Skip to main content

वाङ्मय

आचार्य अत्र्यांच्या भाषणाचा दुवा

लेखक सुमीत भातखंडे यांनी शुक्रवार, 09/10/2009 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
आचार्य अत्र्यांच्या वक्त्रुत्व कलेबद्दल आजवर ऐकत आलो होतो - वाचत आलो होतो. एखादं भाषण खरंच ऐकायला मिळावं असं खूप वाटायचं. आणि आज हा दुवा सापडला: http://www.youtube.com/watch?v=19WXh6YP02g मी स्वतः अजून सगळे भाग ऐकलेले नाहीत. पण राहावलं नाही म्हणून आधीच इथे दुवा देत आहे. पण जे काही ऐकलय त्यावरून तरी, इट्स अमेझींग.

सेव्हन हॅबीट्स

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 08/10/2009 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तके वाचताना काही पुस्तके नुसतीच चाळायची असतात थोड्या वेळातच विसरून जायची असतात तर काही दीर्घ काळ डोक्यात घर करून बसतात . इंग्रजी भाषेने अशा पुस्तकांच्या खजिन्याची किल्ली एकदा मला मिळवून दिली. कोणीतरी सांगितले आणि सहज म्हणून हाती लागले म्हणूनही मला एक रत्नाचा परिचय झाला.स्टीफन कोव्हे या लेखकाचा. स्वारी त्यांच्या मॅनेजमेन्ट थॉट्स मुळे परिचित आहे पण त्यातही सरताज म्हणता येईल अशा " सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पीपल " या पुस्तकाचा. मॅनेजमेंट शिकताना मानव या घटकाचा विशेष अभ्यास करायचा असतो.

जननायक प्रभू राम अभ्युदय कादंबरीचे महानायक

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 06/10/2009 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
जननायक प्रभू राम शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले.

पंचाक्षरी आकांत

लेखक शरदिनी यांनी रविवार, 04/10/2009 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
करालदाढा पुलकित पेढा चतुरचर्‍हाटी चंचलमूढा गोष्टगुर्जरी सुष्ट आर्जवी सर्जनदर्जन भजनगुंजनी का सृष्टीच्या भग्नमंथनी तगमग लगबग मूढचिंतनी तिरकस हलकट कृद्धधरित्री गडणी सजणी गडणीसजणी नयनवल्लरी सहजचिल्लरी पुनःपुन्हा ती उडनतश्तरी लखलख चकमक मंददर्शनी कांता करी आकांत आननी शरणमंजिरी विदुरप्रस्तरी धृष्टद्युम्नी चरितविलासी ललाटज्वलिता दारूणपलिता शिशिरवंचना टाहो फुटता पतीशिराला अंकी धारण सती करी ती पतीपरायण ध्वनि अग्नीचे आकांडतांडव मानवरूपी नाचे दानव परंपरेची मर्कटकरणी टाहो कैसा बधीरकर्णी कशाकशाची ऐसी शिकवण कोण करि हे मनात चिंतन
काव्यरस

'नोकरशाई' च्या निमित्ताने

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 26/09/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
नोक्रशाईचे रंग या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेले एक मुक्तचिंतन. ''नोकरशाही व्यवस्था'' नाव घेतल्यावरच दचकलात ना!" आता कोणती नवी गडबड! "अशीच तुमचा प्रतिक्रिया असणार, अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यांना नको वाटणारी अशीच ही व्यवस्था . ती सरकारी ऑफिसेस, गर्दी, ते कधीतरीच भेटणारे साहेबलोक! चहापाणी ,अग आई ग!आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेबलाखालची देवाण-घेवाण. थोडक्यात काय, तर लोकांना त्राही त्राही करून सोडणारी एक व्यवस्था आणि त्याचबरोबर मेंदूत अगदी नकळतपणे कुठेतरी उमटणारा 'नको रे बाबा!' चा सूर! खरे ना? सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात साधारणत: हेच चित्र उभे राहणार, आणि राहिलेच पाहिजे म्हणा!

टार्‍या म्हणजेच लव्हचुंबक

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 25/09/2009 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , ढिष्क्लेमर्स : १. वांङमय लिहीण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे .. :) लहान तोंडी लै मोठा घास घेतोय संभाळून घ्या ;) टारझन ही माझी अफ्रिकन इमेज .. माझी रियल इमेज आणि व्हर्चुअल इमेज ह्या मधे जी काही कष्मिषकिष्मिश का काय रे .. चाललं होतं त्याच्या परिणाम म्हणजे हे वांङमय ! सगळे हलकेच घ्यायचे आहे बरं ! २. कमजोर हृदयाच्या लोकांना लेख अतिशय हिण& हिणकस वाटण्याची शक्यता आहे , त्यांनी इथेच थांबलेलं बरं ! पुन्हा "मिपावर हे काय येतंय ?