✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भीक न घालता कुत्रे कसे आवरावे ?

स
सस्नेह यांनी
Sun, 08/04/2013 - 20:53  ·  लेख
लेख
म्हणजे त्याचं असं झालं की हे सगळं त्या कुत्रीनं सुरु केलं. ओ, कुत्री ही शिवी नैये कै ! खरीखुरी कुत्री आहे. ती बघा अजून आमच्या गेटबाहेर उभी आहे. आणि तिनंच दोन महिन्यापूर्वी आमच्या नारळीखाली एक नव्हे दोन नव्हे सात पिल्ली घातली होती. पंधरा दिवस तिनं आम्हाला नारळीच्या पंधरा फुटात पाय तर टाकू दिला नाहीच, वर आणि आमच्याच अंगणात आम्हाला जायची चोरी झाली ! काठी हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पाय टाकणे जिवावरचे धाडस होऊन बसले. भगीरथ प्रयत्नाने तिची अन तिच्या पिल्लावळीची बोळवण शेजारच्या पडक्या ग्यारेजमध्ये केल्यानंतर सुद्धा तिने आपला दरारा, येत जाता वॉव वॉव करून टिकवून धरला आहे. शिवाय माहेरघरचे आमंत्रण असल्यागत वेळीअवेळी हक्काने आमच्या मागच्या दारी खरकटी शिते खाण्यासाठी ती अन तिची पिल्लावळ वरचेवर पायधूळ झाडत असतात , ते निराळेच ! म्हणजे, ती गेटवरून उडी मारून अन पिल्ले गेटखालच्या सापटीतून सरपटत ! तर या सगळ्या कुत्रीय दहशतीवर चिरंजीवाने रामबाण उपाय शोधला आहे. तो असा, की आपणच एक कुत्रा पाळायचा ! तोपण साधासुधा नव्हे, तर जर्मन शेफर्ड ! आता माझी लहानपणीची सगळी हयात अपार्टमेंटमध्ये राहून गेल्यामुळे हे बंगलेवाल्यांचे कुत्रे प्रकर्ण म्हणजे मला काला अक्षर भैस बराबर ! मग हे अज्ञान, मिपावरच्या सर्वज्ञ, तज्ञ, सूज्ञ व सदैव सल्ल्यास सज्ज असणाऱ्या निष्णात सल्लागारांकडे नेण्याचे ठरवले. तेव्हा मिपावरील सर्व सज्जन, साक्षात माहितीचे अर्णव, यांना णम्र इनंती की कृपया खालील मुद्द्यांवर मला सल्ला देऊन गार.. आपलं, उपकार करावे ! १. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ? २. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ? ३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ? ४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ? ५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ? ६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ? ७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ? ८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ? ९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ? १०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ? तर वरील सर्व माहिती मिळाल्याशिवाय कुत्रा पाळण्याचे धाडस करण्याचा इरादा पक्का होईना. मग द्या बरे तुमचा चान चान सल्ला !! a
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
44176 वाचन

💬 प्रतिसाद (123)

प्रतिक्रिया

घेतला तर रेअर ब्रीडचा घेऊ

अभ्या..
Fri, 08/09/2013 - 20:36 नवीन
घेतला तर रेअर ब्रीडचा घेऊ नको स्नेहातै. पार्ट्नर मिळवायला लै तरास पडतो. पुण्याबिम्बईत मिळतेत. लहान गावात नाहीत मिळत. :( कारवानी किंवा धनगरी लै भरोशाने घायचे ब्रीड आहेत. त्याच्या सवयी लवकर कळत नाहीत. आपल्या सवयी त्याच्यावर लादल्या की काहीतरी वेगळेच होऊन बसते. त्यापेक्षा रॉट्विलर नायत्र लॅब बेस्ट. डॉबरमन कडे चांगले लक्ष देणार असताल तर ते पण चालेल. पण लॅब लै आळशी होतेत घरी बसुन. :( बाकी ते ट्रेनिंग वरुन जोक आठवला. एकजण लै हौसेने कुत्रा ट्रेन करतो. प्रात्यक्षिक दाखवायला आण शायनिंग मारायला मित्रांना बोलावतो. एक बिस्कीट घेऊन "टेक टॉमी टेक" चा आदेश देतो. टोमी गप्पच. ह्याचे परत चिडून "टेक टॉमी टेक". . . टॉमी बिचारा कंपाऊंडला जाऊन टेकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हाहाहा!

पैसा
Sat, 08/10/2013 - 17:38 नवीन
मी आणि माझा शत्रुपक्ष आठवला! कुत्र्याचे मालक "टेकीला" आणतात बाबा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कारवानी/धनगरी....

धमाल मुलगा
Mon, 08/12/2013 - 21:54 नवीन
डाक्टरबाबा ह्या बाबतीत अनुभवी आहेत असं त्यांच्या प्रतिसादावरुन कळतं. त्येंच्याकडून टिप्स घेता येऊ शकतील. :)
ह्याचे परत चिडून "टेक टॉमी टेक". . . टॉमी बिचारा कंपाऊंडला जाऊन टेकतो.
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

झालं?

स्पंदना
Wed, 08/07/2013 - 04:26 नवीन
झालं? केव्हढी माहीती ती, अन किती प्रकारचे प्रतिसाद. बा द वे मेरेकु एक नय समझ्या। बोले तो आप कुतीयासे छुटकारा चाहते हो। फिर दुसरा कुत्ता कायको चाहिये? और अगर चाहीये, तो जो है उसपेच क्यु नय चलानेल्का? मतलब पालनेकाही है तो जो अभी खुद ब खुद द्वार्पे खडा है वोहीच क्यु नय पालनेका?
  • Log in or register to post comments

अरे बाबा, जो है वो वन प्लस

सस्नेह
Wed, 08/07/2013 - 04:35 नवीन
अरे बाबा, जो है वो वन प्लस सेवन है ! यानेके फंडा सेवन बार ! और हमारे घरमे आके हमकोच वॉव वॉव करती ना वो ! तो काटेसेच काटा निकालनेका, करके दुसरा कुत्ता लानेका ! समझी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

काटे से काटा! कुत्तेसे कुत्ता

स्पंदना
Wed, 08/07/2013 - 04:51 नवीन
काटे से काटा! कुत्तेसे कुत्ता! :)) :)) :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

"काटे से काटा" यानेके

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/10/2013 - 23:35 नवीन
"काटे से काटा" यानेके "कुत्तेने काटा तो उसको काटनेकू दुसरा कुत्ता लानेका"... भौत अच्चा आयड्या हाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

आयला शतक? माझा शतकी प्रतिसाद

स्पंदना
Wed, 08/07/2013 - 05:10 नवीन
आयला शतक? माझा शतकी प्रतिसाद स्नेहांकिताला सादर भेट> काय ब्वा ! भाव वाढला एका माणसाचा! वॉव्व वॉव्व वॉव्व।
  • Log in or register to post comments

रोचक विषय अन अतिरोचक चर्चा

श्रीरंग_जोशी
Wed, 08/07/2013 - 07:53 नवीन
धागाकर्तीस शुभेच्छा. भविष्यात या संकटापासून कशी सुटका झाली यावर लिहिण्यास विसरू नका. बाकी प्रतिसादांमधील काही अनुभव वाचून १२वी युवकभारती पुस्तकातील Snapshot of a dog हा निबंध आठवला. या अन याप्रकारच्या उत्तमोत्तम वाङमयाकरीता पा.पु.म. चे आयुष्यभर ऋणी राहीन.
  • Log in or register to post comments

आई शप्पथ

सखी
गुरुवार, 08/08/2013 - 18:27 नवीन
आई शप्पथ.. पुढे मागे कधी कुत्रा पाळायचा ठरलाच तर मला काहीही प्रोब्लेम येणार नाही.. काय डिट्टेल सुचना आहेत!!!! प्रतिसाद श्रेय पिराचा हा प्रतिसाद कुत्रा जीव लावतो हे खरं आहे, स्नेहाकिंताताई वर काही जणांनी म्हंटल्याप्रमाणे हा जरा लांबचा उपाय वाटत नाही का? तुम्ही पिल्लु आणणार, त्याला ट्रेन करणार, ते मोठे होणार, त्यानंतर ते ह्या कुत्रीला घाबरवणार (?) तेही ते स्वत: भित्रे वा जग्नमित्र नसेल तर. त्यापेक्षा यातलीच १-२ पिल्लं घेतली तर? आणि बाकीची ओळखीत, मित्र-मैत्रिणीमध्ये वाटुन टाकली तर?
  • Log in or register to post comments

पुष्कळ लोकांनी सातातले एखादे

सस्नेह
गुरुवार, 08/08/2013 - 19:48 नवीन
पुष्कळ लोकांनी सातातले एखादे पिल्लू घेण्याचा सल्ला दिला आहे. पण जी कुत्री पिल्लांच्या जवळ जायच्या आधीच वॉव वॉव सुरु करते, ती पिल्लाला दत्तक देईल कशी ? आणि मग एकाला दत्तक घेतले, की त्याचे भाऊबंद इथेच मुक्काम ठोकतील की कायमचा ! Image removed.
  • Log in or register to post comments

ओळखा याला

चाफा
Sat, 08/10/2013 - 15:39 नवीन
Image removed. ह्ये आमचं दोस्त, याचं ब्रीड ओळखा पाहू
  • Log in or register to post comments

हरलो!

धमाल मुलगा
Mon, 08/12/2013 - 21:54 नवीन
नाय ओळखता येत. आता सांग लवकर कोणतं आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाफा

आधी याला ओळख.

स्पंदना
Tue, 08/13/2013 - 05:48 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

जर्मन शेफर्डचा बच्चा आहे!

धमाल मुलगा
Tue, 08/13/2013 - 06:42 नवीन
जर्मन शेफर्डचा बच्चा आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

केव्हढा मस्त आहे ना?

स्पंदना
Tue, 08/13/2013 - 06:50 नवीन
केव्हढा मस्त आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

नाय ओळखता येत. आता सांग लवकर

चाफा
Tue, 08/13/2013 - 17:25 नवीन
नाय ओळखता येत. आता सांग लवकर कोणतं आहे ते. >>>>> मला माहित असता तर विचारलं असतं का धम्या, तु एक्सपर्ट म्हणून विचारलं, हे प्रकरण एका मित्रानं घरपोच केलेलं आहे, एकुणच लै भारी काम आहे, पार गावठी पासून ते पोलीस डॉग पर्यंत कंपेअर करून झालं सवयी आणि रूपडं काही ओळखता येई ना ! :( खास सवयी म्हणजे, हा फक्त मी आणि माझी पुतणी दोघांपैकी कुणीतरी जेवायला घातलं तरच जेवतो. पट्टा हा प्रकार म्हणजे गुलामगिरीची निशाणी असल्यानं त्याला सक्त विरोध म्हणून शक्य त्या प्रकारे पट्टे तोडतो. :) घरातल्या कुणीही `धर' हा शब्द उच्चारताना त्याचा रोख जर एखाद्या माणसाकडे असेल तर त्या माणसाचा किमान डॉक्टरी खर्च करण्याची वेळ आमच्यावर येते. फिरायला जाताना घरातल्या कुणासोबतही जातो फक्त परत येताना ते दोघे एकत्र असतील याची खात्री नाही `अपवाद म्हणून मी भाऊ आणि माझी पुतणी' आवाज खणखणीत दुसर्‍या मजल्याच्या गच्चीतून गुरगुरला तरी तळमजल्यावर पळापळ. बाहेर नेलं की लय रोमियोगीरी करतंय राव ह्ये..
  • Log in or register to post comments

जमल्यास खालील भागा वाचा...

मुक्त विहारि
Fri, 09/06/2013 - 17:36 नवीन
http://www.maayboli.com/node/22851
  • Log in or register to post comments

समस्त सल्लाकारांना कळवणेस

सस्नेह
Mon, 06/05/2017 - 23:17 नवीन
समस्त सल्लाकारांना कळवणेस अत्यंत आनंद होतो आहे की १ जून २०१७ रोजी आम्ही एक सुरेख लॅबचा बच्चा दत्तक घेतला असून ब्लेक असे नामकरण झाले आहे. फोटू उद्या टाकणेत येतील. :)
  • Log in or register to post comments

अरे वा!!

अनन्त अवधुत
Tue, 06/06/2017 - 01:23 नवीन
अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

रच्याकने

अनन्त अवधुत
Tue, 06/06/2017 - 01:31 नवीन
ह्या समस्त धाग्याला कारणीभूत झालेली कुत्री (आणि तिचे पिल्ले) अजूनही त्रास देतात का?
  • Log in or register to post comments

नाही हो ! ती गेली. आता राहिले

सस्नेह
Tue, 06/06/2017 - 06:54 नवीन
नाही हो ! ती गेली. आता राहिले श्वानप्रेम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

स्नेहांकिता,छान! कुत्रे अतिशय

नूतन सावंत
Tue, 06/06/2017 - 11:35 नवीन
स्नेहांकिता,छान! कुत्रे अतिशय मायाळू असतात त्याचा अनुभव तुला येऊदेत.आमच्याकडे एक मस्त कुत्रा होता,7/8 दिवसांचं पिलू रस्त्यावर बेवारशी सोडलं होतं कुणीतरी इतर कुत्रे त्याला त्रास देत होते म्हणून भाऊ त्याला घरी घेऊन आला होता.जातिवंत कुत्रा म्हणजे काय? हे त्याला पाहून कळायचं,19 वर्षं जगला तो आणि जाताना पुन्हा कुत्रा पाळायचा नाही ही शिकवण देऊन गेला.मला कुत्रा प्रचंड आवडतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा