Skip to main content

वाङ्मय

उपसंहार

लेखक दमनक यांनी शुक्रवार, 11/12/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बातम्या. काल बजाज स्कूटरच्या निधनाची आणि आज दिपुंच्या. एका युगाचा अंत झाला अनेक अर्थांनी. बजाज स्कूटरीला भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक मानले गेले, तसे दिपु हे भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक असे म्हटले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. रूढार्थाने दिपु हे 'एनिथिंग बट मिडलक्लास'. विश्वभान, कालभान आणि या सर्वांच्या साक्षीने आत्मभान असलेला साहित्यिक. विसाव्या शतकातला 'फार महत्त्वाचा कवी'. या माणसाला मध्यमवर्गीय विचारसरणीत बसवणे शक्यच नाही. विचारसरणी ही मोठी मजेशीर गोष्ट आहे, नाही का ? जर एक विचारसरणी 'पुढे' गेली काय किंवा 'मागे' आली काय...

उदय प्रकाश

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 11/12/2009 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज श्री. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या निधनानिमित्त अनेक लोकांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली वाहिली , चित्र्यांच्या व्यक्तीत्वाच्या आणि लिखाणाच्या आठवणी काढल्या. यात हिंदी लेखक श्री. उदय प्रकाश यांचाही समावेश आहे. (उदय प्रकाश यांनी वाहिलेली श्रद्धांजली. : http://uday-prakash.blogspot.com/2009/12/blog-post.html ) या निमित्ताने उदय प्रकाश यांच्या लिखाणाच्या आठवणी निघाल्या. हिंदीतला उत्तम दर्जाचा हा लेखक मी वाचला मात्र मराठीमधे.

बहिणाबाई- एक महान कवियत्री

लेखक सुनिल पाटकर यांनी शनिवार, 05/12/2009 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
बहिणाबाई- एक महान कवियत्री मन वढाय वढाय....असं म्हणत मानवी मनाचा गुंता जिने आपल्या कवितेत रेखाटला,कशाला काय म्हणू नये हे जिने जाणलं , संसाराची व्याख्या जिला पुर्णपणे कळली ,माणूस.माणूस कधी होईल याचा जिला ध्यास लागला ,वाट्च्या वाटसरुलाही जिने मार्ग दाखविला अशी महान कवियत्री बहिणाबाई’,,,, जांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द काव्य होऊन बाहेर पडायचा.बहिणाबाईंना जाऊन ५७ वर्ष पूर्ण झाली परंतु त्यांच्या कविता आजच्या काळातही चपलख लागु होतात. घरापासून मळ्यापर्यंत हा बहिणाबाईंचा रोजचा प्रवास होता, कागद पेन दूरच पण अक्षरांची साधी ओळखही जांना नव्हती त्यांची गाणी.कविता ओव्या आजच्या काळाही मार्गदर्श

स्रीसंत, सॉरी श्रीसंत तात्याबा महाराजांची नंदनला पत्रे..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 21/11/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
हा छोटेखानी लेख तुझे आहे तुजपाशी मधल्या काकाजी देवासकरांना सादर समर्पित! :) पत्र क्रमांक - १ बेटा नंदन, अनेक आशीर्वाद!
तात्या, मला भारतीय स्त्री-सौंदर्याबाबत काही मौलिक गोष्टी सांगा!
सांगतो हां! नंद्या, बाबारे -या जगात भारतीय स्त्री-सौंदर्य हेच खरे.

प्रकाशवाटा...

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 18/11/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशवाटा वाचलं... डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि इतर काही सहकाऱ्यांनी बाबा आमटेंच्या मार्गदर्शनाने सुरु केलेल्या हेमलकशातल्या लोकबिरादरी प्रकल्पाबद्दल हे पुस्तक आहे... हेमलकशातल्या लोकबिरादरी प्रकल्पाचा जन्म का आणि कसा झाला... प्रकल्प सुरु केल्यावर आलेल्या अडचणीं वर मात कशी केली... तिथल्या आदिवासींना स्वयंपूर्ण कसं केलं... जंगली प्राण्यांबद्दलचे अनुभव; त्यांच्या साठी सुरु केलेलं अनाथालय... जिवावर बेतलेले प्रसंग...

लेखन स्पर्धा २००९

लेखक मोहन यांनी सोमवार, 09/11/2009 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर लेखकांकरता माहिती, पु.ल. देशपांडे जयंती निमित्ताने, puladeshpande.net या संस्थळाने लेखन स्पर्धा २००९ आयोजित केली आहे. महाविद्यालयीन व खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा आहे. ३० नोव्हें. अंतिम तारीख आहे. या बद्द्लची अधिक माहिती इथे पाहू शकाल. स्पर्धेत भाग घेणारे इच्छुक लेखकांना शुभेच्छा. आपला मोहन.

'उ'कारावर चंद्रानुस्वार कसा काढायचा?

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 18/10/2009 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
उर्दू (देवनागरीत) किंवा हिंदी लिहितांना चंद्रानुस्वार वारंवार लागतात. मिपावरील गमभन सॉफ्टवेअर वापरताना 'उ'कार सोडून 'आँटी', 'कँटीन'सारखे शब्द लिहिता आले, पण हूं, यूं घूं येईनात. 'बराहा'मध्ये ते कसे लिहायचे ते माहीत होते पण 'गमभन'मध्ये लिहिता येई ना. म्हणून मी कांहीं निवडक लोकांना "'ऊ'कारावर चंद्रानुस्वार कसा द्यायचा हे कुणी सांगू शकेल काय?" हा प्रश्न विचारला उदा: "घूंघट"मधला घूं , "यूं तो हमने"मधील यूं, "मैं नशेमें हूं"मधील हूं वगैरे बर्‍याच लोकांनी त्यांनाही माहीत नाही असे कळवले, पण 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले.

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/10/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.

जालिय लेखनाची दखल...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 17/10/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज आंतरजालावर बरीच मराठी संस्थळं भरभराटीला येत आहेत, मराठी युनिकोडसुविधेमुळे मराठी टंकन सुलभ झाले आणि ब्लॉग्जचे पेव फुटले... त्यामुळे ज्या लोकांनी आयुष्यात आपण कधी लिहू असे कल्पिलेही नसेल असे लोक लिहू लागले, मराठी वाचन कमी झाले म्हणता म्हणता या नवीन तंत्राविष्कारामुळे मराठी वाचनच नव्हे तर लेखनही वाढते आहे. एकूणातच... एक नवीन जग आकारास येत आहे. आणि आपण आजचे नेटकर या विश्वाचे सुरूवातीचे दिवस आणि वाढ अगदी पहिल्या रांगेत बसून बघतो आहोत. तर जालिय दिवस असे सुखासमाधानात जात असताना, साधारण तीनेक आठवड्यांपूर्वी अचानक रामदासांचा व्यनि आला. एखाद्या सदस्याचे सगळे लेखन बघायचे असेल तर काय करायचे?