Skip to main content

वाङ्मय

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 24/06/2015 08:40 या दिवशी प्रकाशित केले.

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?


गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले

मी आणि परी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 20/06/2015 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी.

शतशब्द कथा - दोन किनारे

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 13/06/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
एका दुसर्याच्या हातात-हात गुंफून हसत-खेळत, पाण्यात भिजत, दोन किनारे पाण्यासहित समुद्राला जाऊन सहज भेटले असते. पण दोन्ही किनारे श्रेष्ठत्वाच्या वाळवीने ग्रसित होते. डाव्या किनाऱ्याला वाटायचे, त्यालाच समुद्राकडे जाणारा रस्ता माहित आहे. उजव्या किनाऱ्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. उजव्याला वाटायचे, सोपा सरळ मार्ग त्यालाच माहित आहे. त्यांच्या आपसातला विवाद आणि कलह शिगेला पोहचला. एक किनारा पूर्वीकडे वळला तर दुसरा किनारा पश्चिमेकडे. पाणी मृगमरीचीकेत हरवले. एखाद्या प्रेताप्रमाणे ते वेगवेगळ्या दिशेला अंतहीन वाळवंटात पाण्याच्या शोधात भटकू लागले. पाण्याअभावी ते तडफडू लागले. देवा!

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

अक्कल दाढ ????

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 28/05/2015 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
(कथा आणि पात्र काल्पनिक आहे) काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. आज सकाळी ओळखीच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेलो.

झिंग बोचर्‍या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु

लेखक सूड यांनी शुक्रवार, 22/05/2015 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले वृंदगान : दु दु दु दु काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले वृंदगान : ऑ अच्च जालं तल नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर वृंदगान : नाच गं घुमा तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम् श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले वृंदगान : आयला गो गौ

सुंदरीचे ओझे

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 20/05/2015 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले. तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला.

एक उनाड उन्हाळी दिवस - सीपीचा सेन्ट्रल पार्क आणि अमलतास

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 18/05/2015 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
मे आणि जुने ह्या दोन महिन्यात सूर्य क्रोधाने लाल होऊन आग ओकीत असतो. या आगीत जिथे धरणी माताच होरपळून जाते, तिथे पृथ्वीवरील प्राण्याची काय बिसात. दिल्लीत रस्त्यावर फिरणार्या आवरा गायी व कुत्रे दिवसभर सूर्याच्या क्रोधापासून स्वत:ला वाचविण्यासाठी सावली आणि पाण्याच्या शोधात भटकत राहतात. दुपारच्या वेळी तर झाडावर पक्षी ही झाडाच्या कोटरात दुबकून राहतात. दुपारचे तीन वाजले होते, सीपीच्या मेट्रो स्टेशनहून बाहेर पडलो. सीपीच्या सेन्ट्रल पार्कमध्ये भरपूर हिरवळ आहे. झाडे- झुडपे ही पुष्कळ आहेत. पार्कच्या जवळून जाताना नेहमीच झाडावर असलेल्या पक्ष्यांची किलबिल ऐकू येथे.

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 14/05/2015 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल. अर्थात थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे. मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते. मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता. म्हणून त्या मैदानाला लोक स्टीफन ग्राउंड म्हणून ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भाड मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पना करणे ही शक्य नव्हते.