बर्यााच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा तांबड्या लोकांचे तांबडे प्रश्न (अॅज इन मंगळवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये.
माझं स्वतःचं मंगळा वर जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, मंगळाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण मंगळ ओरियंटेड वगैरे नाही. एनटी (न्यूरो टेक्नॉलॉजि) मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही मंगळा वर पोहचलो. पासप्लॅनेट वर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण १ वर्षा साठी आलो ते गेले ५ वर्ष झाले (पृथ्वी वरचे) इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.
सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे स्पेस स्टेशन मध्ये राहिल्यासारखं स्पेस शटल मध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या स्पेस शाळेत जायला लागला. पहिले काही दिवस विषेश काही घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्या चालण्यातला बदल, शाळेत नॉलेज ट्रान्स्फरच्या KT (शिकवण्याच्या) पद्धतीतला फरक इ. गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली मंगळी पद्धत जास्त आवडली. इथे इ-लिखाणावर किंवा इ-पुस्तकातून शिकण्यावर, घोकंपट्टीवर, पुस्तकी किडा करण्यावर आणि परीक्षेत मिळालेल्या गुणांवर भर दिला जातो. पृथ्वीवरील भाषेची मुळाक्षरे किंवा अंक, पाढे, कविता याच्या पाठांतरावर भर दिला जातो. इतर ग्रहांशी संबंध ठेवण्याची पद्धत, इतर ग्रहांची साधन सामुग्री आपल्याला जास्तीत जास्त कशी मिळवता येईल इ. शिकवण्यावर भर आहे. जे काही शिकवले जाते ते इंटर प्लॅनेटरी स्पेस सिलॅबस मधुनच. इ-पुस्तकं, इ -नोटबुक्स भरपूर, घरचा (म्हणजे स्पेस घरचा) अभ्यासही भरपूर, अगदी मान मोडेस्तो. इथल्या शाळेत वर्गात १५० मुलं आणि १ कॉम्पुक्षक. वर्गाचे प्लॅनेट्स-स्पेस सायन्स-गॅलॅक्सी-नेब्युला-डार्क मॅटर-डार्क एनर्जी- कृष्णविवर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी दंगा करत असतात. म्हणजे प्रत्येक मुलगा आपापल्या स्पेस स्टेशन मध्येच असतो. प्रत्येकाला एक स्वतंत्र, सुसज्ज रूम म्हणजे त्याची शाळा. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं व्ही आर रिऍलिटी गेम मधनं मारामारी करत होती. कॉम्पुक्षक त्यांना प्रोत्साहन देत होता.
आधी मला वाटलं की हा निव्वळ मंगळपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या काही महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात ग म भ न, पाढे, अडीचकी, निमकी पासून मारामाऱ्या कशा कराव्यात, कुठल्याही गोष्टीत दुसऱ्या पेक्षा जास्त कसे मिळवावे इत्यादी पर्यंत बरंच काही.
इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पृथ्वीवर न्यू जर्सीला असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. होम वर्क कधीच नसायचा. घरात अभ्यासाचे कोणीही नाव काढता नसे. इथे मात्र इतका अभ्यास आणि होम वर्क करून मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक मंगळी तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो.
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं स्पेस स्टेशन असावं असं काही वाटत नाही. मला उलट पृथ्वीवर रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील भारत सोडुन अमेरिकेत आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला पृथ्वीवरून मंगळावर आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्या् गोष्टी अनेकविविध असतील. पृथ्वीवरच्या शाळेत त्याच्या आजुबाजुला त्याच्याच सारखी मुलं नव्हती "माझ्या ग्रुपमध्ये गुरुनाथ-हर्षद-शनाया आणि मी आहोत" हे वाक्य मला पृथ्वीवर ऐकु येणं जरा अवघडच आहे.
पण दुसर्याव बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या ग्रहा पासून दूर आहे. हळूहळू त्याची पृथ्वी बद्दलची ओढ मारली जाईल. सावत्र आणि मानलेली नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी मानलेली नाती मिळतील. इकडे फक्त सख्खीच. शिवाय पृथ्वीवर हि आता शेवटच्या अणू युद्धाचे दुष्परिणाम आणि प्रदूषण कमी झालेले आहे आणि इतर कुठल्याही ग्रहाच्या तोडीस तोड उपलब्धता, सुविधा, वस्तू, जीवनमान आहे. मंगळावरच्या सोयी आणि पृथ्वी वरची संस्कॄती असे दुहेरी फायदे न्यू जर्सीत राहुनही मिळु शकतात. मग राहेना का अनुभवविश्व जरा सीमीत आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित.
हा प्रश्न आता बराचसा सार्वत्रिक होतो आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही मंगळयांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या पृथ्वी वरच्या अनुभव प्रमाणे निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे वेगवेगळ्या ग्रहांवर असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण ग्रह करतो, ते तेवढं काही वर्षांनी गृहीत रहात नाही. त्यामूळे पृथ्वी सोडताना जितके वेगवेगळे ग्रहवासियांचे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं मंगळ. जशी इथे संस्कृती बाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला ग्रह सोडणे, आपली ग्रह संस्कॄती-पद्धती दुसऱ्या ग्रहावर रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या ग्रहावर राहुन काम करणे ही ग्रहभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते.
परग्रही असणाऱ्यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परग्रहाचीची संधी नाकारुन पृथ्वीला निवडणाऱ्यांनी .. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना पृथ्वी सोडण्याचा फायदा होऊ शकतो.
डिस्क्लेमर:
या लिखाणा मध्ये वरिजनल धागाकर्तीच्या भावना दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही.
लिखाणा मध्ये काही साम्य स्थळे आढळली तर योगायोग समजावा.
याद्या
6996
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
डांगेअण्णां ची माफी मागून ;)
मला पण....
In reply to डांगेअण्णां ची माफी मागून ;) by स्रुजा
त्रागा आणि सल्ले-वाद वाचत आहे
हाहा
ज्यांची मंगळावर जायची औकात*
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(मूल निवासी)
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंगळावर गेलेले लोक पृथ्वीवर
आणि पुन्हा पृथ्वीवर यावं लागलं तर....
In reply to मंगळावर गेलेले लोक पृथ्वीवर by गवि
यावरुन माझ्या कार्यालयीन
परावलंबी पारपरग्रहखतावर
In reply to यावरुन माझ्या कार्यालयीन by सतिश गावडे
सगळे ग्रह इथून तिथून सारखेच
चिवडाच काय खाऱ्या बुंदी पासून फाफड्या पर्यंत आणि सोनपापडी पासून
In reply to सगळे ग्रह इथून तिथून सारखेच by अॅस्ट्रोनाट विनय
केवळ शनी, मंगळावरच नव्हे तर
In reply to सगळे ग्रह इथून तिथून सारखेच by अॅस्ट्रोनाट विनय
वाकयुद्धाची चाहूल...
या लिखाणा मध्ये वरिजनल
खर तर ह्या विषयाला परग्रह
आर्थर सी क्लार्क आणि आशा बगे
हाहाहा
In reply to आर्थर सी क्लार्क आणि आशा बगे by आदूबाळ
आबा साहेब भलतेच इनोदी
In reply to आर्थर सी क्लार्क आणि आशा बगे by आदूबाळ
=)) =)) =)) =))
In reply to आर्थर सी क्लार्क आणि आशा बगे by आदूबाळ
काय ठरलं मग ?
अजून एक...
मस्तं जमलंय ! =)) =)) =))
मस्त...
ओ नो.
In reply to मस्त... by अभिदेश
आणि
In reply to ओ नो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा
In reply to आणि by अभिदेश
मंगळा वरचा गुब्बु विधी
In reply to मस्त... by अभिदेश
वाह..
In reply to मंगळा वरचा गुब्बु विधी by लीना कनाटा
वा: गुब्बूविधी जबर लिहिलाय.
In reply to मंगळा वरचा गुब्बु विधी by लीना कनाटा
फॉर हिअर ऑर टु फ्लाय
"उहापोह" शब्दाने मला भूक
In reply to फॉर हिअर ऑर टु फ्लाय by सिरुसेरि
"मी ५ वर्ष मंगळावर राहते"
"मी ५ वर्ष मंगळावर राहते"
In reply to "मी ५ वर्ष मंगळावर राहते" by वेशीवरचा म्हसोबा
सागा ऑफ सगाहा प्रतिसाद वाचणे.आजच नासाने अशी सोय भविष्यात