Skip to main content

भीक न घालता कुत्रे कसे आवरावे ?

लेखक सस्नेह यांनी रविवार, 04/08/2013 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे त्याचं असं झालं की हे सगळं त्या कुत्रीनं सुरु केलं. ओ, कुत्री ही शिवी नैये कै ! खरीखुरी कुत्री आहे. ती बघा अजून आमच्या गेटबाहेर उभी आहे. आणि तिनंच दोन महिन्यापूर्वी आमच्या नारळीखाली एक नव्हे दोन नव्हे सात पिल्ली घातली होती. पंधरा दिवस तिनं आम्हाला नारळीच्या पंधरा फुटात पाय तर टाकू दिला नाहीच, वर आणि आमच्याच अंगणात आम्हाला जायची चोरी झाली ! काठी हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पाय टाकणे जिवावरचे धाडस होऊन बसले. भगीरथ प्रयत्नाने तिची अन तिच्या पिल्लावळीची बोळवण शेजारच्या पडक्या ग्यारेजमध्ये केल्यानंतर सुद्धा तिने आपला दरारा, येत जाता वॉव वॉव करून टिकवून धरला आहे. शिवाय माहेरघरचे आमंत्रण असल्यागत वेळीअवेळी हक्काने आमच्या मागच्या दारी खरकटी शिते खाण्यासाठी ती अन तिची पिल्लावळ वरचेवर पायधूळ झाडत असतात , ते निराळेच ! म्हणजे, ती गेटवरून उडी मारून अन पिल्ले गेटखालच्या सापटीतून सरपटत ! तर या सगळ्या कुत्रीय दहशतीवर चिरंजीवाने रामबाण उपाय शोधला आहे. तो असा, की आपणच एक कुत्रा पाळायचा ! तोपण साधासुधा नव्हे, तर जर्मन शेफर्ड ! आता माझी लहानपणीची सगळी हयात अपार्टमेंटमध्ये राहून गेल्यामुळे हे बंगलेवाल्यांचे कुत्रे प्रकर्ण म्हणजे मला काला अक्षर भैस बराबर ! मग हे अज्ञान, मिपावरच्या सर्वज्ञ, तज्ञ, सूज्ञ व सदैव सल्ल्यास सज्ज असणाऱ्या निष्णात सल्लागारांकडे नेण्याचे ठरवले. तेव्हा मिपावरील सर्व सज्जन, साक्षात माहितीचे अर्णव, यांना णम्र इनंती की कृपया खालील मुद्द्यांवर मला सल्ला देऊन गार.. आपलं, उपकार करावे ! १. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ? २. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ? ३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ? ४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ? ५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ? ६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ? ७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ? ८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ? ९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ? १०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ? तर वरील सर्व माहिती मिळाल्याशिवाय कुत्रा पाळण्याचे धाडस करण्याचा इरादा पक्का होईना. मग द्या बरे तुमचा चान चान सल्ला !! a

वाचने 44722
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

कुत्रे पाळण्याचा अनुभव नाही, पण असे करता येईल का, एखाद्या वाघाचा किवा अजून कुत्रे ज्या प्राण्यांना घाबरता त्यांचा आवाज टेप करून ठेवायचा व त्या कुत्रीला घाबरावायचे.

http://www.misalpav.com/node/22166 याच्याशी बरेच दोस्त बाडीस आहेत, थेट अनुभव नसल्याने उत्तर नाही. मी लहानपणी सेम रामबाण उपाय दिलेला पण घरच्यांनी तो न ऐकता काही तरी भलतंच केलं... त्या बेसवर कुत्रीला हटवण्याचे असल्यास फुकट सल्ला देऊ शकतो...

जर्मन शेपर्ड अतिशय नाजूक तब्येतीचा असतो, भला मोठा दिसत असला तरीही. जरा इकडे तिकडे झाले की त्यांची तब्येत बिघडते. डॉबरमन एकदम ब्येष्ट. केस वगैरेही खूप नाही गळणार, किंवा रॉटवायलर. त्यांची जरा काळजी घ्यावी लागते. लॅबू तर एकदम ब्येष्ट! इथे पहा आणि ठरवा की कोणती ब्रीड घरी आणावयाची आहे, मग डिटेलमध्ये लिहिता येईल.

कुत्रे पाळण्यावर पुस्तके मिळतात. अगदी सर्व जातीच्या कुत्र्यांची समग्र माहिती त्यात असते. माझा आवडता डॉबरमन आहे. आखुड केसांचा असतो. कुत्र्यांना गोड आणि तेलकट खायला घालून नका. त्याने केस गळतात (कुत्र्याचे). कुत्रे आपले घरचे जेवण (आपण जेवतो तेच) जेवतात. जास्त मसालेदार आणि तेलकट जेवण असू नये. आणि पेडिग्रीची सवय लावली तर इतर कशाला तोंड लावत नाहीत. ते महाग पडतं. आता ती कोण अनोळखी कुत्री, तुमच्या घरी चांगल्यातला (देखणा) कुत्रा आला की लवकरच सुन म्हणून बंगल्यात राहायलाच येईल. तेवढं सांभाळायचं. कुत्र्यांना एकटं मोकळं सोडायचं नाही. रोज फिरायला न्यावं लागतं. तेंव्हा साखळी बांधूनच न्यावे. नाहीतर ते रस्त्यात इथे-तिथे घाणीत तोंड घालतात. दुसर्‍या कुत्र्यांपासून तुमच्या कुत्र्यास स्पर्श होऊ नये म्हणून सांभाळायचं. संसर्गजन्य रोग असतात. त्याची बाधा होऊ शकते. कुत्रा न पाळता केवळ श्वानप्रेमापोटी एवढी माहिती मला आहे.

आता ती कोण अनोळखी कुत्री, तुमच्या घरी चांगल्यातला (देखणा) कुत्रा आला की लवकरच सुन म्हणून बंगल्यात राहायलाच येईल. तेवढं सांभाळायचं.>>>>>>>>>>>>ही ही ही

कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय तीव्र असते त्यामुळे कुत्र्याला जागेतून हलवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे त्यांच्या बसण्याच्या जागेशी डांबराच्या गोळीचा थोडासा चुरा टाका. गोव्याला माझ्या घराच्या खिडकीखाली कुत्रीने पिल्ले दिली होती दिवसभर आणि रात्रभर कुई कुई आवाजाने उच्छाद झाल्याने वरील उपाय केला दुसर्या दिवशी कुत्रीने एक एक करून सारी पिल्ले दुसरीकडे पडक्या घरा मध्ये हलविली.

In reply to by अत्रुप्त आत्मा

केव्हाही उपयोगी पडेल असा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. सुबोधजी, धन्यवाद!

In reply to by संजय क्षीरसागर

केव्हाही उपयोगी पडेल असा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. सुबोधजी, धन्यवाद!
सहमत. आता त्यासाठी लांडगे किंवा कुत्र्यांना घाबरवणार्‍या तत्सम प्राण्यांच्या मुतायची वाट बघायला नको! ;)

In reply to by दादा कोंडके

अनेक विचार एकाच वाक्यात विरामचिन्हा शिवाय बांधल्यामुळे, `कुणाच्या' असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

त्या कुत्रीचच एखाद पिल्लु दत्तक घ्या की ... अवांतर सल्ला - मला वाटते भिक घालणे परवडेल पण (शक्यतो) कुत्रा पाळू नका. आणि अगदीच पाळायचेच असेल तर बाकी काही करण्याआधी शेजार्‍यांची परवानगी घ्या.. "की आमचे कुत्र भुँकलेले चालेल का?" म्हणून.

लेखाचा एकंदरीत टोन हा कुत्र्यांबद्दलच्या हेटाळणीचा वाटला म्हणून लिहावेसे वाटत नव्हते. तरीही, यशोधरा आणि पेठकर काकांचे प्रतिसाद वाचून लिहावेसे वाटले.
१. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ?
वर म्हटल्याप्रमाणे डॉबरमन. आमच्याकडे आहे गोल्डन रिट्रीवर. अत्यंत केसाळ! परंतु, केस हीच त्याची शान आणि ऐट!
२. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ?
जेवढे लवकर आणाल तेवढे उत्तम. ५-६ आठवड्याचे आणा.
३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ?
स्वतंत्र गादी मिळते. अर्थात आमचा "टफी" लहानपणी आमच्याच बरोबर झोपत असे!
४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ?
लहान मुलांप्रमाणेच. सवय लागेपर्यंत घरभर. एकदा सवय लागली की नेमलेल्या जागी.
५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ?
घरी आणल्यापासून लगेच.
६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ?
ब्रीडवर अवलंबून आहे. आम्ही दोन आठवड्यातून एकदा देतो. एरवी सतत केस विंचरत ठेवतो.
७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ?
लहानपणी वरचेवर - लसीकरणासाठी वगैरे. नंतर २-३ महिन्यातून एकदा पुरे.
८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ?
वेळच्यावेळी औषधपाणी केले तर काही प्रॉब्लेम येत नाही.
९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ?
! त्याला जर घरचाच एक सदस्य म्हणून वागणूक मिळणार नसेल तर न आणणेच अधिक श्रेयस्कर!
१०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ?
हौसेला मोल नाही ;) या खेरीज हे लक्षात ठेवावे की, आपल्या हिंडण्या-फिरण्यावर बरीच बंधने येतात. स्वतःची चारचाकी असेल तर, प्रवासाचा प्रश्न मिटतो. तरीही, पेट्-फ्रेंडली हॉटेल्-रेस्टॉरण्ट्स शोधताना फार यातायात होते. ते सोडले तर, पाळीव कुत्रा ही एक अत्यंत आनंददायक गोष्ट आहे.

In reply to by सुनील

लेखाचा एकंदरीत टोन हा कुत्र्यांबद्दलच्या हेटाळणीचा वाटला
आश्चर्य आहे ! माझ्या लेखात बरीचशी भीती अन थोडीशी चिंता आहे फक्त ...!

१ आपला सर्वात जास्त राग ज्या आय डी वर असेल त्याचे नाव कुत्र्याला देणे. २ आमचा टिंब टिंब शिवमहिम्न स्तोत्र देखील म्हणतो हां ! होय की नाही रे टिंब टिंब ? असे लाडीक वाक्य पाठ करून ठेवणे ! ३.दत्तभक्त होणे. ४.वर्षातून एकदा रायगडाला सश्वान भेट देणे. ५.आपले कुत्रे ( छे.. हा काय शब्द ? आपला पेट ...हं हा शब्द चालेल ) आमच्याकडे सोपवा व निर्धास्तपणे पंधरा दिवस चीन, युरोप अमेरिका यांच्या दौर्‍यावर निघा. अशा प्रकारची छोटी जाहिरात शोधायला शिका ! ६. तुमचे कुत्रे रात्रभर भुंकून डोके उठवते त्यापेक्षा बेंकेत आणखी एखादा सेफ लॉकर का घेत नाही ? अशा विचारणेस लॉकरचे भाडे कोण तुम्ही भरणार का ? असा प्रश्न ठासून विचारायची प्रॉक्टीस करा.

In reply to by प्रचेतस

वल्ली व रेवतीशी अक्षरशः सहमत. टंकताना सुद्धा बिट्टू भुभुची जाम आठवण येते. स्नेहांकिताला सल्ला. भुभुला स्नेहांकित करुन घ्या मग काही प्रॉब्लेम येत नाही.

In reply to by रेवती

लळा लागला की त्याच्या जाण्यानंतर आठवण येताच डोळे ओले होतील. आपले लेकरू असावे तसे असते.
शंभर वेळा सहमत. कुत्रं कधी घरच्यांनी पाळू दिलं नाही. मुंबईच्या तोकड्या जागेत अधीक भर कुठली? बाबांना एकदा अगदी २ दिवसांचं कोंबडीच पिल्लू मिळालं. ते ते घरी घेऊन आले. मुंबईत राहून कोंबडी कधी पाळीन अस स्वप्नातही वाटलं नव्हतं. चांगली ५-६ महिने होती. रोज सकाळी पहिल्या मजल्यावरच्या बाल्क्नीतून उडी मारून उंडरायला जायची. दुपारी परत जीने चढून घरात हजर. फार लळा लावला होता. एकदा वरच्या शेजार्‍याशी कडाक्याचं भांडण झालं माझं. त्या दिवशी आमची कोंबडी जी फिरायला गेली ती परत आलीच नाही. :( तिच्या जाण्याचं दु:ख ईतकं होतं की बहिणीने ६-७ महीने (शिजवलेल्या) कोंबडीला तोंडही लावलं नाही. मलाही फार वाईट वाटलं होतं, पण बहिणी ईतका त्याग माझ्याने काही झाला नाही.

ह्म्म्म... रोचक चर्चा ! ;) बाकी मी खाली देतो तसा कुत्रा मिळाला तर नक्की पहा ! घराच्या आवारतलं काय अख्ख्या १ किलोमीटर परिघात कोणी येण्याची हिम्मत करणार नाहीत ! नातेवाईक सुद्धा लांबच राहतील ! ;) D जाता जाता :--- माझ्या आवडत्या भू भू वर काही तरी लिहावे असे बर्‍याच वेळा वाटले आहे, पण ते मी टाळले आहे.इतका मस्त कुत्रा नंतर माझ्या पाहण्यात कधीच आला नाही. :(

कुत्रा हा अतिशय निरुपयोगी,लोचट आणि बिनडोक प्राणी आहे. कुत्रा पाळल्याने फायदा तर काही होतच नाही उलट शेजारी, मित्रमंडळी दुरावतात. रात्री बेरात्री भुंकुन तो डोके उठवतो. उगाच लोचटासारखा पायात तडमडत रहातो. त्याचे खाणे पिणे आणि मेंटेनंन्स हे वेगळेच. त्या शिवाय आपल्या हिंडण्या फिरण्यावरही बंधने येतात.इतरही अनेक कारणे आहेत. त्या पेक्षा मांजर जरा बरी असते. पण ती देखील निरुपयोगी. कुठले जनावर पाळायचे असेल तर एखादी गाय किंवा शेळी पाळा. कुत्र्या एवढ्या कष्टात आणि खर्चात तुम्हाला ती दुध तरी मिळेल. किंवा कोंबड्या पाळा. मासे पाळण्याचा देखील विचार करुन बघा. तो पण पर्याय बरा आहे. ते बिचारे तर तुम्ही ठेवाल त्या कोपर्‍यात गुमान रहातात. जरा मोठा टँक घेतलात किंवा घराच्या मागे छोटेसे तळे किंवा हौद बांधलात तर खायचे मासे सुध्दा घरच्या घरी मिळु शकतात. एकदम ताजे ताजे. वरचे काहीच पटले नाही तर एखादा घोडा किंवा हत्ती पाळा. ऑफिसला जाण्यासाठीचा पेट्रोलचा खर्च तर नक्कीच वाचेल. पण कुत्रा अजिबात पा़ळु नका.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कुत्रा अज्जिबात पाळू नका.....हे म्हणजे विकतचे दुखणे घेण्यासारखे आहे

गावी असलेल्या घरात कुत्रं पाळणं एकवेळ ठिक पण शहरातल्या घरात पाळायचं म्हणजे खरंचच भिक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था होते.

अवांतर- मागे एकदा अस्साच बोक्यासाठीचा धागा आला होता.. त्याची आठवण झाली :)) :)) :))

मुळात पाळिव प्राणी/पक्षी हे दुरुनच पहायला आवडतात....ते घरात पाळायची तर दुरची गोष्ट! एक तर ते (कुत्रा/मांजर) घरभर फिरतात, त्यांचे केस गळतात, जेवताना नको ईतके जवळ येतात, पायात घुटमळतात.....म्हणुन ते आपले पहायला दुरुनच बरे वाटतात. एवढे करुन वर त्यांनी नखं दाखवलीच तर काय घ्या? वर त्रिवेनिचा सला ब्येस्ट. कमी खर्चिक, दुसर्‍यांना कमी त्रासदायक! कुत्रेच काय कुण्या माणसांचीहि तुमच्या घराकडे पाहण्याची हिम्मत होणार नाहि :D

In reply to by दिपक.कुवेत

अहो दिपकजी,
घरभर फिरतात, त्यांचे केस गळतात, नको ईतके जवळ येतात,
हे गुण विशेष 'नवरा' ह्या प्राण्यातही आढळतात पण म्हणून काय....... असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

केस गळणे हा गुणविशेष नवरी नामक प्राण्यात विशेषेकरून आढळतो, वरील सर्व गुणधर्म त्यांनाही लागू होतात बरं का पेठकरकाका.

In reply to by प्रभाकर पेठकर

तेही खरंच म्हणा. मिपावर तरी किमान नवरे किंवा एकुणातच पुरुष हे अतिशय सेफ पात्र आहे. कोणीही काहीही बोला, टेन्शन इल्ले. पण बाकी काही बोलोगे तो बोलेंगे के बोलता है.

पु.ल च्या , माझ्या आणि तमाम लोकांच्या शत्रू-पक्षा बद्दल चांगल लिहिण जमणार नाही , एकच सांगतो मित्र-मैत्रिणी खात्रीशीर पाने दूरवतात हे नक्की !!! (एका जवळच्या मैत्रिणी कडे जाण सोडून दिल , तिच्या कडे एकदा खिरित कुत्र्याचा केस आला होता :( )

In reply to by बॅटमॅन

नंतर जेवताना माझे काय हाल झाले...सांगता सोय नाही , त्यासाठी फक्त तो 3-इडीयट्स लाटण्याचा प्रसंग आठवा :)

In reply to by माझीही शॅम्पेन

अर्थातच..पण क्वचित का होईना, मानवी केस जेवणात आल्याचा केवळ पूर्वानुभव असल्याने इतके काही वाटत नाही...कुत्र्याचा केस म्हंजे अतीच आहे.

In reply to by बॅटमॅन

ही घ्या http://www.sherv.net/cm/emoticons/sick/barfing-smiley-emoticon.gif =================================== आत्मू'ज स्मायली भांडा रं! =)) आमचे येथे सर्व प्रकारच्या "ताज्या" स्माईली मिळतील! =))

"कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला की त्याच्या जाण्यानंतर आठवण येताच डोळे ओले होतील. आपले लेकरू असावे तसे असते.म्हणूनच प्राणी पाळावेसे वाटत नाहीत. " वल्ली व रेवतीशी पूर्णपणे सहमत!!! लहानपणी हे सर्व करून जाहले आहे. Lifelong आठवणी पुरतत. फक्त तुमचे मन खंबीर पाहिजे. माझे मन एवढे खंबीर नाहीये आणि त्यामुळे आता हे धाडस नाही करवत. आता हे सगळे पाळिव प्राणी/पक्षी हे दुरुनच पहायला आवडतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

कशावरुन? हे ग्रुहितक मान्ड्ले?

In reply to by अनिरुद्ध प

सर्वसाधारणपणे कुत्र्यांचे आयुष्य १५ वर्षांपर्यंत असते असे ऐकले आहे. आमच्या घराण्यात अजून ८० च्यापुढे कोणी गेले नाही (सर्व आधीच गेले). तसेच घराण्यात कोणालाही नसणारी व्यसनं मी केली आहेत आणि कांही अजून चालू आहेत. त्यामुळे ८० ही माझी 'डेड लाईन' नाही. त्या आधीच मिपावर श्रद्धांजलीचा धागा कोणीतरी टाकेलच. (टाका बरका. नाहीतर 'प्रभाकर भूतकर' नांवाची नविन आयडी येईल.) तुम्ही कसेही असा कुत्रा तुमच्यावर प्रेम करतोच करतो. त्यामुळे त्याला बिचार्‍याला नक्कीच दु:ख होईल. तो इमानदार असतो, त्याच्या जवळ छक्के-पंजे नसतात. माझ्या कुत्र्याने अगदीच जेवण वगैरे नाही सोडलं तरी कांही काळ 'ब्लॅक डॉग' आणि चखण्याला तोंड लावणार नाही ह्याची मला खात्री आहे. दु:खभराने माझ्या लॅपटॉप समोर कुंई-कुंई करेल. कोणी लॅपटॉप उघडून माझ्या पाककृती त्याला दाखवल्या तर कृतार्थ नजरेने तो त्या पाहील.

In reply to by प्रभाकर पेठकर

आपली काही व्यसने असूनही चालू आहेत म्हणता. डोळ्यासंबंधी काही " व्यसन" आपल्याला असल्यास आपण उलटे जास्तच जगणार ! अर्थ कळला नसेल तर अत्रे साहेबांचे " लग्नाची बेडी" हे नाटक पहाणे. पाअला वाचट त्रिम .

कुत्रे पाळणं हा अतिशय आनंददायी अनुभव आहे. पण जर तुम्ही फ्लॅट मधे रहात असाल तर पाळू नये. कारण त्यामुळे कुत्र्यावरही अन्याय होतो. तुमच्यासभोवती मोकळे आवार असले तरच पाळावा. बाकीच्या डिटेल्स वर सर्वांनी लिहिल्याच आहेत. मी श्वानप्रेमी आहे पण माझे ओळखीचे वा आप्त तसे असतीलच असे नाही.त्याचाही विचार व्हावा. कुत्रा हा अत्यंत हुशार प्राणी आहे.बिनडोक तर मुळीच नाही. रस्त्यावरुन चालताना, कोण श्वानप्रेमी आहे ते त्यांना कळते. त्यांच्यावर ते सहसा भुंकत नाहीत असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by तिमा

कुत्रा हा अत्यंत हुशार प्राणी आहे.बिनडोक तर मुळीच नाही. १००% सहमत. लई हुषार असत्यात शिवाय त्यांची मेमरी बी स्ट्राँग असतीया... जाता जाता :--- मला कुत्रे कितीही आवडत असले तरी रस्त्यातले मोकाट कुत्रे मात्रं टाळंक सरकण्यास कारणीभूत ठरतात... आईच्या गावात फु़कटची बोंबाबोंब ! साला रातच्यालाच ह्यांना लयं उत येतो काय ? साला आधी १०-१२ कुत्तरडी व्हाव्ह व्हाह ओरडतात. मग तेच व्हाव्ह व्हाव्ह वेगवेगळ्या कोनातुन ऐकायला येते... मग एक करुन व्हाव्ह ची संख्या आणि आवाज कमी होत जातो तरी सुद्धा एखादं हरामी कुत्तरडं असतंच, की जे स्वतःच्या नरड्याला ताण देउन देउन व्हाव व्हाव करतंच बसतं ! मी म्हणतो गप तिच्यायला आधीच डोक्याचे १२ वाजेलेले आहेत त्यात तु साला रात्री १ वाजे पर्यंत ओरडुन ओरडुन का अंत पाहतोस ? खाली येउन काठीने पेकाटच मोडुन टाकी न बघ ! अवांतर :--- आता कसं जरा बरं वाटतेय मला ! साला कशा कशाचं फस्ट्रेशन "पाळवे" लागेल हे सांगता येत नाही.;)

माझ्यामते जर तुमच्या घरी कोणाला अ‍ॅलर्जी वैगरे नसेल, तर नक्की कुत्रा पाळा. कुत्र्यासारखा इमानदार, हुशार आणि प्रेंमळ प्राणी नाही. तुम्ही त्याला जेवढे प्रेम द्याल, त्याच्या दुप्पट तो तुमच्यावर प्रेम करेल. आणि आता कुठल्या जातीचा पाळायचा विचाराल, तर ह्या बाकी जातींपेक्षा त्या कुत्रीचेच एक पिल्लु घ्या. अगदी कुठल्या जातीचाच घ्यायचा असेल तर लॅब सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. डॉबरमॅन चांगला आहे, पण त्यांचा स्वभाव थोडा agressive असतो. तुम्ही जर पहिल्यांदाच कुत्रा पाळणार असाल तर लॅबच घ्या.

In reply to by Mrunalini

तुम्ही त्याला जेवढे प्रेम द्याल, त्याच्या दुप्पट तो तुमच्यावर प्रेम करेल.
बरोबर. आपलं प्रेम म्हणजे वेळचेवेळी गिळायला देणे, प्यायला पाणी, रहायला जागा, झोपायला गुबगुबीत अंथरुण, त्याच्या ह_ण्या-मु_ण्याच्या वेळा सांभाळणं, त्याचं वेळी-अवेळी भुंकणं सहन करणं, शेजार्‍यांना त्रास देणं, घरभर पसरलेले केस स्वछ करणं, त्याला वेळच्यावेळी डॉकटरला दाखवून लशी टोचवणं, त्याला सोडून कुठेही न जायची अबाळ सहन करणं वैग्रे वैग्रे. आणि त्याचं प्रेम म्हणजे पायात घुटमळत कुई-कुई करणं.

मला कुत्रे पाळायचा आणि त्यांना बावळटासारखा जीव लावायचा नाद आहे. सध्या असलेलं कुत्र सॉरी कुत्री जर्मन शेफर्ड. सिंगल कोट. ( अंगावर फार केस असत नाही) वेळच्या वेळी लसिकरण. औषधोपचार. आवडतं खाद्य पेडेग्री देतो. शी सु साठी बाहेर सोडतो. सुरुवातीला हे सर्व लहाने लेकरांप्रमाणे करावं लागतं. मी लहान पिलु घेतलं तीन हजाराला.. मला विचाराल कुत्र कोणतं पाळावं तर माझी शिफारस डॉबरमन. तुर्तास इतकेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा डा तुमच्या नादाचं ठीक आहे. ते शी शू तुमच्याच बंगल्यात करून घेऊन मग आमच्या बंगल्यात सोडत जा ना ! काय आहे झाडूवाला " माल" हलवायचा जादा चार्ज मागतो !

पहा, पुन्हा विचार करा.. जर पुढे जाऊन तुमचा इंटरेस्ट संपला तर त्या कुत्र्यावर अन्याय.. वर बर्‍याच जणांनी म्हटलय तसं, कुत्रा तुम्हाला त्याच्यावर प्रेम करायला भाग पाडतो अगदी इतरांना तुमच्यापासून वेगळं करुन, तुम्हीही छान रमता आणि मग एक दिवस साला एक्झिट घेऊन गेला की आपलं उरलेलं आयुष्य बरबाद त्याच्या आठवणीत! आणि कुत्रा पाळणार की कुत्री, त्यांचे सगळे तदनुषंगे येणारे नैसर्गिक सोपस्कार.. जबाबदारी असतेच! -(गल्लोगल्लीचच्या भटक्या कुत्र्यांच्या पेकाटात लाथ घालायला सदैव तत्पर) उपास

मित्रमंडळीत ज्यांच्या ज्यांच्या घरी म्हणून कुत्रा आहे त्यांच्या घरी जायचं म्हणजे जीवावर येतं. गेलं की गेटपासनं घरात शिरेपर्यंत ही छळवादी कुत्री भुंकत असतात. बरं कितीही भुंकली तरी आपण घाबरु नये अशी श्वानप्रेमी मंडळींची अपेक्षा असते. असो, मला अनुभव नाही पण आजूबाजूचे नमुने बघून पुन्हा विचार करा येवढंच म्हणेन.

In reply to by सूड

बरं कितीही भुंकली तरी आपण घाबरु नये अशी श्वानप्रेमी मंडळींची अपेक्षा असते
अगदी अगदी. आणि वर "दुसरं कोणी घाबरत नाही त्याला" अशी टिप्पणी करून पाणऊतारा सुद्धा करतात.

डॉबरमन मस्तच. कुत्र्यांचा लळा लागण्याबद्दल वर लिहिलेल्या सगळ्यांशी सहमत.. कुत्र्यांना शिस्त लावली तर त्यांच्यासारखा प्राणी नाही. खूप जीव लावतात. उत्तम सोबत करतात. पण कुत्र्यांची प्रचंड काळजी घ्यावी लागते. स्वच्छता,व्यायाम सगळीच. सगळं कुटुंब बाहेर राहणार असेल काही दिवस तर काळजी घेईल असं श्वानप्रेमी कुटुंब शोधून ठेवा. आमच्या एका शेजार्‍यांनी खेळणं आणावं तसं एक पिल्लू आणलं आणि त्याला ग्रिल्सच्या दारात लॉक करुन १५ दिवसांसाठी निघून गेले बाहेर, तेही न सांगता. किती आटापिटा करावा लागायचा त्या पिल्लूला खाऊ घालायला. आणि ते ओरडत रहायचं बिचारं दिवसभर. पण मूळचा तुमचा प्रश्न पिल्लू आणून सुटणं कठीणच आहे. ती कुत्री छोट्या पिल्लाला भीक घालेल असं वाटत नाही..

In reply to by पिंपातला उंदीर

अरे बुवा.. सारेच धागे येकदम सिरेस काय म्हणून करायचे ? ते चेपूच्या फालतू लाईक अनलाईक पेक्षा बरा आहे हा गाढवपणा !

स्नेहातई मज्जाच करायची असेल धाग्यावर, तर शहामृग किंवा इममू पाळ ,;-) लै भारी शिरेसली पायजे असेल केनेल तर मला सांग. मी देतो सोलापुरात आलीस की. :)

In reply to by अभ्या..

माझं एक फ्रेंच मॅस्टिफ पेंडिंग आहे बे तुझ्याकडं. पैलंच सांगून ठेवतोय कडू! नंतर नाय म्हणून सांगायचं नाही.

In reply to by धमाल मुलगा

धम्या लेका फ्रेंच मॅस्टिफ पेंडिंग आह ची आठवण करुन द्यायला भारी वाटते पण तू जौन बसला अम्रीकेत. इथं हे धूड दोघांना आवरत नाहीय्ये. चक्क पिंजरा लावावा लागलाय. अजून बी हवं आसल तर सांग गड्या पण एक्स्ट्रा दोन माणसाचं शिजवस्तवर वैनीसायबाचा पिट्टा पडल. आन घेतलं तर कपल घे. उगा उपासमार करु नकोस त्याची. जास्त पिसाळतेय मंग. ;) सांग मग कधी यीवू घीऊन आम्ही तिघेजण? fm