Skip to main content

वाङ्मय

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 14/05/2015 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल. अर्थात थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे. मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते. मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता. म्हणून त्या मैदानाला लोक स्टीफन ग्राउंड म्हणून ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भाड मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पना करणे ही शक्य नव्हते.

जरुरत है, जरुरत है......

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 10/05/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?” नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!” “मग?” “पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम?

एका दिवसाची कहाणी - सोनेरी किरणे

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 09/05/2015 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत. अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील. काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता. अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर बस क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या बाजूला एक वाळलेले, पोखरलेले झाडाचे खोड पडलेले होते. बहुतेक काल रात्रीच्या वादळात कोलमडून पडले असावे. गेल एकदाच हे ही झाड म्हणत मी हळहळलो. गेल्या ३० वर्षांपसून मी या रस्त्यावरून जात आहे, पूर्वी हे झाड हिरवेगार होते.

सुन्न करणारी झाडाझडती

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 06/05/2015 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच माझी विश्वास पाटीलांची "झाडाझडती" हि कादंबरी वाचून झाली. आणि मी शीर्षकात लिहिल्याप्रमाणे या कादंबरीने मला सुन्न करून सोडले. जांभळी नावाच्या एका गावात धरण होऊ घातलेलं असतं.

झोपलेले नशिब

लेखक खंडेराव यांनी मंगळवार, 05/05/2015 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची. अशीच काही वर्षे गेली. घरात अजुन एक बाळ आले. कोळ्याला वाटायला लागले, सभोवताल बदलतच नाहीये. तीच झोपडी, तेच जुने कपडे. रात्रीची झोप उडाली. एक दिवस स्वप्नात एक म्हतारा आला. स्वप्नात आला कि खरोखर आला हे काय कोळ्याला कळाले नाही. त्याने कोळ्याला सांगितले, की तुझे नशिब झोपलेले आहे. ते जोपर्यंत जागे होत नाही, काहीही बदलणार नाही.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

हडळीचा आशिक

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 30/04/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
हडळीचा आशिक जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते, “ मला एक वचन द्या.

सनावृता इन सुकांता !

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 22/04/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर ही माहीती जाहीर केल्याबद्दल आम्हाला वाळीत टाकले जावु शकते तथापि त्याचि फिकिर न करता आम्ही कंडुशमनार्थ हा वृतान्त लिहावयास घेतलाच असलयाने हे सांगणे भाग आहे संपादित त्यात प्रामुख्याने पोपशास्त्री , दयाघना , अग्यावेताळ( अ कि ह ह्यावर तज्ञांचा अजुन वाद सुरु आहे , तुर्तास आपण अ म्हणु ), खाटुक , फ्रॉईड आणि बीयरानंद हे सक्रिय कार्यकर्ते आहेत , इतरहि कार्यकर्ते अधुन मधुन उपस्थिती नोंदवत असतात पण प्रामुख्याने हेच ते महाभाग . संपादित नुकतेच सुकांताला झालेल्या कट्ट्याचा ( प्लीज नोट : नॉनमुवी कट्टा ) वृत्तांत पाडत आहे . तर बीयरचा अतीव तीरस्कार करणारे महाभाग बीयरानंद केवळ मित

अहल्या व शूर्पणखा खरेच अन्यायग्रस्त स्त्रीया ?

लेखक शरद यांनी शनिवार, 18/04/2015 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
अहल्या व शूर्पणखा अन्याय झाला कां ? "अहल्येची दुसरी गोष्ट" यावरील सर्वश्री स्पंदना, अवतार व पैसा यांच्या प्रतिसादांवरून जास्त माहिती देण्याची गरज वाटते. म्हणून नवीन धागा काढत आहे. दोघींवर अन्याय झाला असे बरेच जणांना वाटते. बर्‍याच वेळी मूळ गोष्टच माहीत नसते. ती वाचल्यानंतरही जर तुमचे मत निराळे असेल तर तसे मांडावयास हरकत नाही. पण एक नक्कीच लक्षात ठेवावयास हवे की वाल्मीकि-व्यास या उत्तुंग प्रतिभेच्या महान लेखकांनी त्यांच्या काळास अनुसरून लिहलेल्या लिखाणावर आपण आपल्या कुवतीप्रमाणे आजच्या काळास अनुसरून मत देत आहोत.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.