Skip to main content

वाङ्मय

प्रिय अन्वयराव,

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 23/06/2009 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपले मिपाकर अन्वयराव ह्यांच्या छोटेखानी लेखाला हे आमचे छोटेखानी उत्तर! हे उत्तर ह्या स्वतंत्र लेखातून आणि वेगळेपणाने द्यायची कारणे तीन! १) आज बर्‍याच दिवसांनी एखाद्या लेखाला चार ओळींचे उत्तर देण्यास टाईम भेटला. एरवी, 'वा!', 'सुंदर!', 'छान!' या पलिकडे काही उत्तर द्यायला इच्छा असूनही टाईम भेटत नाही. २) अन्वयरावांनी एका बापाच्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १०

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 21/06/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ९

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 19/06/2009 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ८

लेखक प्रसन्न केसकर यांनी गुरुवार, 18/06/2009 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

एकलव्य

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 18/06/2009 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
एकलव्य मध्यम बांध्याचा, हसतमुख आणि उत्साही तरुण होता. तो बुद्धिमान होताच, पण त्याचबरोबर, इतरांशीही मैत्रीचे, स्नेहाचे संबंध असायला हवेत असं त्याला वाटत असे. १९९२मध्ये मुंबईच्या ’जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स’ मधून त्याने आर्किटेक्ट्ची पदवी संपादन केली होती. सात वर्षापासून तो ’पॅरेडाइज कन्स्ट्रक्शन कंपनी’त चीफ आर्किटेक्टच्या पदावर काम करत होता. तो मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे इथपर्यंत पोचेपर्यंत त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. आपल्या योग्यतेच्या बळावर त्याने आपल्या कंपनीत विशेष स्थान निर्माण केले होते. आपले वरिष्ठ मिस्टर द्रोणनाथनना संतुष्ट ठेवण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असे.

मी सखाराम गटणे

लेखक नंदन यांनी शुक्रवार, 12/06/2009 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
[हा लेख साधारण दोन वर्षांपूर्वी लिहिला होता. काही मित्रांच्या सूचनेवरून आजच्या दिवशी येथे पुन्हा देतो आहे. मिपाच्या धोरणात हा लेख, आता किंवा यापुढे बसत नसल्यास अप्रकाशित केला तरी काही हरकत नाही.] "मी सखाराम गटणे. छप्पन सशांची व्याकुळता साठवणार्‍या लहानशा भावशून्य डोळ्यांचा. अर्ध्या विजारीत पांढरा शर्ट खोचून प्राज्ञ मराठी बोलणारा. झकास अक्षर असूनही इतरांच्या स्वाक्षर्‍या गोळा करणारा. आणि, अर्थातच तोंडात दातांच्या ऐवजी छापखान्याचे खिळे बसवलेला. अप्पाजीराव गटण्यांच्या घरी जन्मलो. वयाच्या बाराव्या दिवशीच आई गेली. पोरका झालो. पण म्हणजे नक्की काय?, ते काही बराच मोठा होईपर्यंत कळलं नाही.

“शूप”, “शूप”, “शूप” ....

लेखक निखिलचं शाईपेन यांनी बुधवार, 10/06/2009 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
“और क्या ?” “आरे आणि ठिक, सॉफ्टवेअर जीव मी लेका, एक विकऎन्ड ते नेक्स्ट” “नाही रे तरीपण? वाचतोयस का काही?” “पेपर, ब्लॉग्स, बाकी विशेष नाही.” “फॉऊंटन हेड वाच खरं तर आतापर्यंत दहादा वाचलयं मी” “हम्म्म्म्म, बघतो शनिवारी आणतो, क्रॉसवर्ड मधून” “हो फॉऊंटन हेड, बाय आयन रॅंड, चल रे ठेवतो,स्क्रीन सेव्हर आला असेल एव्हाना, बॉस घिरट्या घालतोय आज” “अछा, चल, बाय” “हो, वाच पण” “नक्की” आयचा घो, ह्या आयन रॅंड च्या. पुस्तक आहे का डिक्शनरी ची जाहिरात? निरक्षर आहे कि काय मी अस्सं दिवसभरात पाच एक वेळा वाटून गेलं. डोकं फुटायच्या आत पुस्तक गादिखाली घुसवून मी पळायला निघालो...

मथुरेतले तीन दिवस..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 09/06/2009 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आजचा दिस अंमळ विलक्षण योगायोगाचाच गेला. सांगतो कसा ते. एक म्हणजे आज मिपाकर दिपाली पाटील यांनी पेढ्यां-मोदकांची सुरेख पाककृती टाकली. दुसरं म्हणजे मला आज 'मथुरानगरपती काहे तुम गोकूल..' या एका अतिशय सुरेख गाण्यावर लिहावसं वाटलं. खरं तर सकाळी दिपालीची पेढ्याची पाककृती वाचूनच मला सतत मथुरापेढ्याची आठवण येत होती. त्यातच मथुरानगरपती.. या गाण्याबद्दल मनात विचार घोळू लागले आणि मी अचानक १४-१५ वर्ष मागे गेलो, जुन्या स्मृती चाळवल्या. शेठ गोविंदश्रीदास हा मूळचा मथुरेचा, परंतु मुंबईच्या झवेरीबाजारातल्या एका पेढीचा मालक. आजही त्याची पेढी मुंबैत आहे. तो आणि त्याचे सगळे कुटुंबीय हे माझे अशील.

गीता, पुल, आणि कोसंबी

लेखक चित्रा यांनी शुक्रवार, 29/05/2009 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मिपाच्या मुखपृष्ठावर गीतेत सांगितलेली "स्थितप्रज्ञाची" लक्षणे यावरून " तुझे आहे तुजपाशी "मधील काकाजींचा संवाद वाचला. या मराठी साहित्यातील अजरामर नाटकाने मराठी मनाला बरीच मोहिनी घातलेली आहे. पुल यांच्याबद्दल तर सांगणेच नको. पुल यांनी एक प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्रातील एक मोठा लेखकवर्ग तर समाजातील एक बराच मोठा विचारी वर्ग (मध्यमवर्गीयही असेल कदाचित) घडवला असे म्हणता येईल. एक उदाहरण द्यायचे झाले तर लहानपणी मला मंगला गोडबोले यांचे "स्त्री" मासिकामध्ये येणारे "झुळूक" सदर आवडत असे, याचे कारण त्यांच्या विनोदी लेखनावर असलेला पुल यांचा प्रभाव.