म्हणजे त्याचं असं झालं की हे सगळं त्या कुत्रीनं सुरु केलं.
ओ, कुत्री ही शिवी नैये कै ! खरीखुरी कुत्री आहे. ती बघा अजून आमच्या गेटबाहेर उभी आहे. आणि तिनंच दोन महिन्यापूर्वी आमच्या नारळीखाली एक नव्हे दोन नव्हे सात पिल्ली घातली होती. पंधरा दिवस तिनं आम्हाला नारळीच्या पंधरा फुटात पाय तर टाकू दिला नाहीच, वर आणि आमच्याच अंगणात आम्हाला जायची चोरी झाली ! काठी हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पाय टाकणे जिवावरचे धाडस होऊन बसले. भगीरथ प्रयत्नाने तिची अन तिच्या पिल्लावळीची बोळवण शेजारच्या पडक्या ग्यारेजमध्ये केल्यानंतर सुद्धा तिने आपला दरारा, येत जाता वॉव वॉव करून टिकवून धरला आहे. शिवाय माहेरघरचे आमंत्रण असल्यागत वेळीअवेळी हक्काने आमच्या मागच्या दारी खरकटी शिते खाण्यासाठी ती अन तिची पिल्लावळ वरचेवर पायधूळ झाडत असतात , ते निराळेच ! म्हणजे, ती गेटवरून उडी मारून अन पिल्ले गेटखालच्या सापटीतून सरपटत !
तर या सगळ्या कुत्रीय दहशतीवर चिरंजीवाने रामबाण उपाय शोधला आहे. तो असा, की आपणच एक कुत्रा पाळायचा ! तोपण साधासुधा नव्हे, तर जर्मन शेफर्ड !
आता माझी लहानपणीची सगळी हयात अपार्टमेंटमध्ये राहून गेल्यामुळे हे बंगलेवाल्यांचे कुत्रे प्रकर्ण म्हणजे मला काला अक्षर भैस बराबर ! मग हे अज्ञान, मिपावरच्या सर्वज्ञ, तज्ञ, सूज्ञ व सदैव सल्ल्यास सज्ज असणाऱ्या निष्णात सल्लागारांकडे नेण्याचे ठरवले.
तेव्हा मिपावरील सर्व सज्जन, साक्षात माहितीचे अर्णव, यांना णम्र इनंती की कृपया खालील मुद्द्यांवर मला सल्ला देऊन गार.. आपलं, उपकार करावे !
१. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ?
२. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ?
३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ?
४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ?
५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ?
६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ?
७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ?
८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ?
९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ?
१०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ?
तर वरील सर्व माहिती मिळाल्याशिवाय कुत्रा पाळण्याचे धाडस करण्याचा इरादा पक्का होईना.
मग द्या बरे तुमचा चान चान सल्ला !!
वाचने
44723
प्रतिक्रिया
123
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयशप्पत!!!
In reply to धम्या लेका फ्रेंच मॅस्टिफ by अभ्या..
हरकत नाय बे! आपुन त्यवड्या
In reply to आयशप्पत!!! by धमाल मुलगा
:)
लेख लै आवडला..
In reply to :) by धमाल मुलगा
दादानु...
In reply to लेख लै आवडला.. by शैलेन्द्र
लॅब आवडला नाही असा पहिलाच पाहिला :)
In reply to लेख लै आवडला.. by शैलेन्द्र
हे कुत्र पाळणं म्हणजे एक पीडाच की हो....!
In reply to :) by धमाल मुलगा
बोंबला तिच्यायला!
In reply to हे कुत्र पाळणं म्हणजे एक पीडाच की हो....! by प्रभाकर पेठकर
मजा आली!
अगदी अगदी. आमचा भूभू गेला
In reply to मजा आली! by पैसा
कुत्रा हे प्रचंड काम आहे.
In reply to मजा आली! by पैसा
समजते आहे
In reply to कुत्रा हे प्रचंड काम आहे. by लंबूटांग
वर धमु ने बरीच माहिती दिलेलीच आहे
- कुत्र्याला फर्निचर वर अजिबात चढू देत नाही. एकदा का ती सवय लागली की मोडणे महाकठीण. तो/ ती कितीही आजारी असली तरीही.
- कुत्र्याला रोज भरपूर चालवणे/ पळायला नेणे. कुत्रा लहान असताना एखाद्या बाळाप्रमाणे एनर्जी असते. जर पुरेशी exerciseनसेल तर मग ती ऊर्जा काहीतरी इतर उपद्व्याप करण्यात निघते. पण कुत्रा दीड वर्षाचा होईपर्यंत २० मिनिटापेक्षा जास्त सलग चालवले नाही. या काळात त्यांची हाडे विकसीत होत असतात. खूप ताण दिला तर म्हातारपणाआधीच सांधेदुखी व इतर हाडांचे त्रास होऊ शकतात.
- कुत्र्याला नेहमी - अक्षरशः नेहमी पट्टा (leash) बांधूनच चालवणे. तुमचा कुत्रा कितीही गुणी असला तरी बाकीचे कुत्रे गुणी असतीलच याची खात्री नाही आणि त्यांची एखादी कृती तुमच्या कुत्र्याला घाबरवू शकते (पळत सुटून गाडीखाली जाण्याचा धोका) किंवा स्व संरक्षणाला परावृत्त करू शकते.
- कुत्र्याला तुमच्या बरोबर किंवा तुमच्या मागे मागे चालवणे. तो तुमचा लीडर नसून तुम्ही त्याचे लीडर आहात. अमेरिकेत त्यासाठी एक Sensible No Pull Harness मिळते. कुत्र्याने जास्ती ओढ दिल्यास तो वळून त्याचे तोंड तुमच्याकडे होते. पण इतरही उपाय आहेत.
- त्यांच्या खाण्या पिण्याच्या वेळा कसोशीने पाळणे. एक वेळापत्रक तयार झाले की तुम्हाला आणि कुत्र्यालाही बरे.
- त्याला grain free diet वर ठेवले आहे. फक्त आणि फक्त dog food च देतो. चुकूनही आपले उरलेले त्याला देत नाही. कुत्रे माणसाळण्याआधी ते शिजवलेले आणि तेलकट तुपकट खात नसत त्यामुळे मला तरी logically हे पटले. तसेही एकदा ती चटक लागली की मग आशाळभूतासारखे आपण जेवत असताना बघणे सुरू राहते.
सद्ध्या तरी इतकेच आठवते आहे.एक राहिले
In reply to वर धमु ने बरीच माहिती दिलेलीच आहे by लंबूटांग
छान माहिती. तुझ्या बाळाचा
In reply to एक राहिले by लंबूटांग
पर्फेक्ट आणि पर्फेक्ट! :)
In reply to एक राहिले by लंबूटांग
कुत्रा पाळायचा की नाही हे
तिला थांबवायला गेटची उन्ची
In reply to कुत्रा पाळायचा की नाही हे by कवितानागेश
तिला थांबवायला गेटची उन्ची खालून वरून वाढवून घे की. तिचे येणं तरी बंद होईल.ही ही हा हा हा हा!!! (संदर्भः तुमचीच सही... आवांतरः सही सही आहे :) )प्रयोग
एक नम्र सूचना
In reply to प्रयोग by इन्दुसुता
मागे कुठे तरी उंदीर कसा बाहेर
आपली पॉलिसी
बिंधास्त कुत्रा पाळा...
इकडे कुत्रा, तिकडे उंदीरपुराण
धनगरी कुत्रे पाळा,सगळ्यात चांगली जात......
कुत्र्यासारखा दुसरा पाळीव
रागावु नका, सहज एक गंमत
In reply to कुत्र्यासारखा दुसरा पाळीव by अन्तु बर्वा
हा हा हा!
In reply to रागावु नका, सहज एक गंमत by त्रिवेणी
धमाल मुलगा यांच्या श्वान
धन्यवादस लोक्सहो !
घेतला तर रेअर ब्रीडचा घेऊ
In reply to धन्यवादस लोक्सहो ! by सस्नेह
हाहाहा!
In reply to घेतला तर रेअर ब्रीडचा घेऊ by अभ्या..
कारवानी/धनगरी....
In reply to घेतला तर रेअर ब्रीडचा घेऊ by अभ्या..
झालं?
अरे बाबा, जो है वो वन प्लस
In reply to झालं? by स्पंदना
काटे से काटा! कुत्तेसे कुत्ता
In reply to अरे बाबा, जो है वो वन प्लस by सस्नेह
"काटे से काटा" यानेके
In reply to काटे से काटा! कुत्तेसे कुत्ता by स्पंदना
आयला शतक? माझा शतकी प्रतिसाद
रोचक विषय अन अतिरोचक चर्चा
आई शप्पथ
पुष्कळ लोकांनी सातातले एखादे
ओळखा याला
हरलो!
In reply to ओळखा याला by चाफा
आधी याला ओळख.
In reply to हरलो! by धमाल मुलगा
जर्मन शेफर्डचा बच्चा आहे!
In reply to आधी याला ओळख. by स्पंदना
केव्हढा मस्त आहे ना?
In reply to जर्मन शेफर्डचा बच्चा आहे! by धमाल मुलगा
नाय ओळखता येत. आता सांग लवकर
जमल्यास खालील भागा वाचा...
समस्त सल्लाकारांना कळवणेस
अरे वा!!
In reply to समस्त सल्लाकारांना कळवणेस by सस्नेह
रच्याकने
नाही हो ! ती गेली. आता राहिले
In reply to रच्याकने by अनन्त अवधुत
स्नेहांकिता,छान! कुत्रे अतिशय