Skip to main content

भीक न घालता कुत्रे कसे आवरावे ?

लेखक सस्नेह यांनी रविवार, 04/08/2013 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे त्याचं असं झालं की हे सगळं त्या कुत्रीनं सुरु केलं. ओ, कुत्री ही शिवी नैये कै ! खरीखुरी कुत्री आहे. ती बघा अजून आमच्या गेटबाहेर उभी आहे. आणि तिनंच दोन महिन्यापूर्वी आमच्या नारळीखाली एक नव्हे दोन नव्हे सात पिल्ली घातली होती. पंधरा दिवस तिनं आम्हाला नारळीच्या पंधरा फुटात पाय तर टाकू दिला नाहीच, वर आणि आमच्याच अंगणात आम्हाला जायची चोरी झाली ! काठी हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पाय टाकणे जिवावरचे धाडस होऊन बसले. भगीरथ प्रयत्नाने तिची अन तिच्या पिल्लावळीची बोळवण शेजारच्या पडक्या ग्यारेजमध्ये केल्यानंतर सुद्धा तिने आपला दरारा, येत जाता वॉव वॉव करून टिकवून धरला आहे. शिवाय माहेरघरचे आमंत्रण असल्यागत वेळीअवेळी हक्काने आमच्या मागच्या दारी खरकटी शिते खाण्यासाठी ती अन तिची पिल्लावळ वरचेवर पायधूळ झाडत असतात , ते निराळेच ! म्हणजे, ती गेटवरून उडी मारून अन पिल्ले गेटखालच्या सापटीतून सरपटत ! तर या सगळ्या कुत्रीय दहशतीवर चिरंजीवाने रामबाण उपाय शोधला आहे. तो असा, की आपणच एक कुत्रा पाळायचा ! तोपण साधासुधा नव्हे, तर जर्मन शेफर्ड ! आता माझी लहानपणीची सगळी हयात अपार्टमेंटमध्ये राहून गेल्यामुळे हे बंगलेवाल्यांचे कुत्रे प्रकर्ण म्हणजे मला काला अक्षर भैस बराबर ! मग हे अज्ञान, मिपावरच्या सर्वज्ञ, तज्ञ, सूज्ञ व सदैव सल्ल्यास सज्ज असणाऱ्या निष्णात सल्लागारांकडे नेण्याचे ठरवले. तेव्हा मिपावरील सर्व सज्जन, साक्षात माहितीचे अर्णव, यांना णम्र इनंती की कृपया खालील मुद्द्यांवर मला सल्ला देऊन गार.. आपलं, उपकार करावे ! १. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ? २. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ? ३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ? ४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ? ५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ? ६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ? ७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ? ८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ? ९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ? १०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ? तर वरील सर्व माहिती मिळाल्याशिवाय कुत्रा पाळण्याचे धाडस करण्याचा इरादा पक्का होईना. मग द्या बरे तुमचा चान चान सल्ला !! a

वाचने 44723
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

In reply to by अभ्या..

लेकरु क्यवढं मोठ्ठं झालं रे! :) >>इथं हे धूड दोघांना आवरत नाहीय्ये. चक्क पिंजरा लावावा लागलाय. आता मालकाच्याच सवयी लागल्या तर आणि काय होयाचं? ;) >>अजून बी हवं आसल तर सांग गड्या पण एक्स्ट्रा दोन माणसाचं शिजवस्तवर वैनीसायबाचा पिट्टा पडल हरकत नाय बे! आपुन त्यवड्या कारणानं बाई ठेऊ. >आन घेतलं तर कपल घे. उगा उपासमार करु नकोस त्याची. जास्त पिसाळतेय मंग. =)) =)) =)) हौ! अन घराबाहेर बोर्ड लावतो, - 'फ्रेंच मॅस्टिफ स्पेशॅलिष्ट! आमचे येथे फ्रेंच मॅस्टिफ वधू/वर मिळवून देणेपासून ते तुमच्या फ्रेंच मॅस्टिफिणीच्या बाळंतविड्यापर्यंत सारं काही खात्रीलायकरित्या करुन मिळेल.' :D

एकुणच जनावरं फार आवडतात, त्यात कुत्र्यांचा नंबर लै वरचा है. :) साले जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय ते शिकवतात राव. :) आपल्या प्रश्नांची यथामती उत्तरं देण्याचा प्रयत्न - सर्वात प्रथम, कोणत्या प्रकारचं कुत्रं पाळायचं आहे ते ठरवा. ती छटाक-पावशेर मापातली बिन्डोक अन होपलेस ब्रिड्स असतात त्यांचा विचारही करु नका. निव्वळ किरकिरी, नाजुक अन (बिनडोकपणामुळं) ओव्हर कॉन्फिडन्सवाली असतेत. तसंही तुम्ही अपार्टमेंटमध्ये रहात नसल्यानं मिड/लार्ज साईझच्या कुत्र्यांना नीट ठेवता येणं शक्य आहे तुम्हाला. घरात लहान मूल आहे का? असेल तर शांत स्वभाव असलेली ब्रीड निवडावी लागेल. मोठी मुलं असतील तर बिन्धास्त हाऊंड / टेरिअर अश्या मस्तीखोर ब्रीड्सचा विचार करु शकता. रॉटविलर किंवा बुलडॉगसारखे तद्दन तिरसट टाळक्याचे कुत्रे आणायचे असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणारं अन प्रेमासोबत आपलं ऐकायला लावेल असं कोणी खंबीर माणूस घरात असेल तर ठीक. (शक्यतो बायकांना आपण हायकमांड असल्याचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो नवर्‍याचं भिजलं मांजर केल्यामुळं...अशा बायकांचं गर्वहरण करण्यासाठी रॉटविलर बेष्ट उपाय असतो ;) ). पण जर नीट सांभाळला तर रॉटसारखा दुसरा सवंगडी नाय राव. दणकट, रासवट, काही मोजक्या लोकांसोबत प्रेमळ आणि इतरांसाठी म्हणजे आग्यावेताळ! बुलडॉग त्याच्यापेक्षा दोन पायर्‍या खालचा. दोघांचंही फरकोट उत्तम! केस फारसे नसतात त्यामुळं गळण्याचा प्रश्न फार नाही. हूमदांडगे असल्यानं त्यांना घरात घेण्याचा प्रश्न शक्यतो येत नाही..जे असेल ते अंगणात! त्यानंतर नंबर लागतो तो डॉबरमॅनचा. हुशार असतात बेटे! दिसायलाही मोठे ऐटबाज. केस गळण्याची भानगड नाही. पण तब्येतीनं बर्‍यापैकी नाजूक असतात असं आपलं एक निरिक्षण. कमी खर्चात, भारी कडक असलेलं कुत्रं हवं असेल आणि दिसण्याबाबत आग्रही नसाल (कुत्रं=शोपीस असं गणित नसेल तर) कारवानी (कारवान हाऊंड) सारखं दुसरं कुत्रं नाही. दिसताना दिसतं पाप्याचं पितर, पण अंगात असा जोर असतो...ह्ये कुत्रं ज्या अंगणात बांधलेलं असतं, त्या घराकडं मुरलेला चोर स्वप्नातही फिरकत नाही! सर्वात सेफ गेम म्हणजे - लॅब्रेडॉर. एकदम शाणं शाणं बाळ.
१. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ?
डॉबरमॅन, रॉटविलर, बुलडॉग, कारवानी....उवा कुत्र्यांना होत नाहीत, पिसवा मात्र असतात, अन गोचिडं. कुत्र्याची नीट स्वच्छता ठेवली नाही तर टकल्या कुत्र्यालाही हे किडे छळणारच. त्याला पर्याय नाही. नीट स्वच्छता केली तर अफगाण हाऊंडलाही पिसवा वगैरे श्वापदांचा बुज्बुजाट होत नाही. श्वानशिशूंच्या किंमती ह्या त्यांच्या ब्लडलाईनवर अवलंबून असतात. केसीआय रजिस्टर्ड हवं असेल तर जास्त असतात, क्रॉसब्रीड असेल तर स्वस्त मिळतात. आपल्या भागातल्या एजंटांकडं चौकशी करुन साधारण अंदाज घेणे. म्हमईतली किंमत पुण्यात लागू होत नाही अन पुण्यातली कोल्लापूरात. २. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ? ६ आठवडे. ३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ? वेग़ळी. नाजुक ब्रीड असेल तर छपराखाली/घरात, अन्यथा अंगणात. ४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ? सुरुवातीला त्रास होतोच. हळूहळू शिकवलं की कळायला लागतं. फिरायला नेलं की ठरल्या ठिकाणी कार्यभाग उरकायची सवय आपसूक लागते. ५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ? तसा ठराविक नियम नाही. दूध पहिल्यापासून, सुरुवातीला भाकरी दुधात बारीक कुस्करुन ...नंतर नुसतं दूध, नुसती भाकरी, मग अंडी, मग चिकन अन मग बीफ. ६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ? दर आठवड्याला. एरवी दिवसाआड ब्रशिंग. बारीक केसांचं कुत्रं असेल तर आंघोळीआधी अर्धातास लोण्यानं मालीश करावं. ७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ? जनरली, पिल्लू घेतलं की त्यासोबत व्हॅक्सिनेशनचा एक तक्ताही देतात. तो फॉलो करायचा. पिल्लू आणल्यानंतर व्हेटकडे एक भेट देऊन यायचं. प्राथमिक तपासणी झाली की व्हेट सांगतातच पुढचा क्रम. :) ८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ? आंघोळीचं वेळापत्रक नीट पाळावं. न चुकता पिसवारोधक पावडर लावावी. भटक्या कुत्र्यांशी लगट करु देऊ नये. खाण्यात तेलकट अन्न देऊ नये. व्हेट टूथपेस्ट्स मिळतात त्यांनी आठवड्यातून साधारणतः दोनदा दात घासून द्यावेत. बाकी, घरातल्या लहान बाळाबाबत पाळतो तशी इन जनरल पथ्यं...वेळच्यावेळी खाणं, वेळच्यावेळी शी-शू वगैरे.... ९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ? शक्यतो नकोच. त्यामध्ये हायजिनपेक्षा वस्तुंच्या नुकसानाचा मुद्दा जास्त येतो. तुम्ही कुत्र्याची स्वच्छता नीट ठेवली असेल तर काही प्रॉब्लेम नसतो घरात येऊ देण्याचा, पण त्यांच्या मस्तीनं फर्निचरची वाट लागू शकते. ते चालत असेल तर बिन्धास्त येऊंद्या. :) १०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ? प्रेमाचं मोल करता नाही. :) मान्य आहे, सध्या तुम्ही गरज म्हणून ह्या विषयाकडं पाहताय, पण एकदा ते घरी आलं की आठवड्याभरात असं जीव लावेल की मग मी काय म्हणतोय त्याच्याशी सहमत व्हाल. :) एक औषधपाण्याचा खर्च सोडला तर तसा फार खर्च होत नाही. फारतर घरात एक-दीड व्यक्तीचा खर्च आणखी असं म्हणा. आणखी काही प्रश्न असतील तर अभ्याला विचारा! त्यो फार्महाऊसवर ब्रिडींग करायचा. :) जाताजाता : कुत्र्याचं पिलू आणायचं, ते मोठं होणार, मग त्या कुत्रीला हुसकून लावणार...प्रवास अंमळ मोठा आहे. ह्या उपायाचा उपयोग त्या कुत्रीच्या पुढच्या विणीनंतर होईल. तोपर्यंत गलोल, लवंगी फटाके, खेळण्यातल्या पेलट्सवाल्या पिस्टलचा उपेग करा. :)

In reply to by धमाल मुलगा

लेख लै आवडला.. "सर्वात सेफ गेम म्हणजे - लॅब्रेडॉर. एकदम शाणं शाणं बाळ. " सालं, मला तो कधिच नाही आवडला.. पुढ्चा कुत्रा म्हणजे एक रॉट आणी एक बुल्डॉग.. दोन पाळणार, एक नाही..

In reply to by शैलेन्द्र

>>लेख लै आवडला.. =)) =)) घाल काड्या. ;) च्यायला! कुत्रं हा विषय निघाला की हे असंच होतं बघ. किती बोलू न किती नको अशी गत. >सालं, मला तो कधिच नाही आवडला.. गरीब असतो. शांत असतो...रॉटसारखी रांगडी कुत्री आवडणार्‍यांना लॅबचं कशाला कवतिक असतंय? पण एक सांगतो, ज्या घरात अगदी लहान पोरं असतील त्या घरात पोरांचा सवंगडी म्हणून आणायला लॅबसारखं दुसरं भूभू नाय. पोरांच्या जोडीनं वाढवलं तर कळतंय राव. अशक्य प्रेम करतात लेकरांवर. नीट खेळवतात, पोर रडत असेल तर कावरीबावरी काय होतात, त्या पोराला शांत करेपर्यंत आपल्याला किती छळतात...फार समजूतदार जमात बघ. >>पुढ्चा कुत्रा म्हणजे एक रॉट आणी एक बुल्डॉग.. दोन पाळणार, एक नाही.. अग्ग्ग्ग्गं....गुरुऽऽ....दोन्ही एकदम? आणशील तेव्हा नक्की सांग. मी येईन खेळायला. बुलडॉगसोबत कुस्ती खेळलायस काय कधी? जबर्रा यक्सपिरियन्स असतोय. फक्त त्याला आपली मान धरु द्यायची नाय. ;)

In reply to by शैलेन्द्र

माझ्याकडे दीड वर्षाचा लॅब आहे. होणार्‍या अर्धांगिनीचे मत फारसे अनुकूल नसूनही आणला आणि आता तीच जास्ती प्रेम करते. भयंकर केस गळतात घरभर हा एकच काय तो त्रास. पण इतकं भयानक प्रेम करतात मालकावर की विचारू नका. ३ आठवड्यांपूर्वी hiking ला नेले होते. कोणी नसल्याने पट्टा लावला नव्हता सारखे पुढे पुढे पळत मग मागे आम्ही येतोय का नाही बघायल फिरून येत होता. ६ मैलाची हाईक असेल पण ह्याने बहुधा ९ एक माईल्स तरी केले असतील. घरी आल्यावर बघितले तर पायाची सालटी निघाली होती. एका ठिकाणी तर सर्वसाधारणपणे काळी पॅड्स असतात त्यांच्या पायावर ती पूर्ण सोलवटून खालची गुलाबी चामडी दिसत होती. हूं का चू केले नाही. आम्हालाच फार वाईट वाटले.

In reply to by धमाल मुलगा

बारीक केसांचं कुत्रं असेल तर आंघोळीआधी अर्धातास लोण्यानं मालीश करावं.
आई शप्पत! त्या अर्ध्या तासात त्याला मोकळं सोडू नका. गल्लीतले सर्व कुत्रे आणि कुत्र्या त्याला चाटायला घरात घुसायच्या आणि एक नसती पीडा होऊन बसायची. त्याचं स्वतःचं तोंडही बांधून ठेवावं नाहीतर एकदा 'टेस्ट' लागली तर तोच स्वतःला चाटून साफ करेल आणि मग लोणी पोटात गेल्याने केस गळायला लागतील. घरात लोण्याचा छोटासाच तुकडा उरला असेल तर तो आपल्या नाश्त्याच्या पावाला लावायचा की कुत्र्याच्या अंगाला ह्या विचारात ऑफिसला उशीर होण्याची शक्यता जास्त. बायकोने आपल्याला, नाश्त्याच्या पावाला लावायला, अमूल बटर दिले आणि कुत्र्याला घरचे शुद्ध लोणी फासले तरीही कुटुंबकलहाला तोंड फुटू शकते. चारही बाजूंनी लोणी फासलेल्या ह्या बुळबुळीत प्राण्याला आंघोळीसाठी न्हाणीघरात कसे ओढत न्यायचे ही अजून एक समस्या. एका हातात पेटता लायटर घेऊन, 'आता येतोस आंघोळीला की पेटवू इथेच' असा आक्रमक पवित्रा घेतल्यास कुत्र्याच्या मनातून तुम्ही कायमचे उतरू शकता. पाहा बुवा!

In reply to by प्रभाकर पेठकर

>>चारही बाजूंनी लोणी फासलेल्या ह्या बुळबुळीत प्राण्याला आंघोळीसाठी न्हाणीघरात कसे ओढत न्यायचे ही अजून एक समस्या. अहो, इतकं लोणी लाऊन त्या कुत्र्याला काय तव्यावर खरपूस भाजायचाय काय? =))
एका हातात पेटता लायटर घेऊन, 'आता येतोस आंघोळीला की पेटवू इथेच' असा आक्रमक पवित्रा घेतल्यास कुत्र्याच्या मनातून तुम्ही कायमचे उतरू शकता. पाहा बुवा!
=)) =)) व्हिज्युअलाईझ झालं राव! अन त्या व्हिज्युअलायझेशनमधल्या रॉटनं "व्हुफ्फ तिच्यायला!" अशी दिलेली शिवीही ऐकू आली.
आई शप्पत! त्या अर्ध्या तासात त्याला मोकळं सोडू नका. गल्लीतले सर्व कुत्रे आणि कुत्र्या त्याला चाटायला घरात घुसायच्या आणि एक नसती पीडा होऊन बसायची.
मोकळं नाहीच सोडायचं, अर्धा तास मालीश करुन लोणी जिरवायचं.
त्याचं स्वतःचं तोंडही बांधून ठेवावं नाहीतर एकदा 'टेस्ट' लागली तर तोच स्वतःला चाटून साफ करेल आणि मग लोणी पोटात गेल्याने केस गळायला लागतील.
हां! हे एक लफडं असू शकतं. पण ते टेन्शन सुरुवातीच्या दोन-तीन मालीशपर्यंतचंच. त्या तेव्हढ्या वेळात लोणी चाटायचा प्रयत्न केला की कानफडवायचं. मग गणित पक्कं बसतं, ह्या वासाचं चाटायला गेलं की कानाशी झिणझिण्या येतात..अन त्या भानगडीत पडायचं बंद होतं.
घरात लोण्याचा छोटासाच तुकडा उरला असेल तर तो आपल्या नाश्त्याच्या पावाला लावायचा की कुत्र्याच्या अंगाला ह्या विचारात ऑफिसला उशीर होण्याची शक्यता जास्त.
=)) =)) ते कुत्र्यावर आपला किती जीव जडलाय त्यावर अवलंबून असतंय. आपसुक निर्णय होतोय.
बायकोने आपल्याला, नाश्त्याच्या पावाला लावायला, अमूल बटर दिले आणि कुत्र्याला घरचे शुद्ध लोणी फासले तरीही कुटुंबकलहाला तोंड फुटू शकते.
हा कुत्र्याला लोणी फासण्याचा उद्योग हा आधी गृहलक्ष्मीशी खरखर होऊनच मग पार पडत असतो. "एव्हढी कसली जहागिरी ऊतू चाललीये म्हणते मी, त्या कुत्र्याला कशाला लोणी? इतकीच हौस असेल तर फास की खोबरेल तेल" हा ९९% घरांमधला ठरलेला डायलॉग आहे असं अनधिकृत सुत्रांकडून कळते. :)

लेख आणि काही प्रतिक्रिया आवडल्या. कुत्रा घरात कोणाला खराच आवडत असेल तरच आण. मुलं आधी हो हो म्हणतात आणि मग कामाची वेळ आली की पळ काढतात. मग आता हा कुत्रा मला एकटीला सांभाळावा लागतोय असा आणखी एक लेख लिहावा लागेल!! कुत्र्याचं आयुष्य साधारण १५ वर्षांपर्यंत असतं. त्याला जीव लावून तो गेला की घरातला माणूस गेल्यापेक्षा जास्त वाईट वाटतं. आता यापुढे एवढी गुंतवणूक आणि दु:ख सहन करायची ताकत आपल्यात आहे का याचा जरूर विचार कर.

In reply to by पैसा

अगदी अगदी. आमचा भूभू गेला तेंव्हा बरेच दिवस लागले सावरायला. आता पुन्हा ते दु:ख नको असं वाटतं. त्याचं सगळं करायलाही लागतं. त्याचं शेवटचं आजारपण आपल्यालाच बघवत नाही. मुलं नाही काही करत. उगीच दोनचार दिवस हौस असते त्यांना. हा लेख वाचल्यापासून आमच्या भूभूच्या आठवणीनं बेजार झालीये. तो कसा बघायचा, कान टवकारायचा, दंगा करायचा, लाड करवून घ्यायचा. काय काय आठवतय. नुसता वैताग आलाय तेच ते आठवून! जरा मोठे होईपर्यंत शी, शूच्या सवयी तसेच चपला चावणे असते. स्नेहाताईला पुन्हा लहान बाळ सांभाळल्याचा अनुभव मिळणार. ;)

In reply to by पैसा

अगदी एखादे लहान बाळ असल्याप्रमाणेच. फक्त फरक इतकाच की बाळे मोठी होतात आणि आपले आपण करायल लागतात. कुत्रे मात्र जन्मभर बाळच असतात. पण खरंय गेल्यावर काय होईल याचा विचारही करवत नाही. त्यामुळे आहे तेव्हा शक्य तितकी मजा करून घेणे. सर्वसाधारण जितका मोठा कुत्रा तितके कमी आयुष्यमान. गुंतवणूक म्ह्णाल तर प्रचंड कधी कधी प्रचंड खर्चही करण्याची तयारी ठेवा. नुकतेच वार्षिक लशीकरणासाठी जवळ्पास ५०० डॉलर्स खर्च करावे लागले होते. अधून मधून आजारपण आले की १५०-२०० डॉलर्स जातातच.

In reply to by लंबूटांग

आपलं तुझ्या लॅबबद्दल बोलणं झालं होतं. पण मी गुंतवणूक पैशांची म्हणत नाहीये. भारतात कुत्रे पाळायला फार पैसे खर्च होत नाहीत. मी मानसिक आणि भावनिक गुंतवणूक म्हणत होते.

माझे २ पैसे. गेल्यावर्षीच एक लॅब पाळल्यामुळे बरीचशी ताजी ताजी माहिती/ सल्ले. पण त्याआधी तुम्ही त्या कुत्रीला हुसकवण्यासाठी एक कुत्रा पाळायची युक्ती तुमच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. त्यातून तो कुत्रा आमच्या कुत्र्यासारखा जगमित्र असेल तर अजून १० कुत्री जमवून खेळत बसेल. असो आता कुत्रा पाळण्याविषयी. कोणत्या जातीचा घ्यायचा ते नीट विचार करून घ्या. प्रत्येक जातीच्या कुत्र्याचा स्वभाव वेगळा असतो तसेच त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात व्यायाम वगैरेची आवश्यकता असते. धमुने लिहील्याप्रमाणे छोट्या कुत्र्यांचा अ‍ॅटिट्युड त्यांना स्वतःलाच घातक ठरतो. आमचा दुसरा कुत्रा तसल्या छोट्या जातीचा आहे पण तो २ दा मरता मरता वाचला आहे त्याच्या आ कुत्रा मुझे मार अशा अ‍ॅटिट्युड मुळे. इवलासा असला तरी उगाच इतर कुत्र्यांना उचकवतो आणि नसत्या आफती ओढवून घेतो. त्याला नेपोलिअन कॉम्प्लेक्स असे म्हणतात असे नुकतेच कळले. आणल्या आणल्या लगेच त्याला ट्रेन करायला सुरूवात करा. Positive Reinforcement सगळ्यात बेश्ट. आंजालावर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. कुत्र्यांना मालकाला खूष ठेवायचे असते त्यामुळे त्याला त्याने काय केले की तुम्हाला आनंद होतो हे तुम्ही जाणवून द्यायचे. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे, कुत्र्याला सतत जाणीव हवी की तो बॉस नसून you are the boss. (पॅक लीडर). त्याने जर तुम्हाला नको असलेली गोष्ट केली की ठामपणे नो असे सांगायचे. ओरडायचे नाही. कुत्र्यांना सर्वसाधारण पणे ओरडणे म्हणजे तुम्ही excited आहत असे वाटते आणि मग ते कधी कधी चांगली गोष्ट करत आहेत असे समजतात. जितक्या लवकर कुत्र्याला house broken (शी शू लागली आहे हे तुम्हाला सांगणे) करता येईल तितके बरे. त्यासाठी सुरूवातीला दर २ तासांनी बाहेर न्या. एक सरळ सोपे सुत्र म्हणजे कुत्रा जितक्या महिन्यांचा आहे तितक्या तासांनी त्याला शी शू करायला नेलेच पाहिजे. तो शू करताना जर त्याला Go pee अशी कमांड ऐकायची सवय लावली आणि शू झाल्यानंतर खूप कौतुक केले तर तो नंतर नंतर कमांडवर शू करायला लागतो. याचा उपयोग इथे हिवाळ्यात खूपच होतो. बाहेर बर्फ पडत असताना कुत्र्याने झटपट कार्यभाग उरकण्यासारखे सूख नाही. भारतात थोडे वेगळे वातावरण आहे पण येथे बरेच लोक - मीही- कुत्र्याला क्रेट ट्रेन करतात. क्रेट म्हणजे एक पिंजरा. त्याला आम्ही रात्री झोपताना आणि ऑफिसला जाताना त्यात ठेवून जायचो. बर्‍याच लोकांना हा क्रूरपणा वाटतो पण कुत्र्याला ते त्याचे घर वाटते आणि कुत्र्यांच्या नैसर्गिक instinctनुसार ते जिथे राहतात तिथे घाण करत नाहीत. कुत्र्यांनाही दुधाचे दात असतात आणि ते पडून नवीन येतात. हा कालावधी ३ महिन्यांपासून ९ महिने कधी कधी वर्षापर्यंत असतो. जातीप्रमाणे बदलतो. या काळात त्यांना चावायची जबरदस्त उर्मी येते. हाच काळ असतो जेव्हा त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे लागते आणि नको त्या गोष्टी चावण्यापासून थांबवावे लागते. लिंबाचा रस सगळ्यात उत्तम. माझा कुत्रा बाथरूम मधे छोटी मॅट असते ती, आणि टेबल खुर्चीचे पाय चावायचा प्रयत्न करायचा. तेव्हा त्याच्या तोंडात एक थेंब लिंबाचा रस टाकला की त्याला ती चव नं आवडल्यामुळे तो थांबायचा पण तेवढया पुरतेच. तो थांबला की त्याला खेळणे द्यायचे आणि ते पकडले तोंडात की कौतुक करायचे. अशा रितीने त्यांना काय त्यांचे खेळणे आहे ते कळते. आता काही गोष्टी आम्ही करतो त्या.
  1. कुत्र्याला फर्निचर वर अजिबात चढू देत नाही. एकदा का ती सवय लागली की मोडणे महाकठीण. तो/ ती कितीही आजारी असली तरीही.
  2. कुत्र्याला रोज भरपूर चालवणे/ पळायला नेणे. कुत्रा लहान असताना एखाद्या बाळाप्रमाणे एनर्जी असते. जर पुरेशी exerciseनसेल तर मग ती ऊर्जा काहीतरी इतर उपद्व्याप करण्यात निघते. पण कुत्रा दीड वर्षाचा होईपर्यंत २० मिनिटापेक्षा जास्त सलग चालवले नाही. या काळात त्यांची हाडे विकसीत होत असतात. खूप ताण दिला तर म्हातारपणाआधीच सांधेदुखी व इतर हाडांचे त्रास होऊ शकतात.
  3. कुत्र्याला नेहमी - अक्षरशः नेहमी पट्टा (leash) बांधूनच चालवणे. तुमचा कुत्रा कितीही गुणी असला तरी बाकीचे कुत्रे गुणी असतीलच याची खात्री नाही आणि त्यांची एखादी कृती तुमच्या कुत्र्याला घाबरवू शकते (पळत सुटून गाडीखाली जाण्याचा धोका) किंवा स्व संरक्षणाला परावृत्त करू शकते.
  4. कुत्र्याला तुमच्या बरोबर किंवा तुमच्या मागे मागे चालवणे. तो तुमचा लीडर नसून तुम्ही त्याचे लीडर आहात. अमेरिकेत त्यासाठी एक Sensible No Pull Harness मिळते. कुत्र्याने जास्ती ओढ दिल्यास तो वळून त्याचे तोंड तुमच्याकडे होते. पण इतरही उपाय आहेत.
  5. त्यांच्या खाण्या पिण्याच्या वेळा कसोशीने पाळणे. एक वेळापत्रक तयार झाले की तुम्हाला आणि कुत्र्यालाही बरे.
  6. त्याला grain free diet वर ठेवले आहे. फक्त आणि फक्त dog food च देतो. चुकूनही आपले उरलेले त्याला देत नाही. कुत्रे माणसाळण्याआधी ते शिजवलेले आणि तेलकट तुपकट खात नसत त्यामुळे मला तरी logically हे पटले. तसेही एकदा ती चटक लागली की मग आशाळभूतासारखे आपण जेवत असताना बघणे सुरू राहते.
सद्ध्या तरी इतकेच आठवते आहे.

In reply to by लंबूटांग

जर त्याला पुढे पिल्लं वगैरे होऊ देऊन विकायची नसतील तर neuter ( कुत्री असेल तर spay) करून घ्या. क्रूर वाटेल पण ते नाही केले आणि त्यांना partnerमिळाला नाही तर मग Hormonal imbalance मुळे ते खूप म्हणजे खूपच आक्रमक बनतात. ना त्यांच्यासाठी चांगले ना आपल्यासाठी. बरेच लोक माणसाशी तुलना करतात आणि म्हणतात तुला असे केले तर कसे वाटेल पण आपल्या आणि कुत्र्यांच्यात काही फरक आहे तो म्हणजे कुत्री वर्षातील काही काळच प्रजननासाठी सक्षम असतात. तेव्हाच त्यांना साथीदार लागतो. ही अतिशय सोपी शस्त्रक्रिया आहे आणि फारसा त्रास होत नाही.

In reply to by लंबूटांग

एक भर - पिल्लांचे दात शिवशिवतात तेव्हा दिसेल ते चावत बसण्याची सवय लागते त्यासाठी - कॅल्शियमचं च्यूइंग-बोन आणून द्यायचं...बसतंय तेच चावत. अन त्याची चवही आवडते, अन कॅल्शियमही मिळतं. विन-विन सिनॅरिओ :)

कुत्रा पाळायचा की नाही हे सावकाश ठरव. आधी, ती गेटवरून उडी मारून अन पिल्ले गेटखालच्या सापटीतून सरपटत ! अशी येणारी कुत्री आहे, तिला थांबवायला गेटची उन्ची खालून वरून वाढवून घे की. तिचे येणं तरी बंद होईल.

In reply to by कवितानागेश

तिला थांबवायला गेटची उन्ची खालून वरून वाढवून घे की. तिचे येणं तरी बंद होईल. ही ही हा हा हा हा!!! (संदर्भः तुमचीच सही... आवांतरः सही सही आहे :) )

वर धमाल मुलगा आणि लंबुटांग यांनी बरीच उपयुक्त माहिती दिली आहे... आवड असल्या खेरीज कुत्रा पाळू नका. कुत्रा पाळला तरीही तुम्हाला तुमच्या त्रासापासून लगेच मुक्ती नाही. त्यासाठी खरेंनी एक उपाय सांगितला आहे... शिवाय धमाल मुलगा म्हणतात ते ही खरे आहे ( तोपर्यंत गलोल, लवंगी फटाके, खेळण्यातल्या पेलट्सवाल्या पिस्टलचा उपेग करा. smiley ) किंवा पाण्याचा फवारा देखिल तितकाच उपयोगी ठरू शकतो. ( पाण्याचा पाइप सर्वसाधारण पणे सर्वांकडे असतोच, शिवाय स्वतः लांब राहून पाइपने फवारा उडविणे सोपे जाते). ऑफेन्स इज समटाईम्स द बेस्ट डिफेन्स. सध्या जिचा त्रास आहे ती कुत्री आणि पिल्ले यायची तयारीनिशी वाट बघा, आणि फवार्‍याच्या रेंजमध्ये आल्यावर फवारा टाका. असे काहीवेळा झाले की ती तुम्हाला बिचकून राहील / राहतील.. म्हणजे तुमचा हेतू सफल झाला ( तुम्ही तिला घाबरण्या ऐवजी ती तुम्हाला घाबरू लागेल / लागतील ).

In reply to by इन्दुसुता

पिल्ले फार लहान असतील तर पाणी टाकू नका. मी पहिले हेच केले होते पण ती अतिशय लहान पिल्ले थंडीने कुडकुडताना पाहवत नाही.(पाप क्षालनासाठी त्यांना मी त्यादिवशी दुध दिले) आणी दुसर्या दिवशी डांबर गोळ्यांचा चुरा ठेवला. तसेच फटक्याच्या आगीने लहान पिल्ले भाजण्याची शक्यता आहे कारण त्यांना पळून जायचे असते हे माहित नसते. या गोष्टी पिल्ले मोठी झाली कि करता येतील

मागे कुठे तरी उंदीर कसा बाहेर काढावा ह्यावर कुणीतरी त्याचा किमान शब्दात कमाल अपमान करावा असं सांगितल्याच आठवत आहे... तु पण ट्राय करुन पहा..!!

आपली पोळीशी अशी आहे की शेजार्‍यावर ( आणि शेजारणीवर सुद्धा ) प्रेम करू नका. त्याच्या कुत्र्यावर करा. खूप फायदे आहेत. आपल्याला त्याच्या( म्हणजे कुत्र्याच्या ) देखभालीचा ताप नाही. परिचयामुळे कुत्र अंगावर येत नाही. शेजारी मात्र आपले श्व्वान प्रेम पाहून आपल्यावर प्रेम करायला लागतो. शेजारीण आपल्यावर प्रेमबिम काही करायला लागत नाही पण येता जाता ओळख तर दाखविते ? तेवढंच !

माझ्याकडे दोन धनगरी कुत्रे आहेत्,ए आर व्ही आणी टी टी सोडुन दुसरे कुठलेही इन्जेक्शन द्यावे लागत नाही,दुध भाकरी आणी अधुन मधुन अंडी व मटन सोडुन खाण्यापिण्याचे फालतु लाड नाहेत्,आणी राखणदारीला एक नंबर जात... घरातली माणस सोडुन बाहेरच्या कुणाच्या बापची गेटच्या आत पाउल ठेवायची टाप नाही.आणी घरातल्या लोकांनी कितीही बदडले तरी चुकुनही दात लावणार नाही.घरातल्या चिल्या पिल्यांनी शेपुट ओढु दे नाही तर कान उपटु दे चुकुन गुरकणार सुद्धा नाही.आणी चोरापांसुन सापा पर्यंत सगळ्यांपासुन संरक्षण. फक्त आंघोळ घालायला मात्र वाइट त्रास देतात्,तेव्हड मात्र सांभाळुन घ्यायच..

कुत्र्यासारखा दुसरा पाळीव प्राणी नाही! मला सुद्धा कुत्रा पाळायची इच्छा आहे पण एक शंका आहे. मी flat राहतो आणि सकाळी ८ पासून ते संध्याकाळी ७. पर्यंत घरी कोणीच नसते. मग कुत्रा इतका वेळ एकटा राहू शकेल का?

In reply to by अन्तु बर्वा

रागावु नका, सहज एक गंमत तुम्ही जो कुत्रा पाळाल ना तो स्नेहांकीता ताईकडे सकाळी ८ पासून ते संध्याकाळी ७.पर्यंत ठेवत जा, यामुळे तुम्हा दोघांचे प्रॉब्लेम सूटतील.

धमाल मुलगा यांच्या श्वान पुराणा बद्दल वाचायला आवडेल. त्याना इतर मिपा सदस्यानी त्याबद्दल लिहावे यासाठी अश्वावर आरुढवून द्यावे ही विनंती. ( अर्थात ते अश्वारुढ होतील याची शाश्वती नाही. कितीही अश्व आणावे लागले तरीही त्यानी शिकार पूर्ण केली नाही हा इत्यास आहे)

सुबोध सर , धमु, लंबुटांग यांच्या सूचना विशेष उपयुक्त वाटल्या. आता जरा धीर आला आहे कुत्रा पाळण्यासाठी ! कारवान हाउंडचा किंवा बाबा पाटील यांच्या कुत्र्यासारखा धनगरी कुत्रा शोध घ्यावा म्हणते.

In reply to by सस्नेह

घेतला तर रेअर ब्रीडचा घेऊ नको स्नेहातै. पार्ट्नर मिळवायला लै तरास पडतो. पुण्याबिम्बईत मिळतेत. लहान गावात नाहीत मिळत. :( कारवानी किंवा धनगरी लै भरोशाने घायचे ब्रीड आहेत. त्याच्या सवयी लवकर कळत नाहीत. आपल्या सवयी त्याच्यावर लादल्या की काहीतरी वेगळेच होऊन बसते. त्यापेक्षा रॉट्विलर नायत्र लॅब बेस्ट. डॉबरमन कडे चांगले लक्ष देणार असताल तर ते पण चालेल. पण लॅब लै आळशी होतेत घरी बसुन. :( बाकी ते ट्रेनिंग वरुन जोक आठवला. एकजण लै हौसेने कुत्रा ट्रेन करतो. प्रात्यक्षिक दाखवायला आण शायनिंग मारायला मित्रांना बोलावतो. एक बिस्कीट घेऊन "टेक टॉमी टेक" चा आदेश देतो. टोमी गप्पच. ह्याचे परत चिडून "टेक टॉमी टेक". . . टॉमी बिचारा कंपाऊंडला जाऊन टेकतो.

In reply to by अभ्या..

डाक्टरबाबा ह्या बाबतीत अनुभवी आहेत असं त्यांच्या प्रतिसादावरुन कळतं. त्येंच्याकडून टिप्स घेता येऊ शकतील. :)
ह्याचे परत चिडून "टेक टॉमी टेक". . . टॉमी बिचारा कंपाऊंडला जाऊन टेकतो.
=)) =)) =))

झालं? केव्हढी माहीती ती, अन किती प्रकारचे प्रतिसाद. बा द वे मेरेकु एक नय समझ्या। बोले तो आप कुतीयासे छुटकारा चाहते हो। फिर दुसरा कुत्ता कायको चाहिये? और अगर चाहीये, तो जो है उसपेच क्यु नय चलानेल्का? मतलब पालनेकाही है तो जो अभी खुद ब खुद द्वार्पे खडा है वोहीच क्यु नय पालनेका?

In reply to by स्पंदना

अरे बाबा, जो है वो वन प्लस सेवन है ! यानेके फंडा सेवन बार ! और हमारे घरमे आके हमकोच वॉव वॉव करती ना वो ! तो काटेसेच काटा निकालनेका, करके दुसरा कुत्ता लानेका ! समझी ?

In reply to by स्पंदना

"काटे से काटा" यानेके "कुत्तेने काटा तो उसको काटनेकू दुसरा कुत्ता लानेका"... भौत अच्चा आयड्या हाय ;)

आयला शतक? माझा शतकी प्रतिसाद स्नेहांकिताला सादर भेट> काय ब्वा ! भाव वाढला एका माणसाचा! वॉव्व वॉव्व वॉव्व।

धागाकर्तीस शुभेच्छा. भविष्यात या संकटापासून कशी सुटका झाली यावर लिहिण्यास विसरू नका. बाकी प्रतिसादांमधील काही अनुभव वाचून १२वी युवकभारती पुस्तकातील Snapshot of a dog हा निबंध आठवला. या अन याप्रकारच्या उत्तमोत्तम वाङमयाकरीता पा.पु.म. चे आयुष्यभर ऋणी राहीन.

आई शप्पथ.. पुढे मागे कधी कुत्रा पाळायचा ठरलाच तर मला काहीही प्रोब्लेम येणार नाही.. काय डिट्टेल सुचना आहेत!!!! प्रतिसाद श्रेय पिराचा हा प्रतिसाद कुत्रा जीव लावतो हे खरं आहे, स्नेहाकिंताताई वर काही जणांनी म्हंटल्याप्रमाणे हा जरा लांबचा उपाय वाटत नाही का? तुम्ही पिल्लु आणणार, त्याला ट्रेन करणार, ते मोठे होणार, त्यानंतर ते ह्या कुत्रीला घाबरवणार (?) तेही ते स्वत: भित्रे वा जग्नमित्र नसेल तर. त्यापेक्षा यातलीच १-२ पिल्लं घेतली तर? आणि बाकीची ओळखीत, मित्र-मैत्रिणीमध्ये वाटुन टाकली तर?

पुष्कळ लोकांनी सातातले एखादे पिल्लू घेण्याचा सल्ला दिला आहे. पण जी कुत्री पिल्लांच्या जवळ जायच्या आधीच वॉव वॉव सुरु करते, ती पिल्लाला दत्तक देईल कशी ? आणि मग एकाला दत्तक घेतले, की त्याचे भाऊबंद इथेच मुक्काम ठोकतील की कायमचा ! अ

. ह्ये आमचं दोस्त, याचं ब्रीड ओळखा पाहू

In reply to by चाफा

नाय ओळखता येत. आता सांग लवकर कोणतं आहे ते.

नाय ओळखता येत. आता सांग लवकर कोणतं आहे ते. >>>>> मला माहित असता तर विचारलं असतं का धम्या, तु एक्सपर्ट म्हणून विचारलं, हे प्रकरण एका मित्रानं घरपोच केलेलं आहे, एकुणच लै भारी काम आहे, पार गावठी पासून ते पोलीस डॉग पर्यंत कंपेअर करून झालं सवयी आणि रूपडं काही ओळखता येई ना ! :( खास सवयी म्हणजे, हा फक्त मी आणि माझी पुतणी दोघांपैकी कुणीतरी जेवायला घातलं तरच जेवतो. पट्टा हा प्रकार म्हणजे गुलामगिरीची निशाणी असल्यानं त्याला सक्त विरोध म्हणून शक्य त्या प्रकारे पट्टे तोडतो. :) घरातल्या कुणीही `धर' हा शब्द उच्चारताना त्याचा रोख जर एखाद्या माणसाकडे असेल तर त्या माणसाचा किमान डॉक्टरी खर्च करण्याची वेळ आमच्यावर येते. फिरायला जाताना घरातल्या कुणासोबतही जातो फक्त परत येताना ते दोघे एकत्र असतील याची खात्री नाही `अपवाद म्हणून मी भाऊ आणि माझी पुतणी' आवाज खणखणीत दुसर्‍या मजल्याच्या गच्चीतून गुरगुरला तरी तळमजल्यावर पळापळ. बाहेर नेलं की लय रोमियोगीरी करतंय राव ह्ये..

समस्त सल्लाकारांना कळवणेस अत्यंत आनंद होतो आहे की १ जून २०१७ रोजी आम्ही एक सुरेख लॅबचा बच्चा दत्तक घेतला असून ब्लेक असे नामकरण झाले आहे. फोटू उद्या टाकणेत येतील. :)

ह्या समस्त धाग्याला कारणीभूत झालेली कुत्री (आणि तिचे पिल्ले) अजूनही त्रास देतात का?

स्नेहांकिता,छान! कुत्रे अतिशय मायाळू असतात त्याचा अनुभव तुला येऊदेत.आमच्याकडे एक मस्त कुत्रा होता,7/8 दिवसांचं पिलू रस्त्यावर बेवारशी सोडलं होतं कुणीतरी इतर कुत्रे त्याला त्रास देत होते म्हणून भाऊ त्याला घरी घेऊन आला होता.जातिवंत कुत्रा म्हणजे काय? हे त्याला पाहून कळायचं,19 वर्षं जगला तो आणि जाताना पुन्हा कुत्रा पाळायचा नाही ही शिकवण देऊन गेला.मला कुत्रा प्रचंड आवडतो.