Skip to main content

वाङ्मय

पुस्तकविश्व.कॉम - मराठी वाचकांसाठी नवीन संकेतस्थळ. BETA 1.0

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 16/03/2010 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी पुस्तकांच्या चाहत्यांसाठी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर परिक्षण लिहीण्यासाठी आणि आपल्यासारखी आवड निवड असलेल्या लोकांशी मैत्री करण्यासाठी अनेक नवीन सुविधा घेऊन नवीन संकेतस्थळ आकार घेत आहे त्याचे नाव आहे पुस्तकविश्व.कॉम ( www.pustakvishwa.com). मराठी पुस्तकांना आणि साहित्यविश्वाच्या घडामोडींना वाहलेले हे संकेतस्थळ अतिशय उत्तम व्हावे यासाठी लोकायत टीम काम करते आहे. पुस्तक परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा आदी या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.

आज जरा मूड आहे व वेळ ही..

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 16/03/2010 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आज जरा मूड ही आहे व वेळ ही.
एकदा मंजुळ आवाजाच्या एक बाई म्हणाल्या, "काहो तुमच्या सोईची रात्री ९ नंतरची वेळ तुम्ही ठेवलित भेटायची पण आम्ही नंतर परत जायचे कसे?"
पुर्वी एकदा एकांनी प्रश्न कांडममधील माझ्या लेखांवर छद्मीपणे लिहून पृच्छा केली होती की जेव्हा तुम्ही अगदी specific प्रश्न विचारलात जसे की, 'माझी पुढची बदली कोठे होइल'? त्यावेळी मात्र नाडी वाचकांने किंवा महर्षींच्या नावाखाली सोईस्कररित्या हे उत्तर देण्याचे टाळले.

प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 15/03/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात. पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र!

प्लँचेटचे प्रयोग

लेखक हेमंत बर्वे यांनी रविवार, 14/03/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवतं आहे तेव्हापासूनच्या लहानपणाच्या आठवणी समर्थ नगरशी संबंधीत अशा आहेत. समर्थ नगर म्हणजे चुनाभट्टीचं समर्थ नगर. आमच्या समर्थ नगरातल्या इतर मुलांसारखाच मी पण होतो. फरक एव्हढाच होता की मी इतर मुलांपेक्षा मनस्वी होतो. आई शाळेत जायची , ताया दोन्ही माझ्यापेक्षा मोठ्या ,दादा म्हणजे दादा सगळ्यात मोठा.वडील अकाली गेलेले.त्यामुळे माझ्या मनस्वी वागण्याला मोकळा वाव मिळाला. आधी लहान म्हणून फारसं लक्ष कुणी दिलं नाही पण मग मनस्वी पणाल एक हट्टीपणाची झाक आली. शाळेत हुषार . पहील्या पाचात नंबर .शेजार पाजार सुशिक्षीत ब्रह्मवृंदांचा. पण इतर मुलांपेक्षा मी वेगळा होतो हे नक्की. सवयी स्वच्छ.

या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 13/03/2010 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...
नाडीग्रंथांतील अदभूतता मला सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते.
मालकंसाची लकेर हवेत विरते आहे. संतूरवर शिवरंजनी शहारे आणणारे तरंग धुंद करतेय. बासरीच्या मधुर स्वरांनी वसंत बहारला आहे.

अढळपद

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शुक्रवार, 12/03/2010 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
************* अढळपद ************ 'अहो, जरा माझी धापेची गोळी आणि पाणी देता काय?' हाक ऐकू आली आणि शांताबाई तंद्रीतून जाग्या झाल्या. 'आले, हं' त्या म्हणाल्या आणि लगबगीने सावरून उठून बसल्या. नाकाच्या शेंड्यापर्यंत ओघळलेला चश्मा त्यानी व्यवस्थीत डोळ्यावर सरकवला. मांडीवरचं पुस्तक त्यानी बाजूला ठेवलं. पाणी आणि गोळी घेऊन त्या शामरावांच्या जवळ गेल्या. आलेली खोकल्याची उबळ तशीच दाबून शामरावानी गोळी घेतली. धापेचा पंप तोंडात धरून त्याचे दोन स्प्रे घेतले. थोडं बरं वाटताच हाश हुश करत ते म्हणाले, ' काय करत होता आत?' 'गोष्टी वाचत बसले होते. रात्री सायली जेवणापूर्वी गोष्टीचा हट्ट धरणारच.

साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!

लेखक प्रसाद यांनी मंगळवार, 09/03/2010 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत. तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती! [तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...

भिंत

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 01/03/2010 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य आता हातभर वर आला होता. हवेतला गारवा केव्हाच निघून गेला होता. आणि सावकाशपणे विटा ठेवून त्यावर चुना लिंपणाऱ्या चंद्र्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमलेले मला दिसत होते. 'गावली गं, माज्या जाल्याला मासोली गावली गं.' चंद्र्याचं गाणं उजाडल्यापासनं चालू होतं. भाड्या येऊन गेला तेव्हा थोडा खंड पडला होता तेवढंच. पण आता त्याच्या गाण्यालाही थोड्या कंटाळ्याची झाक आली होती. घोल्याला बहुतेक इतकी वर्षं त्याच्याबरोबर काम करून त्याची सवय झाली असावी. मधनंच चंद्र्या आपल्याला झेपणार नाही एवढी तान घ्यायला गेला की क्षणभर आठी यायची आणि मान थोडीशी हलायची इतकंच. अशाच एका तानेनंतर घोल्या वैतागून म्हणाला.

गृहप्रवेश

लेखक स्मृती यांनी शनिवार, 27/02/2010 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
"पसंत आहे हं आमच्या जयला तुमची लेक" आईंचा फोन आला आणि आमच्या घरचं वातावरण एकदाचं मोकळं झालं. दहा-बारा मुलगे बघितल्यावर आपल्या नकटीला हा जयदीप चित्रे पसंत पडलाय तर आता त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळतोय की नाही या चिंतेत आई बाबा होते. त्या रात्री काही मला झोप म्हणून लागली नाही. आपलं लग्न होणार आता, म्हणजे नवीन घरात रहायला जायचं, दिवसाचं रूटीन पुर्णपणे बदलणार. आई, बाबा, चिनूला भेटायला परवानग्या काढाव्या लागतील की काय?!... आणि मुख्य म्हणजे हा प्राणी जयदीप.. तसा त्या दिवशी बरा वाटला.. सुलझा हुआ, डिसेंट, लेव्हल हेडेड वगैरे वगैरे, पण खरंच तसा असेल ना??...