प्लँचेटचे प्रयोग
मला आठवतं आहे तेव्हापासूनच्या लहानपणाच्या आठवणी समर्थ नगरशी संबंधीत अशा आहेत.
समर्थ नगर म्हणजे चुनाभट्टीचं समर्थ नगर.
आमच्या समर्थ नगरातल्या इतर मुलांसारखाच मी पण होतो.
फरक एव्हढाच होता की मी इतर मुलांपेक्षा मनस्वी होतो. आई शाळेत जायची , ताया दोन्ही माझ्यापेक्षा मोठ्या ,दादा म्हणजे दादा सगळ्यात मोठा.वडील अकाली गेलेले.त्यामुळे माझ्या मनस्वी वागण्याला मोकळा वाव मिळाला.
आधी लहान म्हणून फारसं लक्ष कुणी दिलं नाही पण मग मनस्वी पणाल एक हट्टीपणाची झाक आली.
शाळेत हुषार . पहील्या पाचात नंबर .शेजार पाजार सुशिक्षीत ब्रह्मवृंदांचा. पण इतर मुलांपेक्षा मी वेगळा होतो हे नक्की. सवयी स्वच्छ.
व्यायामाची आवड. निटनेटकेपणा अंगात होताच .
त्यावेळी पाचवीत इस्त्रीचेच कपडे घालणारा मी एकटाच . सहावीत असताना पासून माझ्यासाठी कपड्याची खरेदी मी (हट्टानी मीच)करायचो.दिसायला मी चांगला आहे हे मला फार लवकर कळलं होतं . कर्तबगारीची हुशारी दाखवायचे ते दिवस नव्हते पण ताईचं लग्न ठरलं तेव्हा मी आठवीत होतो.लग्नाची तयारी ,भटजी , आचारी सगळं काही मीच केलं होतं .ते दिवस टंचाईचे होते. घरात आई एकटीच कमावती.पण आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास.आईनी त्यावेळी खरेदीसाठी माझ्या हातात पाच हजार ठेवले होते.(१९६९ साली).
माझ्यासाठी कुणी मोठेपणा घेऊन काही करावं याचा मला थोडा रागच होता.करायचे ते मी करणार आणि मीच करणार अशी रग अंगात भिनली होती हे सगळं सांगायचं कारण एव्हढंच की प्लँचेटशी माझा दूरान्वयानी काही संबंध नव्हता आणि इतरांनी काही सांगीतलं असतं तर मी विश्वास ही ठेवला नसता. पूजा .कर्मकांड यावर कधीच विश्वास नव्हता.
सेल्फ मेड मॅन बनण्याची माझी पूर्वतयारी झाली होती.
______________________________________________________
प्लॅचेटचा माझा पहीला संबंध आमच्या बहीणीचं लग्न झाल्यावर आला.तो सुध्दा तिच्या सासर्यांकडून ऐकूनच.आत्मा येतो .तो वाटी हलवतो. प्रश्नांची उत्तरं देतो वगैरे ऐकूम उत्सुकता चाळवली गेली होती.आपटे नावाचे गृहस्थ त्यांच्याकडे यायचे .त्यांना प्लँचेटचे चांगले ज्ञान होते आणि त्यावर त्यांचे संशोधन चालू होते असंही कानावर आलं .
मग उत्सुकतेची एक पायरी वर गेलो .बहीणीच्या सासर्यांना भेटलो. त्यांच्या कडून प्लॅचेटचा आराखडा कसा बनवायचा ते शिकून घेतलं .मग घरी प्रयोग सुरु झाले. घरची सगळीचजणं आपापल्या कामात .त्यामुळे दुपारी हे उद्योग करायला मी मोकळा .
सुरुवातीला सगळं काही चेष्टामस्करी या सदरात मोडणारं होतं.
एक पाट घेऊन त्यावर एक ते नऊ आकडे लिहायचे. त्याखाली होकारार्थी आणि नकारार्थी उत्तरासाठी वाय आणि एन लिहायचे.एक वाटी उपडी घालून त्यावर तीन सभासद एकेक बोट ठेवायचे.
अशा प्रयोगात जे होतं ते सगळं व्हायचं .कुणीतरी बोट जोरात चेपून हवं ते उत्तर मागायचं.
म्हणजे अमुक तमुक मुलगी मला पटेल का वगैरे. उत्तर नेहेमी होकारार्थी यायचं .
परीक्षा संपल्यावर पास नापासचे प्रश्न. जे काही चालायचं ते एखाद्या उन्हाळी सुटीतल्या दुपारच्या खेळासारखं.
हा खेळ अचानक कधीतरी गंभीर वळण घे ईल असं तेव्हा वाटतही नव्हतं पण एक कळलं होतं की मी हात ठेवला तर उत्तर बरोबर येतात.
मग आपट्यांकडे चौकशी केली तर असं कळलं की ते रुढ अर्थाच्या प्लॅचेटच्या बरेच पुढे गेले होते.
ते विवक्षीत आत्म्याला प्रार्थना करून बोलवायचे. हातात एक पेन घेऊन बसायचे .प्रश्नाचं उत्तर त्यांच्या हाती लिहीलं जायचं.
मग मला वाटायला लागलं की आपणही असंच प्रार्थना करून आत्म्यांना बोलवावं आणि प्रश्नोत्तरं करावी.
मग तोच प्रयत्न इतरांनी करून बघीतला तर सगळे प्रयोग फसले.
मी मात्र नेटानी माझे प्रयत्न चालू ठेवले .म्हणजे नेमकं काय केलं ?
रोज एकच नेम. अमुक तमुकच्या आत्म्याला या असं आवाहन करायचं आणि काही होतं आहे का याची वाट बघायची.काही प्रयत्नानंतर मी सगळं सोडून द्यायच्या विचारात होतो .मग मी बहीणीच्या सासर्यांच्या मध्यस्थीने आपट्यांकडे चौकशी केली. त्यांच्याकडून कळलं की आत्मा असा सरधोपट मार्गानी येत नाही. त्यांना एका मिडीयमची आवश्यकता असते. त्यांनी परवानगी दिली तरच आत्मा आपल्याशी संपर्क साधू शकतो.आणि तो प्रकार घडला.
आमच्या साधारण ओळखीचे एक पेटकर नावाचे गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांना त्यांच्या आजोबांशी संपर्क करायचा होता.एकूण प्लॅचेटची धुंदी अशी चढली होती की मी लगेच हातात पेन घेऊन बसलो. बराच वेळ प्रार्थना केली. अचानक माझा हात कोपरापासून जड पडला आणि पेन झराझर चालायला लागलं .
मी काही बेशुध्द किंवा ट्रान्स मध्ये नव्हतो पण मी माझ्या मनानी काहीच लिहीत नाही आहे हे पण कळत होतं.
पेटकरांनीही त्यांच्या आजोबांना पडताळणीसाठी काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर पण बरोबर आले.
त्या दिवसापासून माझी लेखणी पळायला लागली.त्या आत्म्यांकडून त्यांची सही पण माझ्या हातून हुबेहुब कागदावर उतरायला लागली.
हाताचं जड पडणं ,प्रश्नांची उत्तरं तंतोतंत बरोबर येणं हे फार सहज व्हायला लागलं.
माझा स्वतःचा पण विश्वास फारसा घट्ट नव्हता .पण एक दिवस माझ्या हातून माझ्याच वडीलांची मोडीतली सही झरकन कागदावर उमटली आणि आम्ही सगळे प्रयोगकर्ते हादरलो.(मला मोडी काय आहे हे पण माहीती नव्हतं )
घरात दुपारी जत्रा भरायला लागली.आत्म्यांची गर्दी व्हायला लागली. त्या त्या व्यक्तीच्या संभाषणाच्या लकबी, आवडते शब्द वगैरे यायला लागले.
त्यावेळी मी इंटर सायन्सला होतो.ए ग्रुप घेतला होता आणि इंजीनीअरींग अॅडमीशनसाठी अभ्यासाची तयारी जोरात चालू असेल अशा समजात आमची आई होती.
एक दिवशी आई शाळेतून अचानक घरी आली आणि घरातला दरबार बघीतला आणि खवळली.
दरबार बरखास्त करून मला कान पिचक्या दिल्या.दरबारी मंडळींची बोळवण करण्यात आली.वह्या आणि टिपणं माळ्यावर भिरकावून देण्यात आली.
मी पण प्लॅचेटविसरून अभ्यासाला लागलो.व्हिजेटीआयला अॅडमीशन मिळवली.
पण तेव्हा हे माहीती नव्हतं की गूढ विज्ञानाचा मी दरवाजा उघडून ठेवला आहे आणि अजून पुन्हा त्याच मार्गानी मी वाटचाल करणार आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
विचार काय आहे?
In reply to विचार काय आहे? by प्रकाश घाटपांडे
म्हणूनच...
In reply to म्हणूनच... by विकास
>>त्यामुळे
शाबास! ते
In reply to शाबास! ते by Nile
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
+२ डायबेटी
सहमत..
अहो असं काय करता...
एक वांग्मय
माझा अनुभव
प्लँचेट
थट्टा
In reply to थट्टा by मुक्तसुनीत
दाभोळकर
In reply to दाभोळकर by हर्षद आनंदी
बरोबर आहे.
In reply to दाभोळकर by हर्षद आनंदी
त्यांच्या घरात ३ पिढ्यांआधी एक ब्रम्हचारी होता
In reply to त्यांच्या घरात ३ पिढ्यांआधी एक ब्रम्हचारी होता by गोगोल
वर काय लिहिलेय ? वाचले नाही ?
In reply to वर काय लिहिलेय ? वाचले नाही ? by मुक्तसुनीत
मला वाटत
In reply to त्यांच्या घरात ३ पिढ्यांआधी एक ब्रम्हचारी होता by गोगोल
प्लँचेट
प्लँचेट कथा
आईला!!!
पण उद्या
अजब मामला
शैली छान
काय माहीत नाही बा...
विवेकानंद आणि श्री अरविंद
भारी लेख आणि भारी प्रतिसाद
हे कसे
सकारात्मक प्लँचेट .....
एक शंका आहे, प्लँचेट एकट्याने
दाभोलकरांच्या खुन्याचा तपास
(No subject)
हा पाहा ‘प्लँचेट’ स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ