Skip to main content

वाङ्मय

तिरिछ

लेखक अक्षय पुर्णपात्रे यांनी शनिवार, 24/04/2010 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहान होतो तेव्हा प्रश्नांची वारुळे उभी राहत. एकाभोवती अनेक. बसचा कंडक्टर इतके पैसे जमा करतो म्हणजे तो खूप श्रीमंत असावा का? माझे वडील कंडक्टर का नाही होत? परिवहन महामंडळाच्या जलद गाडीतून जातांना आमच्या छोट्याशा गावासमोर बसस्थानक असूनही बस का नाही थांबवत? आमच्या वाड्यासमोरच्या घरात कोण बाई आहे जिच्यापासून सर्व लांब राहतात? चिंचेच्या झाडाखाली भूत आहे ते कोणी पाहीले आहे का? भूत असूनही समोरच देशपांड्यांच्या वाड्यात लोक कसे राहतात? त्यांना भीती वाटत नाही का? अनेक प्रश्न. कधी कोणी काहीतरी सांगे. त्यातून अजुनच प्रश्न पडत. तसे माझे बालपण चारचौघांसारखेच होते. खूप कमी वेळा त्या जगात जावेसे वाटते.

..उखाणे (काहीच्या बाही)..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 24/04/2010 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा स्पेशल उखाणे कृपया हलकेच घेणे. इथे मी व्यक्तिशः कुणालाही ओळखत नाही. फक्त आय.डींच्या व्यक्तिमत्वा नुसार हे उखाणे लिहिले आहेत. सौ.मि.पा संपादक. पंचांगात पंचाग..आहे पंचांग दाते.. *** रावांनी ब्लॉक केले माझे डुप्लिकेट खाते.. सौ.तात्या दाराबाहेर काढुन ठेवते मी नेहेमी माझे खेटर.. तात्याराव मारतात मला रोज रोज फाट्यावर.. सौ.देवकाका. कधी हे करतात तर कधी ते करतात.. प्रमोदराव आजकाल चाल हे अस्त्र फेकुन मारतात.. सौ.मिपाकर घाटामध्ये कोसळते पावसाळ्यात दरड.. ***राव करतात मला घरामध्येही खरड.. सौ.टारझन..
काव्यरस

कुसुमाग्रजांची कविता, पुनर्भेट

लेखक शेखर जोग यांनी गुरुवार, 22/04/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
'कुसुमाग्रज" एक अद्वितीय, तीव्र संवेदनशील व्यक्तीमत्व. कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांची महाराष्ट्राला अस्मितेला नव्याने ओळख करून देण्याचा तसेच त्यांच्या कवितांचा अर्थ शक्य झाल्यास थोड्या वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा एक खटाटोप. माझे भाग्य इतके चांगले की त्याना अगदी जवळून बघण्याचा सुदैवाने योग आला. अर्थात मी खूप लहान होतो त्यावेळी. त्यांच्या काही स्मृती, आठवणी मला माझ्या आईने (ते माझ्या आईचे मामेभाऊ लागत)सांगितल्या होत्या. त्याही तुमच्या समोर मांडण्याचा विचार आहेच.

नॉनसेन्स!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''! म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अ‍ॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्‍या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक! No one is exempt from talking nonsense.