✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भीक न घालता कुत्रे कसे आवरावे ?

स
सस्नेह यांनी
Sun, 08/04/2013 - 20:53  ·  लेख
लेख
म्हणजे त्याचं असं झालं की हे सगळं त्या कुत्रीनं सुरु केलं. ओ, कुत्री ही शिवी नैये कै ! खरीखुरी कुत्री आहे. ती बघा अजून आमच्या गेटबाहेर उभी आहे. आणि तिनंच दोन महिन्यापूर्वी आमच्या नारळीखाली एक नव्हे दोन नव्हे सात पिल्ली घातली होती. पंधरा दिवस तिनं आम्हाला नारळीच्या पंधरा फुटात पाय तर टाकू दिला नाहीच, वर आणि आमच्याच अंगणात आम्हाला जायची चोरी झाली ! काठी हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पाय टाकणे जिवावरचे धाडस होऊन बसले. भगीरथ प्रयत्नाने तिची अन तिच्या पिल्लावळीची बोळवण शेजारच्या पडक्या ग्यारेजमध्ये केल्यानंतर सुद्धा तिने आपला दरारा, येत जाता वॉव वॉव करून टिकवून धरला आहे. शिवाय माहेरघरचे आमंत्रण असल्यागत वेळीअवेळी हक्काने आमच्या मागच्या दारी खरकटी शिते खाण्यासाठी ती अन तिची पिल्लावळ वरचेवर पायधूळ झाडत असतात , ते निराळेच ! म्हणजे, ती गेटवरून उडी मारून अन पिल्ले गेटखालच्या सापटीतून सरपटत ! तर या सगळ्या कुत्रीय दहशतीवर चिरंजीवाने रामबाण उपाय शोधला आहे. तो असा, की आपणच एक कुत्रा पाळायचा ! तोपण साधासुधा नव्हे, तर जर्मन शेफर्ड ! आता माझी लहानपणीची सगळी हयात अपार्टमेंटमध्ये राहून गेल्यामुळे हे बंगलेवाल्यांचे कुत्रे प्रकर्ण म्हणजे मला काला अक्षर भैस बराबर ! मग हे अज्ञान, मिपावरच्या सर्वज्ञ, तज्ञ, सूज्ञ व सदैव सल्ल्यास सज्ज असणाऱ्या निष्णात सल्लागारांकडे नेण्याचे ठरवले. तेव्हा मिपावरील सर्व सज्जन, साक्षात माहितीचे अर्णव, यांना णम्र इनंती की कृपया खालील मुद्द्यांवर मला सल्ला देऊन गार.. आपलं, उपकार करावे ! १. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ? २. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ? ३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ? ४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ? ५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ? ६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ? ७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ? ८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ? ९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ? १०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ? तर वरील सर्व माहिती मिळाल्याशिवाय कुत्रा पाळण्याचे धाडस करण्याचा इरादा पक्का होईना. मग द्या बरे तुमचा चान चान सल्ला !! a
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
44176 वाचन

💬 प्रतिसाद (123)

प्रतिक्रिया

कुत्रे पाळण्याचा अनुभव नाही,

त्रिवेणी
Sun, 08/04/2013 - 21:03 नवीन
कुत्रे पाळण्याचा अनुभव नाही, पण असे करता येईल का, एखाद्या वाघाचा किवा अजून कुत्रे ज्या प्राण्यांना घाबरता त्यांचा आवाज टेप करून ठेवायचा व त्या कुत्रीला घाबरावायचे.
  • Log in or register to post comments

...

लॉरी टांगटूंगकर
Sun, 08/04/2013 - 21:05 नवीन
http://www.misalpav.com/node/22166 याच्याशी बरेच दोस्त बाडीस आहेत, थेट अनुभव नसल्याने उत्तर नाही. मी लहानपणी सेम रामबाण उपाय दिलेला पण घरच्यांनी तो न ऐकता काही तरी भलतंच केलं... त्या बेसवर कुत्रीला हटवण्याचे असल्यास फुकट सल्ला देऊ शकतो...
  • Log in or register to post comments

धन्स. हे आधीही वाचले आहे.

सस्नेह
Mon, 08/05/2013 - 21:50 नवीन
धन्स. हे आधीही वाचले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

जर्मन शेपर्ड अतिशय नाजूक

यशोधरा
Sun, 08/04/2013 - 21:14 नवीन
जर्मन शेपर्ड अतिशय नाजूक तब्येतीचा असतो, भला मोठा दिसत असला तरीही. जरा इकडे तिकडे झाले की त्यांची तब्येत बिघडते. डॉबरमन एकदम ब्येष्ट. केस वगैरेही खूप नाही गळणार, किंवा रॉटवायलर. त्यांची जरा काळजी घ्यावी लागते. लॅबू तर एकदम ब्येष्ट! इथे पहा आणि ठरवा की कोणती ब्रीड घरी आणावयाची आहे, मग डिटेलमध्ये लिहिता येईल.
  • Log in or register to post comments

माझी माहीती.

प्रभाकर पेठकर
Sun, 08/04/2013 - 21:19 नवीन
कुत्रे पाळण्यावर पुस्तके मिळतात. अगदी सर्व जातीच्या कुत्र्यांची समग्र माहिती त्यात असते. माझा आवडता डॉबरमन आहे. आखुड केसांचा असतो. कुत्र्यांना गोड आणि तेलकट खायला घालून नका. त्याने केस गळतात (कुत्र्याचे). कुत्रे आपले घरचे जेवण (आपण जेवतो तेच) जेवतात. जास्त मसालेदार आणि तेलकट जेवण असू नये. आणि पेडिग्रीची सवय लावली तर इतर कशाला तोंड लावत नाहीत. ते महाग पडतं. आता ती कोण अनोळखी कुत्री, तुमच्या घरी चांगल्यातला (देखणा) कुत्रा आला की लवकरच सुन म्हणून बंगल्यात राहायलाच येईल. तेवढं सांभाळायचं. कुत्र्यांना एकटं मोकळं सोडायचं नाही. रोज फिरायला न्यावं लागतं. तेंव्हा साखळी बांधूनच न्यावे. नाहीतर ते रस्त्यात इथे-तिथे घाणीत तोंड घालतात. दुसर्‍या कुत्र्यांपासून तुमच्या कुत्र्यास स्पर्श होऊ नये म्हणून सांभाळायचं. संसर्गजन्य रोग असतात. त्याची बाधा होऊ शकते. कुत्रा न पाळता केवळ श्वानप्रेमापोटी एवढी माहिती मला आहे.
  • Log in or register to post comments

आता ती कोण अनोळखी कुत्री,

त्रिवेणी
Sun, 08/04/2013 - 21:24 नवीन
आता ती कोण अनोळखी कुत्री, तुमच्या घरी चांगल्यातला (देखणा) कुत्रा आला की लवकरच सुन म्हणून बंगल्यात राहायलाच येईल. तेवढं सांभाळायचं.>>>>>>>>>>>>ही ही ही
  • Log in or register to post comments

हो, बाळंत्पण तर आधीच केले आहे

सस्नेह
Mon, 08/05/2013 - 21:52 नवीन
हो, बाळंत्पण तर आधीच केले आहे, आता सूनमुखसुद्धा पुन्हा पाहीन ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय

सुबोध खरे
Sun, 08/04/2013 - 22:07 नवीन
कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय तीव्र असते त्यामुळे कुत्र्याला जागेतून हलवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे त्यांच्या बसण्याच्या जागेशी डांबराच्या गोळीचा थोडासा चुरा टाका. गोव्याला माझ्या घराच्या खिडकीखाली कुत्रीने पिल्ले दिली होती दिवसभर आणि रात्रभर कुई कुई आवाजाने उच्छाद झाल्याने वरील उपाय केला दुसर्या दिवशी कुत्रीने एक एक करून सारी पिल्ले दुसरीकडे पडक्या घरा मध्ये हलविली.
  • Log in or register to post comments

हा हा हा, खरा डॉक्टरी उपाय

बॅटमॅन
Mon, 08/05/2013 - 00:20 नवीन
हा हा हा, खरा डॉक्टरी उपाय केलात एकदम :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

@ खरा डॉक्टरी उपाय केलात एकदम

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/05/2013 - 01:00 नवीन
@ खरा डॉक्टरी उपाय केलात एकदम smiley>>> +++१११ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय तीव्र असते !

संजय क्षीरसागर
Mon, 08/05/2013 - 11:42 नवीन
केव्हाही उपयोगी पडेल असा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. सुबोधजी, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१

दादा कोंडके
Mon, 08/05/2013 - 11:56 नवीन
केव्हाही उपयोगी पडेल असा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. सुबोधजी, धन्यवाद!
सहमत. आता त्यासाठी लांडगे किंवा कुत्र्यांना घाबरवणार्‍या तत्सम प्राण्यांच्या मुतायची वाट बघायला नको! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

त्यासाठी लांडगे किंवा कुत्र्यांना घाबरवणार्‍या?

संजय क्षीरसागर
Mon, 08/05/2013 - 14:29 नवीन
अनेक विचार एकाच वाक्यात विरामचिन्हा शिवाय बांधल्यामुळे, `कुणाच्या' असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

जबरा !

धमाल मुलगा
Mon, 08/05/2013 - 20:49 नवीन
काय डोक्यालिटी है राव. सॉल्लीड लॉजिक. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धन्यवाद खरेकाका.

सस्नेह
Mon, 08/05/2013 - 21:54 नवीन
खरा उपयुक्त सल्ला दिल्याबद्दल. डांबरगोळ्यांचा स्टॉक भरून ठेवण्यात येत आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्या कुत्रीचच एखाद पिल्लु

मनीषा
Mon, 08/05/2013 - 07:24 नवीन
त्या कुत्रीचच एखाद पिल्लु दत्तक घ्या की ... अवांतर सल्ला - मला वाटते भिक घालणे परवडेल पण (शक्यतो) कुत्रा पाळू नका. आणि अगदीच पाळायचेच असेल तर बाकी काही करण्याआधी शेजार्‍यांची परवानगी घ्या.. "की आमचे कुत्र भुँकलेले चालेल का?" म्हणून.
  • Log in or register to post comments

माझे दोन पैसे ...

सुनील
Mon, 08/05/2013 - 08:48 नवीन
लेखाचा एकंदरीत टोन हा कुत्र्यांबद्दलच्या हेटाळणीचा वाटला म्हणून लिहावेसे वाटत नव्हते. तरीही, यशोधरा आणि पेठकर काकांचे प्रतिसाद वाचून लिहावेसे वाटले.
१. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ?
वर म्हटल्याप्रमाणे डॉबरमन. आमच्याकडे आहे गोल्डन रिट्रीवर. अत्यंत केसाळ! परंतु, केस हीच त्याची शान आणि ऐट!
२. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ?
जेवढे लवकर आणाल तेवढे उत्तम. ५-६ आठवड्याचे आणा.
३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ?
स्वतंत्र गादी मिळते. अर्थात आमचा "टफी" लहानपणी आमच्याच बरोबर झोपत असे!
४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ?
लहान मुलांप्रमाणेच. सवय लागेपर्यंत घरभर. एकदा सवय लागली की नेमलेल्या जागी.
५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ?
घरी आणल्यापासून लगेच.
६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ?
ब्रीडवर अवलंबून आहे. आम्ही दोन आठवड्यातून एकदा देतो. एरवी सतत केस विंचरत ठेवतो.
७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ?
लहानपणी वरचेवर - लसीकरणासाठी वगैरे. नंतर २-३ महिन्यातून एकदा पुरे.
८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ?
वेळच्यावेळी औषधपाणी केले तर काही प्रॉब्लेम येत नाही.
९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ?
! त्याला जर घरचाच एक सदस्य म्हणून वागणूक मिळणार नसेल तर न आणणेच अधिक श्रेयस्कर!
१०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ?
हौसेला मोल नाही ;) या खेरीज हे लक्षात ठेवावे की, आपल्या हिंडण्या-फिरण्यावर बरीच बंधने येतात. स्वतःची चारचाकी असेल तर, प्रवासाचा प्रश्न मिटतो. तरीही, पेट्-फ्रेंडली हॉटेल्-रेस्टॉरण्ट्स शोधताना फार यातायात होते. ते सोडले तर, पाळीव कुत्रा ही एक अत्यंत आनंददायक गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

त्याला जर घरचाच एक सदस्य म्हणून वागणूक मिळणार नसेल तर

संजय क्षीरसागर
Mon, 08/05/2013 - 11:40 नवीन
न आणणेच अधिक श्रेयस्कर!
हा प्रतिसाद अत्यंत आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

लेखाचा एकंदरीत टोन हा

सस्नेह
Mon, 08/05/2013 - 21:56 नवीन
लेखाचा एकंदरीत टोन हा कुत्र्यांबद्दलच्या हेटाळणीचा वाटला
आश्चर्य आहे ! माझ्या लेखात बरीचशी भीती अन थोडीशी चिंता आहे फक्त ...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

फुकटचा सल्ला ... विषय भर्कटवून

चौकटराजा
Mon, 08/05/2013 - 09:10 नवीन
१ आपला सर्वात जास्त राग ज्या आय डी वर असेल त्याचे नाव कुत्र्याला देणे. २ आमचा टिंब टिंब शिवमहिम्न स्तोत्र देखील म्हणतो हां ! होय की नाही रे टिंब टिंब ? असे लाडीक वाक्य पाठ करून ठेवणे ! ३.दत्तभक्त होणे. ४.वर्षातून एकदा रायगडाला सश्वान भेट देणे. ५.आपले कुत्रे ( छे.. हा काय शब्द ? आपला पेट ...हं हा शब्द चालेल ) आमच्याकडे सोपवा व निर्धास्तपणे पंधरा दिवस चीन, युरोप अमेरिका यांच्या दौर्‍यावर निघा. अशा प्रकारची छोटी जाहिरात शोधायला शिका ! ६. तुमचे कुत्रे रात्रभर भुंकून डोके उठवते त्यापेक्षा बेंकेत आणखी एखादा सेफ लॉकर का घेत नाही ? अशा विचारणेस लॉकरचे भाडे कोण तुम्ही भरणार का ? असा प्रश्न ठासून विचारायची प्रॉक्टीस करा.
  • Log in or register to post comments

कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला

रेवती
Mon, 08/05/2013 - 09:22 नवीन
कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला की त्याच्या जाण्यानंतर आठवण येताच डोळे ओले होतील. आपले लेकरू असावे तसे असते.
  • Log in or register to post comments

म्हणूनच प्राणी पाळावेसे वाटत

प्रचेतस
Mon, 08/05/2013 - 09:25 नवीन
म्हणूनच प्राणी पाळावेसे वाटत नाहीत. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगदी अगदी

प्रकाश घाटपांडे
Mon, 08/05/2013 - 09:44 नवीन
वल्ली व रेवतीशी अक्षरशः सहमत. टंकताना सुद्धा बिट्टू भुभुची जाम आठवण येते. स्नेहांकिताला सल्ला. भुभुला स्नेहांकित करुन घ्या मग काही प्रॉब्लेम येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लळा लागला की त्याच्या

गणपा
Mon, 08/05/2013 - 13:40 नवीन
लळा लागला की त्याच्या जाण्यानंतर आठवण येताच डोळे ओले होतील. आपले लेकरू असावे तसे असते.
शंभर वेळा सहमत. कुत्रं कधी घरच्यांनी पाळू दिलं नाही. मुंबईच्या तोकड्या जागेत अधीक भर कुठली? बाबांना एकदा अगदी २ दिवसांचं कोंबडीच पिल्लू मिळालं. ते ते घरी घेऊन आले. मुंबईत राहून कोंबडी कधी पाळीन अस स्वप्नातही वाटलं नव्हतं. चांगली ५-६ महिने होती. रोज सकाळी पहिल्या मजल्यावरच्या बाल्क्नीतून उडी मारून उंडरायला जायची. दुपारी परत जीने चढून घरात हजर. फार लळा लावला होता. एकदा वरच्या शेजार्‍याशी कडाक्याचं भांडण झालं माझं. त्या दिवशी आमची कोंबडी जी फिरायला गेली ती परत आलीच नाही. :( तिच्या जाण्याचं दु:ख ईतकं होतं की बहिणीने ६-७ महीने (शिजवलेल्या) कोंबडीला तोंडही लावलं नाही. मलाही फार वाईट वाटलं होतं, पण बहिणी ईतका त्याग माझ्याने काही झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ह्म्म्म... रोचक चर्चा !

मदनबाण
Mon, 08/05/2013 - 09:43 नवीन
ह्म्म्म... रोचक चर्चा ! ;) बाकी मी खाली देतो तसा कुत्रा मिळाला तर नक्की पहा ! घराच्या आवारतलं काय अख्ख्या १ किलोमीटर परिघात कोणी येण्याची हिम्मत करणार नाहीत ! नातेवाईक सुद्धा लांबच राहतील ! ;) Image removed. जाता जाता :--- माझ्या आवडत्या भू भू वर काही तरी लिहावे असे बर्‍याच वेळा वाटले आहे, पण ते मी टाळले आहे.इतका मस्त कुत्रा नंतर माझ्या पाहण्यात कधीच आला नाही. :(
  • Log in or register to post comments

आँ

प्रकाश घाटपांडे
Mon, 08/05/2013 - 09:47 नवीन
लई भारी. दत्तभक्तांना कुत्रा काही करत नाही असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कुत्रा अजिबात पा़ळु नका

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 08/05/2013 - 09:56 नवीन
कुत्रा हा अतिशय निरुपयोगी,लोचट आणि बिनडोक प्राणी आहे. कुत्रा पाळल्याने फायदा तर काही होतच नाही उलट शेजारी, मित्रमंडळी दुरावतात. रात्री बेरात्री भुंकुन तो डोके उठवतो. उगाच लोचटासारखा पायात तडमडत रहातो. त्याचे खाणे पिणे आणि मेंटेनंन्स हे वेगळेच. त्या शिवाय आपल्या हिंडण्या फिरण्यावरही बंधने येतात.इतरही अनेक कारणे आहेत. त्या पेक्षा मांजर जरा बरी असते. पण ती देखील निरुपयोगी. कुठले जनावर पाळायचे असेल तर एखादी गाय किंवा शेळी पाळा. कुत्र्या एवढ्या कष्टात आणि खर्चात तुम्हाला ती दुध तरी मिळेल. किंवा कोंबड्या पाळा. मासे पाळण्याचा देखील विचार करुन बघा. तो पण पर्याय बरा आहे. ते बिचारे तर तुम्ही ठेवाल त्या कोपर्‍यात गुमान रहातात. जरा मोठा टँक घेतलात किंवा घराच्या मागे छोटेसे तळे किंवा हौद बांधलात तर खायचे मासे सुध्दा घरच्या घरी मिळु शकतात. एकदम ताजे ताजे. वरचे काहीच पटले नाही तर एखादा घोडा किंवा हत्ती पाळा. ऑफिसला जाण्यासाठीचा पेट्रोलचा खर्च तर नक्कीच वाचेल. पण कुत्रा अजिबात पा़ळु नका.
  • Log in or register to post comments

सहमत...

निवेदिता-ताई
Mon, 08/05/2013 - 13:49 नवीन
कुत्रा अज्जिबात पाळू नका.....हे म्हणजे विकतचे दुखणे घेण्यासारखे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

एक वेळ श्रावण पाळा

सुबोध खरे
Mon, 08/05/2013 - 12:19 नवीन
एक वेळ श्रावण पाळा फार तर महिनाभर त्रास होतो पण कुत्रा अजिबात पा़ळु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आवडले. मुळात व्यावसायिक उपयोग

अप्पा जोगळेकर
Sat, 08/10/2013 - 16:06 नवीन
आवडले. मुळात व्यावसायिक उपयोग वगळता जनावरे पाळावीतच कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मांजळ पाळा

अविनाशकुलकर्णी
Mon, 08/05/2013 - 10:02 नवीन
मांजळ पाळा
  • Log in or register to post comments

गावी असलेल्या घरात कुत्रं

किसन शिंदे
Mon, 08/05/2013 - 10:21 नवीन
गावी असलेल्या घरात कुत्रं पाळणं एकवेळ ठिक पण शहरातल्या घरात पाळायचं म्हणजे खरंचच भिक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था होते.
  • Log in or register to post comments

अवांतर-

कोमल
Mon, 08/05/2013 - 10:42 नवीन
अवांतर- मागे एकदा अस्साच बोक्यासाठीचा धागा आला होता.. त्याची आठवण झाली :)) :)) :))
  • Log in or register to post comments

न पाळलेलाच बरा.

नि३सोलपुरकर
Mon, 08/05/2013 - 11:17 नवीन
वल्ली व रेवतीताईशी अक्षरशः १०० % सहमत.
  • Log in or register to post comments

आपला पास.....

दिपक.कुवेत
Mon, 08/05/2013 - 11:57 नवीन
मुळात पाळिव प्राणी/पक्षी हे दुरुनच पहायला आवडतात....ते घरात पाळायची तर दुरची गोष्ट! एक तर ते (कुत्रा/मांजर) घरभर फिरतात, त्यांचे केस गळतात, जेवताना नको ईतके जवळ येतात, पायात घुटमळतात.....म्हणुन ते आपले पहायला दुरुनच बरे वाटतात. एवढे करुन वर त्यांनी नखं दाखवलीच तर काय घ्या? वर त्रिवेनिचा सला ब्येस्ट. कमी खर्चिक, दुसर्‍यांना कमी त्रासदायक! कुत्रेच काय कुण्या माणसांचीहि तुमच्या घराकडे पाहण्याची हिम्मत होणार नाहि :D
  • Log in or register to post comments

नवरा.

प्रभाकर पेठकर
Mon, 08/05/2013 - 12:04 नवीन
अहो दिपकजी,
घरभर फिरतात, त्यांचे केस गळतात, नको ईतके जवळ येतात,
हे गुण विशेष 'नवरा' ह्या प्राण्यातही आढळतात पण म्हणून काय....... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

केस गळणे हा गुणविशेष नवरी

बॅटमॅन
Mon, 08/05/2013 - 12:10 नवीन
केस गळणे हा गुणविशेष नवरी नामक प्राण्यात विशेषेकरून आढळतो, वरील सर्व गुणधर्म त्यांनाही लागू होतात बरं का पेठकरकाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सेफ.

प्रभाकर पेठकर
Mon, 08/05/2013 - 12:16 नवीन
मी आपला 'सेफ गेम' खेळलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तेही खरंच म्हणा. मिपावर तरी

बॅटमॅन
Mon, 08/05/2013 - 12:18 नवीन
तेही खरंच म्हणा. मिपावर तरी किमान नवरे किंवा एकुणातच पुरुष हे अतिशय सेफ पात्र आहे. कोणीही काहीही बोला, टेन्शन इल्ले. पण बाकी काही बोलोगे तो बोलेंगे के बोलता है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पु.ल च्या , माझ्या आणि तमाम

माझीही शॅम्पेन
Mon, 08/05/2013 - 12:09 नवीन
पु.ल च्या , माझ्या आणि तमाम लोकांच्या शत्रू-पक्षा बद्दल चांगल लिहिण जमणार नाही , एकच सांगतो मित्र-मैत्रिणी खात्रीशीर पाने दूरवतात हे नक्की !!! (एका जवळच्या मैत्रिणी कडे जाण सोडून दिल , तिच्या कडे एकदा खिरित कुत्र्याचा केस आला होता :( )
  • Log in or register to post comments

खिरीत कुत्र्याचा केस????????

बॅटमॅन
Mon, 08/05/2013 - 12:11 नवीन
खिरीत कुत्र्याचा केस???????? (ओकारीवाली स्मायली आहे का हो कुणाकडे?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

नंतर जेवताना माझे काय हाल

माझीही शॅम्पेन
Mon, 08/05/2013 - 12:21 नवीन
नंतर जेवताना माझे काय हाल झाले...सांगता सोय नाही , त्यासाठी फक्त तो 3-इडीयट्स लाटण्याचा प्रसंग आठवा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अर्थातच..पण क्वचित का होईना,

बॅटमॅन
Mon, 08/05/2013 - 12:25 नवीन
अर्थातच..पण क्वचित का होईना, मानवी केस जेवणात आल्याचा केवळ पूर्वानुभव असल्याने इतके काही वाटत नाही...कुत्र्याचा केस म्हंजे अतीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

ही घ्या

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/05/2013 - 14:33 नवीन
ही घ्या Image removed. =================================== आत्मू'ज स्मायली भांडा रं! =)) आमचे येथे सर्व प्रकारच्या "ताज्या" स्माईली मिळतील! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वल्ली व रेवतीशी पूर्णपणे सहमत!!!

नक्शत्त्रा
Mon, 08/05/2013 - 12:22 नवीन
"कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला की त्याच्या जाण्यानंतर आठवण येताच डोळे ओले होतील. आपले लेकरू असावे तसे असते.म्हणूनच प्राणी पाळावेसे वाटत नाहीत. " वल्ली व रेवतीशी पूर्णपणे सहमत!!! लहानपणी हे सर्व करून जाहले आहे. Lifelong आठवणी पुरतत. फक्त तुमचे मन खंबीर पाहिजे. माझे मन एवढे खंबीर नाहीये आणि त्यामुळे आता हे धाडस नाही करवत. आता हे सगळे पाळिव प्राणी/पक्षी हे दुरुनच पहायला आवडतात.
  • Log in or register to post comments

कोण आधी?

प्रभाकर पेठकर
Mon, 08/05/2013 - 12:24 नवीन
म्हणूनच मी वयाच्या पासष्टी नंतर कुत्रा पाळणार आहे. जे काय दु:ख व्हायचे ते त्याला होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नक्शत्त्रा

@जे काय दु:ख व्हायचे ते

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/05/2013 - 14:29 नवीन
@जे काय दु:ख व्हायचे ते त्याला होईल.>>>=)) पेठकर काका,आज एकावर एक षटकार लावताय!=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

कशावरुन?

अनिरुद्ध प
Mon, 08/05/2013 - 18:54 नवीन
कशावरुन? हे ग्रुहितक मान्ड्ले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

दु:खदायक गृहीतक.

प्रभाकर पेठकर
Tue, 08/06/2013 - 02:22 नवीन
सर्वसाधारणपणे कुत्र्यांचे आयुष्य १५ वर्षांपर्यंत असते असे ऐकले आहे. आमच्या घराण्यात अजून ८० च्यापुढे कोणी गेले नाही (सर्व आधीच गेले). तसेच घराण्यात कोणालाही नसणारी व्यसनं मी केली आहेत आणि कांही अजून चालू आहेत. त्यामुळे ८० ही माझी 'डेड लाईन' नाही. त्या आधीच मिपावर श्रद्धांजलीचा धागा कोणीतरी टाकेलच. (टाका बरका. नाहीतर 'प्रभाकर भूतकर' नांवाची नविन आयडी येईल.) तुम्ही कसेही असा कुत्रा तुमच्यावर प्रेम करतोच करतो. त्यामुळे त्याला बिचार्‍याला नक्कीच दु:ख होईल. तो इमानदार असतो, त्याच्या जवळ छक्के-पंजे नसतात. माझ्या कुत्र्याने अगदीच जेवण वगैरे नाही सोडलं तरी कांही काळ 'ब्लॅक डॉग' आणि चखण्याला तोंड लावणार नाही ह्याची मला खात्री आहे. दु:खभराने माझ्या लॅपटॉप समोर कुंई-कुंई करेल. कोणी लॅपटॉप उघडून माझ्या पाककृती त्याला दाखवल्या तर कृतार्थ नजरेने तो त्या पाहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

अगं आईग्गंऽऽऽ......

धमाल मुलगा
Tue, 08/06/2013 - 02:36 नवीन
=)) =)) =)) आहे आहे...तुमच्यासुध्दा विनोदाला कारुण्याचं झालंऽऽरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा