 नवीन
Zakkas .....photo pan mast
  • Log in or register to post comments

जंक्शन कट्टा आणि चविष्ट

खेडूत
Mon, 07/04/2016 - 11:34 नवीन
जंक्शन कट्टा आणि चविष्ट व्रुत्तांत. धन्यवाद. स्वगतः पुढच्या वेळी हजेरी लावावी लागणार..
  • Log in or register to post comments

वा !!! जबरी झकास महा-

पियुशा
Mon, 07/04/2016 - 11:38 नवीन
वा !!! जबरी झकास महा- महाकट्टा ,फोटो सगळे जबराट ! माझी काय चर्च्चा केलीत म्हणे ;) बाकी ट क्या चा आय डी बदलुन द्यावा इतका निरागस वाटतोय फोटोट :प का अनाहिताची भीती वाटत होती म्ह्णुन चेहरा असा आलाय ;) ( मर्तेय मी , पळते मी ).......
  • Log in or register to post comments

कंकाका,

धनंजय माने
Mon, 07/04/2016 - 11:46 नवीन
कंकाका, आम्हाला एका च आयडी ची हौस आहे. तेवढा सुद्धा ठेवत नाहीत म्हणून दुसरा उसना पासना मागावा लागतो. बरेच लोक थोरथोर असल्याने आम्हाला उदार मनाने देतात. बाकी कट्टा उत्तम झालेला आहे यात संशय नाही. काही ठिकाणी सोनेरी धान्यपेयं दिसली होती ब्वा!
  • Log in or register to post comments

मी (माझीही शॅम्पेन ) , किसन

माझीही शॅम्पेन
Mon, 07/04/2016 - 12:01 नवीन
मी (माझीही शॅम्पेन ) , किसन , मामलेदार पंखा , शीबीआय , आणि डॉक्टर आम्ही ठाण्याहून निघालो , माझ्या बरोबर एक माजी संपादक , एक WWF कुस्तीपटू , नेव्हीतील डॉक्टर आणि शीबीआय ऑफिसर असल्याने निर्धास्त होतो , मुलुंड - ऐरोली फाट्यया पर्यन्त व्यवस्थित आलो , मी गाडी चालवणारा अर्जुन आणि मार्ग दाखवणारा किसन अशी उलटी जोडी जमली होती , मध्येच एक खतरनाक रस्त्याने येण्याचा निर्णय झाला आणि आम्ही व्यवस्थित नवी मुंबई दर्शन करून दर मजल करत कसा बसा गंतव्य स्थानापर्यन्त पोहोचलो मध्येच गाडी बरेच वेळा स्पीड ब्रेअकर वर आपटली पण चाकातील हवा कमी असेल अशी स्वतः:ची भाबडी समजूत करून घेतली :) महा कट्टा कसला मस्त पैकी स्नेहसंमेलन चालू होत , अशी यशस्वी स्नेहसंमेलन फक्त ग्रेटर मुंबईकरच भरवू शकतो ह्याची खात्री झालि , वल्ली (प्रचतेस ) , सगा , गणामास्तर त्रिवेणी आणि अजून कोणी कोणी पुण्ययाहून आले होते , बरेच दिवसांनी फुल गॅंग भेटली मिपाची काही नाव बदलाविशी वाटली जस की टका >> शामळू कार्टा >>शाका , कंजूस काका >> चपळ काका , सुरंगी >> सूर-सुरी (फटाक्यातील) , बोका-इ-आझम >> प्रेमळबोका , प्रचतेसला त्याच्या नावावरून बरेच जणांनी पिडला असेल , प्रत्येक वेळेला तो ते वारुणाच नाव आहे असं सांगून सुटका करून घेत होता मक , निदे , विमे , प्रास , कंजूस , त्रिवेणी , पिंगू (पोपटी आठवते आहे ना रे ) , कोमल , वाघे अश्या काही जणांशी थोडक्यात चर्चा झाली , निदेनि बोभाटा.कॉम विषयी बरीच माहिती दिली , प्रत्येक मिपाकरांनी बोभाटा.कॉम ला अवश्य भेट दिली पाहिजे अफलातून उपक्रम आहे एकंदरीत अजय , विपा , बोका आणि इतर आयोजकांनी अफलातून आयोजन केलं होत , आता एखादी पिकनिक किंवा मुंबई आणि पुण्य मधोमध रेसोर्टवर भेटून मस्त गप्पा मारल्या पाहिजेत
  • Log in or register to post comments

मालक...गाडी बदला आता.....

माम्लेदारचा पन्खा
Mon, 07/04/2016 - 14:55 नवीन
लै वाजायलीय...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

हा हा हा साष्टांग दंडवत मालक

माझीही शॅम्पेन
Mon, 07/04/2016 - 15:28 नवीन
हा हा हा साष्टांग दंडवत मालक ___/।\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

एक काना विसरलात का?

सूड
Mon, 07/04/2016 - 15:32 नवीन
एक काना विसरलात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

अरे वा !! जोरदार झालाय कट्टा!

स्मिता_१३
Mon, 07/04/2016 - 12:01 नवीन
अरे वा !! जोरदार झालाय कट्टा!!!
  • Log in or register to post comments

तर त्याचं असं झालं की

अजया
Mon, 07/04/2016 - 12:04 नवीन
तर त्याचं असं झालं की हाम्रिकेत कट्टा,त्यात पण एकजण सात तास ड्राइव्ह करुन आलेले,युकेत कट्टा आणि मिपाच्या मातृभूमीत मात्र कट्टयाचा दुष्काळ :( याने आमची झाली जळजळ.मग बालके टकाशी खरडीखरडीत विषय निघाला आमची मुंबई कट्टा करायचा.पण जागा काही निश्चित करता येईना.मिपाकट्टा म्हणजे कसं ऐसपैस गप्पा मारता आल्या पाहिजेत.सोबत छानशी खादाडी हवी.त्यात ते टकं सारखं कोंबडीवालं हाॅटेलच पाहिजे करत नाचत होतं.आणि मी पूर्णपणे शाकाहारी.टकाने पहिलं नाव सुचवलं हाॅटेलचं ते 'झिंगा'! मला नाव ऐकुन चक्करच यायची बाकी :)मग दुसरे नाव मालवणी रस्सा.ते फिश स्पेशल. परत नाक मुरडले.मग इनाॅर्बिटला कट्टा करु. जे हवे ते खाऊ ठरवुन बोक्याला तसं कळवलं.पण जशी येणाऱ्या मिपाकरांची संख्या धाग्यात वाढायला लागली मला टेन्शन यायला लागलं.माॅलच्या गर्दीत कसं मॅनेज होणार.आणि त्याच वेळी वाशीकर मिपाकर विपा देवासारखे धावुन आले आणि त्यांच्यामुळे NMSA सारखी मस्त निवांत जागा कट्ट्यासाठी मिळाली.त्यांनी सगळे आयोजन करुन ठेवलेच होते. तिथल्या रेस्टाॅरंटचा मोठा भाग कट्टयासाठी आरक्षित होता.त्यामुळे कोणताही व्यत्यय न येता फार छान सोय झाली.विशेषतः बाहेर पाऊस असताना. कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते पिंची अाणि पुणेकर.भर पावसात लवकर निघून दिल्या वेळेला ते हजर होते. नंतर एकेक करत ठाणे,मुंबई, पनवेल,सानपाडा,बोयसर सगळे मिपाकर जमले. शिबिआयने मस्त गरम अप्पे करुन आणले होते.पुणेकरांनी आठवणीने बाकरवडी आणि ठाणे मुलुंड आघाडीने सुरळीच्या वड्या. सर्व तुटून पडतच होते तर आधीच वैतागलेले मॅनेजर साहेब प्लीज बाहेरचे फुड नाॅट अलौड म्हणत आले.खट्टु होऊन सगळे डबे बंद झाले :( मग विपा भाऊंनी मस्त गरम गरम मन्चाव सुपची ट्रिट देऊन आत्मे शांत केले! मग ओळखपरेड सुरु झाली.सगळे गोल करून उभे राहिले.आणि एकेकानं आपापली ओळख दिली.त्यामुळे एक बरे झाले.कोण कोण आलंय नीट कळाले.अगदी शेवटी अदि आणि तिची मैत्रीण आल्या.त्याही दंग्यात मनापासून सामील झाल्या! तोवर नुसता कल्ला आणि नो आॅर्डर वर वाढती लोकसंख्या बघून मॅणेजर साहेब हैराण झालेले.मग देवदूत नं दोन बनून स्वीट टाॅकर काका धावुन आले.त्यांच्या मदतीने मग सर्व मेनू मॅनेजरला सांगितल्या गेला.तो जसजश्या डिश आणत होता, एकेक मिपाकर अॅड होत होते! मग त्याला और पाचका खाना करत आॅर्डर वाढवत नेत होते! जेवण मात्र अगदी छान होते.नंतरची कुल्फी तर मस्तच. कोणा दुष्टाने तीन तुकडे पळवल्याने माझ्या वाटेला एकच तुकडा आला :-/ नंतर मिपाकरांची पांगापांग होण्याआधी ग्रुप फोटो झाला.तोपर्यंत सोनुली पण आली. यानंतर पिंचिकर आणि अर्धे ठाणे रवाना झाले.बाकीचे गॅरी भाऊंची वाट बघत गप्पा मारत बसले.बालके टवाळ कार्टा याच्या बालसुलभ बोबड्या बोलांना ऐकुन मिपाकरणींनी मनोरंजन करुन घेतले.वर त्यांच्या लाडोबासोबत फोटोही काढलाच;) चार वाजता चहाची अनावर तल्लफ आल्याने सर्वजण परत रेस्टॉरंटमध्ये आले.चहा होईस्तोवर गॅरी भाऊ आलेच.एक छोटीशी ओळखपरेड परत होऊन सगळे मार्गस्थ झाले. या कट्टयाचा सर्वात भावलेला भाग म्हणजे जुने नवे मिपाकर आवर्जुन आले.कट्ट्यात कोणत्याही छुप्या चर्चा,कटु विषय आदिला स्थान नव्हते.टकाची गंमत करणे सोडता आलेल्या सगळ्या मैत्रिणी या मिपाकरणी म्हणून आल्या होत्या.अनाहिता कट्टा असे नाही.सगळ्यात मिळुन मिसळुन मस्त गप्पाटप्पा झाल्या. धन्यवाद मिपाकरांनो,धन्यवाद विपा. तुमच्यामुळेच इतका जबरदस्त कट्टा झाला.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते

नूतन सावंत
Mon, 07/04/2016 - 17:41 नवीन
कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते पिंची अाणि पुणेकर
नाय नाय,मी पायली होते.त्यानंतर यजमान पतीपत्नी नि त्यानंतर कंजूसकाका.पिंचिकार त्यानंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

बारवी डॅम( बदलापूर ), जांभे

कंजूस
Mon, 07/04/2016 - 12:12 नवीन
बारवी डॅम( बदलापूर ), जांभे धरण ( आसनगाव स्टेशन )याठिकाणी जाण्याला बय्राचजणांनी उत्सुकता दाखवली आहे तिकडे जाण्याचे लवकरच ठरवण्यात येईल. भुशी डॅम,कोंडेश्वरवगैरे ठिकाणे बाद केली आहेत.
  • Log in or register to post comments

काका ठरवा लवकर. आम्ही आलोच.

त्रिवेणी
Mon, 07/04/2016 - 15:14 नवीन
काका ठरवा लवकर. आम्ही आलोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पैसाताईनं फोनवरून कट्ट्याला

प्रचेतस
Mon, 07/04/2016 - 12:26 नवीन
पैसाताईनं फोनवरून कट्ट्याला हजेरी लावली हे नमूद करणे राहिले.
  • Log in or register to post comments

बोका - ए - आझम नी कट्ट्याची

कविता१९७८
Mon, 07/04/2016 - 12:37 नवीन
बोका - ए - आझम नी कट्ट्याची घोषणा केली आणि या कट्ट्याला माझी हजेरी लागणार नाही हे मी ठरवुन टाकलं होत कारण वाशी हा माझ्या साठी अति लांबचा पल्ला कारण बोईसर म्हणजे एकदम एका टोकाला आहे. मुंबई हुन १०० कीमी आणि त्यात वाशी म्हणजे नवी मुंबई ते आणखी दुर. त्यात टका येणार या धडकीनेच मी कट्ट्याला जायचं नाही असं ठरवलं होतं पण एक आठवड्यापपुर्वी ट्रेक च्या दिवशी अजया भेटली आणि तिने सांगितलं की टका हा आयडी व्रात्य असला तरीही प्रत्यक्षात तो तितका व्रात्य नाहीये. मग मी जरा मना वर घेतलं पण इथे ३-४ दिवसा पासुन खुप पाउस असल्याने जाता येईल की नाही याचं टेन्शन आलं कारण अति पावसामुळे मुंबई रेल्वे च्या पश्चिम , मध्य आणि हार्बर अशा तिनी रेल्वे लाईन विस्कळीत झाल्या होत्या. ट्रेन जर मधेच बंद पडली तर पंचाईत व्हायची , त्यातच दर रविवारी मध्या आणि हार्बर रेल्वे लाईन ला मेगा ब्लॉक असतो आणि वेस्टर्नला जम्बो मेगा ब्लॉक . शेवटी कट्ट्याचा दिवस उजाडला. मी रेल्वेच्या पश्चिम लाईनशी कनेक्टेड आहे म्हणुन मी पश्चिम आणि हार्बर लाईन असा पर्याय निवडला. सकाळी ४ वाजता उठुन तयारी करुन ५.१५ ची डहाणुरोड - विरार ट्रेन मधे बसले, विरार ला उतरुन विरार - चर्च्-गेट ट्रेन पकडुन ८ वाजता माहीमला पोहोचले. तिथुन ९.५५ ची हार्बर लाईन हुन अंधेरी पनवेल ट्रेन होती पण ती ४५- मिनीटे उशीरा धावत होती. एकदाची ट्रेन मधे बसले. ११.१५ नंतर अजया आणि स्नेहश्री वाशी स्टेशन बाहेर भेटल्या तोवर पुणेकरणी पोहोचल्याची वर्दी मिळाली होती. गेल्यावर सगळ्यांची भेट घेतली फोटो सेशन झालं तो पर्यंत बाकीचे मिपाकर हळुहळु येउ लागले. बोका भाउ स्वतः आले आणि ओळख परेड सुरु झाली त्यानंतर डॉ. सुबोध खरेही आले त्यांच्याशीही ओळख झाली. जवळपास सगळे एकत्र जमल्यावर सगळ्यांनी आपापली ओळख दिली. गप्पांचा फड जमलेला असतानाही अजया आणि स्वीट टॉकर सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंग होते , दोघांचेही कौतुक कारण इतक्या जणांच्या जेवणाची व्यवस्था करणे म्हणजे खरंच कठीण काम होतं . जेवताना स्वीट टॉकर आणि टॉकरीणबाई, हेमंत वाघे , स्नेहशश्री, अजया यांच्या शी खुप गप्पा मारल्या, खुप माहीती मिळाली. खुप धम्माल केली, सगळ्यांना भेटुन बरे वाटले . मी ही हा पहिलाच कट्टा पाहीलाय जो इतका व्यवस्थित सुनियोजित होता. येताना दुसर्‍या दिवशी येण्याचा विचार होता पण अजयाने ६ वाजता पनवेल ला सोडले मग ६.३० ची पनवेल - डहाणु रोड ट्रेन पकडुन रात्री १० ला घरी पोहोचले आणि अजयाचे आभार कारण दुसर्‍या दिवशी म्हणजे आजच वेस्टर्न रेल्वे च्या ट्रेन्स लेट आहेत आणि आज आले असते तर ऑफीस गाठायला उशीर झाला असता कारण ऑफीस मधे मुंबईहुन येणारे सहकारी आज उशीरा आलेत.
  • Log in or register to post comments

कट्टाक्विन म्हणून तुम्हाला

कंजूस
Mon, 07/04/2016 - 15:00 नवीन
कट्टाक्विन म्हणून तुम्हाला निवडण्यात यावे असा ठराव मांडतो.सत्कार पुढच्या कट्ट्याला करावा. मी त्या बाजूला प्रवास केला आहे आणि किती अडचणी आहेत ते माहित आहे. टक्याबद्दलचे गैरसमज दूर झाले हे एक कट्ट्याचे यशस्वी फलित म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

हो आज सकाळीच डहाणुला

कविता१९७८
Mon, 07/04/2016 - 15:17 नवीन
हो आज सकाळीच डहाणुला मालगाडीचे डबे घसरल्याने ट्रेन्स उशीरा धावतायत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अनुमोदन!

बोका-ए-आझम
Mon, 07/04/2016 - 21:22 नवीन
तुमच्या उत्साहाला आणि spirit ला _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

धन्यवाद

कविता१९७८
Wed, 07/06/2016 - 21:37 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

लोकं दुसर्याना न भेटता कसे

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 15:04 नवीन
लोकं दुसर्याना न भेटता कसे काय मत बनवतात बुआ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

त्यान्च्या आयडी वरुन

कविता१९७८
Mon, 07/04/2016 - 15:07 नवीन
त्यान्च्या आयडी वरुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 15:22 नवीन
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

ऐ ते न ....

स्वप्नांची राणी
Mon, 07/11/2016 - 14:04 नवीन
अय्या...टका ..?? म्हणजे टका खराच आहे...????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वाशी कट्ट्यावरचा फोटो बघाकी..

खटपट्या
Mon, 07/11/2016 - 21:02 नवीन
वाशी कट्ट्यावरचा फोटो बघाकी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

गप्पा सुरू दिसताहेत..

किसन शिंदे
Mon, 07/04/2016 - 12:41 नवीन

गप्पा सुरू दिसताहेत..

बहुतेक सगळेच जमलेले आहेत आणि हॉटेलच्या एका अवाढव्य कोपर्‍यात अस्ताव्यस्तपणे पसरून घोळक्याने गप्पा मारत आहेत, ओळख करून घेताहेत. काऊन्टरवरचा कॅशियर, हॉटेलचा मॅनेजर, काही वेटर्स आणि इतर टेबलावरील लोकांच्या चेहर्‍यावर या घोळक्याकडे पाहून 'काय उच्छाद मांडलाय' अशी त्रासिक भावना स्पष्ट दिसतेय. =)) "सर..सर, प्लीज बसून घ्या इथे!" सुटाबूटातला मॅनेजर एका टेबलाच्या चेअर मागे पुढे सरकवत त्या मोठ्ठ्याने गोंधळ घालणार्‍या लोकांना ऑर्डरवजा विनवणी करतोय आणि ही धटिंग लोकं त्याच्या या विनवणीला सायन-पनवेल हायवेच्या फाट्यावर मारताहेत. इथे मॅनेजरचा चेहरा कडू एरंडेल तेल आणि अभयारीष्ट एकत्रच प्यायल्यासारखा.

गप्पा सुरूच...

"क्या लोग है यार. सुनतेही नही कुछ बोला तो और ऑर्डरभी देते नही." आता एक वेटर दुसर्‍या वेटरशी कुजबुजतोय. मग नंतर ते दोघे आणि एक तिसरा असे तिघेही मॅनेजरपाशी जाऊन कुजबुजतात. "एक काम करो. इनमेंसे कोई एक डिसेंट (?) आदमीको पकडके उसके मुंहसे पयले ऑर्डर उगलवावो." =)) चौघांची व्युहरचना तयार होतेय. वाढत्या गोंधळामुळे यांना एकही माणूस डिसेंट वाटत नाही याला मिपाकरांचे दुर्दैव म्हणावे कि सुदैव? =))

गप्पा सुरूच...

मधूनच इतकी शांतता कशीये म्हणून हॉटेलमधल्या इतरांनी भुवया उंचावून या कोपर्‍याकडे पाह्यलं तर ही सगळी गोंधळ घालणारी लोकं अर्धवर्तुळाकार उभीयेत. गोंधळ घालणार्‍या कौरवांचा हा अर्धवर्तूळाकार चक्रव्युव्ह अभिमन्यू होऊन कोण भेदणार या विवंचनेत उभे राहीलेली मॅनेजर आणि इतर मंडळी. एकेकाचा परिचय होतोय. लोकं परिचय देताहेत तरीही

गप्पा सुरूच...

"मिळाली ब्वॉ कशीबशी ऑर्डर, त्या काकांना धन्यवाद द्यायला हवेयंत" मॅनेजरचा सुटकेचा निश्वास!! "दिलेली ऑर्डर पटापट बनवून सर्व्ह करा रे म्हणजे हा जेवताना निदान आवाज तरी नाही करणार. नाहीतर अजून थोड्या वेळात प्रत्येक टेबलावर जेवणासोबत एक पॅरासेटमॉल द्यावी लागेल." लढाई सुरू करण्याच्या आदेशाबरोबर मॅनेजरचा केविलवाणा आशावाद !!! =)) यथावकाश सगळी लोकं जेवायला बसलीयेत आणि तरीही....

गप्पा सुरूच...

क्रमशः
  • Log in or register to post comments

एक नम्बर किसन राव :)

माझीही शॅम्पेन
Mon, 07/04/2016 - 13:15 नवीन
एक नम्बर किसन राव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आमी नाय ज्जा !!!

इरसाल
Mon, 07/04/2016 - 12:45 नवीन
लैच भारी मजा केलेली दिसत आहे. सगळ्यात वरुन पाचवा फोटो बराच "भारदस्त" दिसत आहे.
  • Log in or register to post comments

कट्टा भन्नाट झालेला दिसतोय.

मृत्युन्जय
Mon, 07/04/2016 - 13:14 नवीन
कट्टा भन्नाट झालेला दिसतोय. पुढच्या कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

इतका दणकून कट्टा झाला आणि

यशोधरा
Mon, 07/04/2016 - 13:59 नवीन
इतका दणकून कट्टा झाला आणि इतकुशेच प्रतिसाद? लिहा की अजून!!
  • Log in or register to post comments

इतका दणकून कट्टा झाला आणि

यशोधरा
Mon, 07/04/2016 - 13:59 नवीन
इतका दणकून कट्टा झाला आणि इतकुशेच प्रतिसाद? लिहा की अजून!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

कैलासवासी
Mon, 07/04/2016 - 14:06 नवीन
लय भारि...!! लाल सलाम
  • Log in or register to post comments

बोका, अजया, टका, यापैकी

विपा
Mon, 07/04/2016 - 14:28 नवीन
बोका, अजया, टका, यापैकी कोणाशीहि ओळख नसतांना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून सुचवलेले ठिकाण निश्चित केले व इतर मिपाकरांनीही त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा