✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

ब
बोका-ए-आझम यांनी
Sun, 07/03/2016 - 23:42  ·  लेख
लेख
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो. NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला. Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली. मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला. मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला. फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती! शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो - जे कट्ट्याला आले त्यांना सलाम! जे नाही आले त्यांनाही सलाम! जे वेळ काढून आले त्यांना सलाम! जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम! लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम! या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम! आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
वावर
समाज
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
बातमी
अनुभव

प्रतिक्रिया द्या
69054 वाचन

💬 प्रतिसाद (220)

प्रतिक्रिया

दोनशे करा आता! जवळ आलंय.

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 17:36 नवीन
दोनशे करा आता! जवळ आलंय. आणि ह्या जागी जेवण करण्यासाठी मेंबर असावं लागतंय का? खर्च किती आला होता? (जेवण/ स्टार्टर/ सोनेरी पेय) किती मेंबर कमीत कमी लागतात टेबल बुक करायला?
  • Log in or register to post comments

स्टार्टर + जेवण रुपये ३००/-

सुबोध खरे
Wed, 07/06/2016 - 20:35 नवीन
स्टार्टर + जेवण रुपये ३००/- फक्त माणशी. मेनू मी वर लिहिला आहेच. इतक्या स्वस्त फक्त मिसळ पावाचा कट्टा होऊ शकतो. सोनेरी पेयांचे माहीत नाही. ते वायले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

चंगळ केलासा की लोकहो!

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 21:33 नवीन
चंगळ केलासा की लोकहो! नेष्टाइम आमी येनार. ठरवू कट्टा! चालंन का यजमान पाटील सायेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

केव्हाही या. NMSA घरचेच आहे.

विपा
गुरुवार, 07/07/2016 - 07:39 नवीन
केव्हाही या. NMSA घरचेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

सोनेरी पेय माणशी २०० , ३

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 21:38 नवीन
सोनेरी पेय माणशी २०० , ३ ग्लास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माला दोन् च मिळाले.... :(

संदीप डांगे
Wed, 07/06/2016 - 23:49 नवीन
माला दोन् च मिळाले.... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ह्या जागी जेवण करण्यासाठी मेंबर असावं लागतं.

हेमन्त वाघे
Wed, 07/06/2016 - 22:16 नवीन
हा मेंबर साठीच क्लब आहे . त्यामुळे जेवण करण्यासाठी मेंबर असावं लागतं. म्हणूनच ईवडी स्वस्ताई होती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

विवेक पाटील यांना खरंच

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 22:21 नवीन
विवेक पाटील यांना खरंच मानायला पाहिजे मग! (पुढच्या कट्टयासाठी फील्डिंग च्या प्रयत्नात) प्यारेमाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

तुम्ही येणार तर.....मी पण येणार !

माम्लेदारचा पन्खा
Wed, 07/06/2016 - 23:17 नवीन
खूब जमेगा रंग... जब मिल बैठेंगे मिपा के सब यार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

सोनेरी पेयासाठी होवू द्या एक

विपा
गुरुवार, 07/07/2016 - 07:41 नवीन
सोनेरी पेयासाठी होवू द्या एक कट्टा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

NMSA ला सोनेरी पेय 365 दिवस

विपा
गुरुवार, 07/07/2016 - 07:48 नवीन
NMSA ला सोनेरी पेय 365 दिवस मिळते. निवडणुकांच्या वेळी आचार संहितेचे दिवस सोडल्यास. ड्राय डेला पाहुण्यांसाठी प्रवेश फी मात्र चौपट असते. नाहीतर आतमध्ये फक्त पाहुणे व सदस्य बाहेरच राहायचे.
  • Log in or register to post comments

जियो!

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 16:57 नवीन
जियो! अरे यिउन यिउन यनार कोन सायबानशिवाय हायेच कोन! (थोड़ी मजा बरंका) वाशी कट्टा बुकिंग सुरु करा. गणपती नायतं दिवाळी नक्की हाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विपा

तर अशाप्रकारे २०० पार केलेले आहेत!

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/07/2016 - 08:18 नवीन
या कट्ट्याला आलेल्या प्रत्येकाने कट्टा enjoy केला हे समाधान बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठं आहे! _/\_ सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments

मिपाचे "विनोद कांबळी" पुरस्कार

राघवेंद्र
गुरुवार, 07/07/2016 - 19:58 नवीन
बोका यांच्या लागोपाठ दोन धाग्याने डबल सेंचुरी केल्यामुळे त्यांना मिपाचे "विनोद कांबळी" असा पुरस्कार द्यावा असे जेपी, नाखु यांना सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तत्काळ दुरुस्ती उर्फ उपसं च्या डुलक्या

नाखु
Fri, 07/08/2016 - 09:34 नवीन
बोका यांच्या लागोपाठ दोन धाग्याने डबल सेंचुरी केल्यामुळे त्यांना मिपाचे "राहुल द्रवीड" असा पुरस्कार द्यावा असे जाहीर करण्यात येत आहे. (कांबळी म्हणून उगा अवमुल्यन करू नै) धीराची फलंदाजी राहुल द्रवीडच करू शकतो त्याबरोबर कट्टा याचा विशेष सत्कार करण्यात येईल (त्या निमीत्तने पुनरुज्जीवीत झालेला, त्याचा बहुचर्चीत धागा कुठलाही नैराश्यावाद न येता पाचशेकडे धावत आहे) नाखु दुरुस्तीवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

नाखु काका, तेव्हा विनोद

धनंजय माने
Fri, 07/08/2016 - 09:39 नवीन
नाखु काका, तेव्हा विनोद कांबळी खरंच खूप छान खेळायचा. त्याचा अप्प्रोच तेव्हा खुपायचा पण आजच्या युवराज, कोहली वगैरेंच्या समोर तो काहीच नाही असं वाटतं. त्याच्या लागोपाठ दोन डबल सेंच्युरी खरंच सुन्दर आणि प्रशंसनीय आहेत. (नंतर स्वहस्ते डबडं करुन घेतलं ती गोष्ट वेगळी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बरोबर आहे

नाखु
Fri, 07/08/2016 - 09:57 नवीन
त्याच्या खेळन्याबद्दल कधीच आक्षेप नव्हता आणि नाही पण स्वतःच्या हाताने माती करून घेऊन वर इतरांवर दुगाण्या झाडल्यामुळे पुरता मनातून उतरला. खेळातील दर्जाबाबत गांगुलीपेक्षा काकणभर सरसच होता हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

एकुण कट्टा छान जोरदार धमाल झालाय

मारवा
Fri, 07/08/2016 - 12:02 नवीन
या कट्ट्याला येण्याची पुर्ण तयारी केलेली होती. मात्र ऐनवेळी उदभवलेल्या काही व्यक्तीगत अडचणींमुळे येऊ शकलो नाही. असो कट्टा सुरेख झाला याचा आनंद वाटतो. आयोजकांचे विशेष अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

जोरदार झालेला दिसतोय कट्टा

जगप्रवासी
Tue, 07/12/2016 - 18:58 नवीन
भावाला पण नेमकं त्याच दिवशी घर शिफ्ट करायला सुचावं..... आयला इतका झक्कास कट्टा हुकला.
  • Log in or register to post comments

मिपा कट्ट्याची धमाल वाचुन आणि

दीपा माने
Tue, 07/12/2016 - 22:57 नवीन
मिपा कट्ट्याची धमाल वाचुन आणि फोटो पाहून खुपच आनंद वाटला कारण तेथे आलेले काही मिपाकर प्रथमच जरी भेटत होते तरीही त्यातील आत्मीयता फारच आवडली. न्युयाॅर्कच्या आमच्या कट्ट्याला पायाच्या दुखापतीमुळे जाणे ठरवू शकले नाही. भारतात येणे होईल तेव्हा जर महाकट्टा (आता यापुढे महाकट्टेच होत रहातील) असल्यास नक्कीच भेटेन. आयोजकांचे मन:पुर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा