Skip to main content

वाङ्मय

हरवलेलं सुख

लेखक आनंदयात्री यांनी शुक्रवार, 20/03/2009 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझं गाव तसं शांत आहे. म्हणजे वर्दळीच्या वेळेतही बर्‍यापैकी मोकळे रस्ते असतात. आमच्या भागात तसा उन्हाळा जरा कडकच. मग दुपारच्या वेळेस उन्हाळ्यात रस्ते, गल्ल्या अगदी मोकळ्या मोकळ्या असतात. तुरळक चुकार एखादी रिक्षा धावते, किंवा कुल्फीवाला/बर्फ का गोलेवाला पुकारा करत जातांना दिसतो. दुपारी मात्रं उन चांगलेच तापलेले असते. शिशिरातली पानगळ धुळीच्या भोवर्‍यांवर स्वार होउन गल्लोगल्ली, छोट्या मोठ्या मैदानांवर नाचत असते. आईची नजर चुकुवुन बाहेर खेळणारे एखादे चिमुरडे त्या वावटळींमधे कागदाचे तुकडे टाकण्यात मग्न असते.

"नेणीव" आवडला

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 18/03/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
नेणीव भावला प्रती, नीरज हाय, काय म्हणतोस कसा आहेस गेली जवळ जवळ १ वर्षे आपली भेट नाही त्यापुर्वी दररोज भेटणारे आपण आपली कॉलेजेस बदलल्याने गेल्या वर्षात भेटलेलो नाही .आपली मैत्री जरी विविध पायावर उभारलेली असली तरी त्याचा पाया म्हणजे दोघाना मनापासुन आवडणारा संदीप खरे आहे हे तु लगेच मान्य करशील ,सांगायची गोष्ट अशी की की कालच अगदी पहिल्या रांगेत बसुन नेणीवेची अक्षरे बघायचा योग आला म्हणजे मी चान्स मारला .आयला त्या संदीप खरेना लेख दील्यानंतर व त्यावर त्यांची प्रतीक्रीया आल्यानंतर मी हवेतच गेलो होतो म्हणले आता पुढचा कार्यक्रम पह

मनाच्या कुपितले-जर्नल

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 18/03/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा सलग बारावा लेख. हे सर्व लेख तुम्ही इथेही वाचु शकता
जर्नल
हाय लोकानो काय चालु हाय ,अहो मला ओळखले नाहीत का! हा कसे ओळखणार म्हणा, तुम्हा सगळ्यांची शिक्षण होवुन लय दीवस झाले, आणि त्या काळात आमच्या भावंडानी तुम्हाला लय पीडलेला मग तुम्ही मला कसे ओळखाल. बाकी म्या जर्नल आणि माझा मालक म्हणजे ह्यो विन्या टारगट मी आपला त्याचा पामर .ए कोण ते म्हणले रे टॅब बंद करतो त्या विन्या मुर्खाचा नवा निबंध कशाला वाचत बसु,गप्प बस आज म्या बडबडणार आहे.

अश्वत्थाम्याच्या डायरीतले एक पान .......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 16/03/2009 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
दोन घडीचा डाव, त्याला जीवन ऐसे नाव..... हं..जगणं मरणं, मरणं जगणं सारंच अनाकलनीय, विलक्षण.... माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर.. जीवन... निरर्थक, वेडेवाकडे, कागदावर रेखाटलेल्या अर्थहिन भौमितिक रेखाकृतींसारखे कागदावरच्या सर्वच रेषांना...नसतो अर्थ जसा....! माझं जीवनही तसंच आहे.... मदिरेच्या प्याल्यातील शिल्लक, शेवटच्या, एकुलत्या एक थेंबासारखे ... तृणपर्णावरुन ओघळलेल्या एकाकी दंवबिंदुसारखे ... कपोलावर अलगद, नकळत, रेंगाळलेल्या कढत कढत कदाचित खारट आसवांसारखे ... का जगायचे, कशासाठी जगायचे ? जगण्यातला अर्थ जाणण्यासाठी?

रसराजेश्वर..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 13/03/2009 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
साला, मुक्तछंदातल्या आमच्याही या काही ओळी.. मार्च अर्धा संपला जवळजवळ! तो आता येणारे, तो येतोय, येऊ घातलाय..! चला त्याचं स्वागत करुया, सज्ज राहूया, गुढ्यातोरणं उभारून! तो राजा आहे, तो बादशहा आहे तो सम्राट आहे..! तो साक्षात चक्रवर्ती आहे..! तो माणसाला माणूस जोडतो, तो मनातले सारे विकार करतो नाहीसे एका क्षणात.. तो वाटतो फक्त प्रेम

मनाच्या कुपितले - बराक ओबामा

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 11/03/2009 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा अकरावा लेख या सदरातील सर्व लेख तुम्ही येथे पाहु शकता.
बराक ओबामा - पासवर्ड फुटलाय.
बराक ओबामा, गेले वर्षभर अख्या जगभर ज्याची आणि फक्त ज्याचीच चर्चा चालू होती, ते हे व्यक्तिमत्व या काळात प्रत्येकाला या व्यक्तीबद्दल किती लिहू आणि किती नको असे झाले होते. पण, या व्यक्तीची संपूर्ण माहिती कुठेच मिळत नव्हती. त्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले गेले. पण, थोडक्यात योग्य माहिती मिळेल असं कोणतच साधन नव्हतं.

पु.ल. एक साठवण

लेखक एकशुन्य यांनी मंगळवार, 10/03/2009 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, असा एकही मराठी माणुस नसेल, ज्याच्या मनात पु. ल. म्हणताच त्यांची एकाधी ओळ , एखादे पुस्तक किंवा त्यांचे मिस्किल हसू उमटणार नाही. अश्या पु.ल. वेड्या सर्वांसाठी हे संकेतस्थळ देत आहे. पु.लं. चे मजेदार किस्से, पु.लं. ची छायाचित्रे , त्यांचे विचार ह्या एका ठिकाणी मिळ्तील. संकेतस्थळाचे सर्व श्रेय त्याच्या मालकाला आहे. मी फक्त एक हास्यदुताचे काम करित आहे. भरपुर हसा आणि भरपुर जगा. संकेतस्थळः "http://cooldeepak.blogspot.com"

महाजालावर मराठीचा जय हो

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 09/03/2009 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
{पुर्वप्रकाशीत्-सदरचा लेख ६ मार्च २००९ रोजीच्या सकाळ वृत्तपत्राच्या कोल्हापुर आव्रुतीत मुक्तपीठ या सदरात प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख वृत्तपत्रात येणार हे माहीत असल्याने सर्व संकेतस्थळे दीलेली आहेत ,यातील बरीचशी मिपाकराना माहीत असण्याची शक्यता आहे. हा लेख आपण येथेही वाचु शकता. http://farm4.static.flickr.com/3314/3340207823_baf982819d_b.jpg}
महाजालावर मराठीचा जय हो
इंटरनेटला जोडलेला संगणक..

राम आणी वाली

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/03/2009 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली. त्यात सितेकडे केलेली अग्नीपरिक्षेची मागणी कशी अन्यायकारक वगैरे होती हे ही वाचायला मिळाले. रामचंद्र हे आधी राजा असल्याने त्यांनी स्वत:चा आदर्श जनतेपुढे घालुन देण्यासाठी त्यांनी सितेकडे अशी अपेक्षा व्यक्त केली असावी काय ? वाली वधाविषयी मात्र खुप बोलायची इच्छा आहे. खरेतर मागे मिपावर हा प्रश्न उपस्थीत झाल्याचे पुसटसे आठवते पण तेंव्हा भवतेक कंटाळ्यामुळे हे येव्हडे सगळे टंकले नाही. आज वेळ मिळाला आहे तर हा राम आणी वाली संवाद तुमच्या पुढे सादर करत आहेत.

तगमग

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 09/03/2009 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
अवहेलनेचे बकासूर टाचा झिजवताय्त.. अन् मी उन्मुक्त रंगबावरी भिरभिरतेय ध्येयवेड्या रूपरेषा धुंडाळत त्याच त्या साजणगहिर्‍या रंगहाका पिंपळरसिकांचा अत्तरटाहो रक्तसूज्ञांचा दंभपराभव अन् प्रतिबिंबांचा जादूटोणा यक् अन् असल्याच शब्दांना कंपूबाजांच्या "छान गं, मस्त गं, पाणी आलं गं, सुंदर कल्पना गं, कसं सुचतं गं.." असल्या छप्परतोड प्रतिक्रिया काहिली काहिली जिवाची वाटते सांगावे मी कोण या सार्‍यांना .. की या तेजतर्रार शून्यमनस्कतेचा उकळत्या तेलात टाकून एक मेदूवडा बनवून खावा खुसखुशीत??...